Back to Course

स्वामी दयानंद सरस्वती

जन्म व शिक्षण
 • स्वामी दयानंद सरस्वतीचा जन्म इ. स. १८२४ मध्ये गुजरात प्रांतातील मोरवी संस्थानातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव मूळशंकर असे होते.
 • ईश्वराचे खरे स्वरूप जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा वाढली इ. स. १८४५ ते १८६० या कालावधीत त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यांनी स्वामी विरजानंद सरस्वतींचे शिष्यत्व पत्करुन स्वत: स्वामी दयानंद सरस्वती असे नांव धारण केले.
 • दयानंद सरस्वती यांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली व आर्य समाजाच्या प्रचाराचे कार्य सुरू केले.
 • दयानंदनी २४ जून, १८७७ रोजी पंजाब प्रांतातील लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढे लाहोर हेच या समाजाचे मुख्य केंद्र बनले.
 • ३० ऑक्टोबर, १८८३ रोजी अजमेर येथे त्यांचे निधन झाले.
 • दयानंद सरस्वतींनी ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला.
स्वामी दयानंदाचे सुधारणा कार्य
 • देशात अनेक ठिकाणी संस्कृत पाठशाळांची स्थापना
 • लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी ‘इंडियन अकॅडमी’ हि संस्था स्थापन केली.
 • गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणसंस्था स्थापन करून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली.
 • स्त्रिया व शूद्रांना वेदाभ्यासाचा अधिकार दिला.
 • बालविवाह पद्धतीस विरोध केला.

निधन : ३० ऑक्टोबर १८८३ रोजी विषप्रयोगामुळे स्वामी दयानंद सरस्वती यांचे निधन झाले.

 • स्वामी दयानंद सरस्वतीच्या आर्य समाजाचे वर्णन भगिनी निवेदिता असे करतात कि, ‘‘आर्य समाज म्हणजे लढाऊ हिंदूधर्म होय.’’
 • डॉ. ॲनी बेझंट असे म्हणतात की, ‘‘हिंदूस्थान हा हिंदूच्यासाठी आहे.’’ असे सांगणारा पहिला महामानव होय.
 • हॉन्स कोहन्स यांच्या मते, ‘‘विसाव्या शतकातील भारताची पायाभरणी आर्य समाजाने केली.’’
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register