Back to Course

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन

प्रास्ताविक

एकोणिसाव्या शतकात धार्मिक-सामाजिक कार्य करणारी रामकृष्ण मिशन ही एक महत्त्वाची संस्था होती. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ. स. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर मठाची विवेकानंद यांनी स्थापना करुन ते रामकृष्ण मिशनचे मुख्य केंद्र बनवले.

रामकृष्ण परमहंस

स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव गदाधर चटोपाध्याय असे होते. त्यांचा जन्म इ. स. १८३६ मध्ये बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील एका खेड्यात गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनीच स्वतःचे नाव गदाधर चटोपाध्याय ऐवजी रामकृष्ण असे ठेवले.

स्वामी विवेकानंद
  • स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्त्व पत्करुन त्यांचे विचार साध्या आणि सोप्या भाषेत सांगून त्यांच्या कार्याचा जगभर प्रचार व प्रसार केला.
  • विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कलकत्त्यातील एका कायस्थ कुटुंबात झाला. ते १८८४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे पदवीधर म्हणून बाहेर पडले.
  • वयाच्या २० व्या वर्षी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात आले आणि ते रामकृष्णाचे निस्सीम अनुयायी बनले. इ. स. १८८७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. बेलूर मठ हेच मिशनचे प्रमुख केंद्र बनले.
शिकागो जागतिक सर्वधर्म परिषद 
  • भारतीय संस्कृतीला जगासमोर नेण्यासाठी आणि भारताच्या अवनतीवर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेस स्वामी विवेकानंद इ. स. १८९३ मध्ये हजर राहिले.
  • अमेरिकेतील अनेकांना त्यांनी आपले शिष्य बनवले. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेनंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व स्वित्झर्लंडचा दौरा केला. या चार वर्षाच्या दौऱ्यानंतर ते १८९७ मध्ये मायदेशी हिंदुस्थानला परतल्यावर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
रामकृष्ण मिशन
  • रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ. स. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर मठाची विवेकानंद यांनी स्थापना करुन ते रामकृष्ण मिशनचे मुख्य केंद्र बनवले.
  • स्वामी विवेकानंद यांनी मिशनच्या संघटनेसाठी कार्यासाठी त्यांनी दोन मुख्य केंद्राची स्थापना केली. त्यातील एक केंद्र कलकत्ता शहराच्या शेजारी बेलूर या ठिकाणी तर दुसरे केंद्र आल्मोडा शेजारच्या मायावती येथे सुरू केले.
  • स्वामी विवेकानंदांचा मृत्यू ४ जुलै, १९०२ रोजी झाला.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register