Back to Course

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य
  • सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलें यांच्या शैक्षणिक कार्यास मदत करुन आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. देशांतील पहिल्या स्त्री-शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
  • सनातन्यांचा प्रखर विरोध असतानाही महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशिक्षणाची मूहुतमेढ रोवली. या शाळेत शिक्षक मिळत नव्हते. त्यामुळे या महात्मा फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाईस शिक्षित करुन त्यांनी या शाळेत मुलींची शिक्षिका म्हणून नियुक्त केले.
  • सनातन्यांच्या दबावामुळे महात्मा फुल्यांच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदरावांनी त्यांना घराच्या बाहेर काढले. तरीसुद्धा त्यांनी शैक्षणिक कार्य चालू ठेवले. या कार्यास विरोध म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुलेंना त्रास द्यायला सुरुवात केली.
  • सावित्रीबाई शाळेत जात-येत असताना सनातनी लोक व स्त्रिया रस्त्याच्या बाजूला उभे राहून सावित्रीबाईंना उद्देशून अपमानास्पद शिवराळ भाषेत त्यांची निंदानालस्ती करीत, त्यांच्या अंगावर खडे मारत व चिखलशेण फेकत परंतु इतकी अवहेलना व विटंबना होऊनही सावित्रीबाईंनी या कार्यात माघार घेतली नाही.
  • महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांच्या सर्व शाळांची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली व शिक्षणप्रसाराचे महान कार्य त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहिल्या.
  • त्यांच्या या कार्यामुळेच मुली, महिला व अस्पृश्य शिक्षित झाले व त्यांना आत्मसन्मान मिळाला. म्हणून सावित्रीबाई फुले या खरोखरच ‘ज्ञानज्योती’ आहेत. त्यांनी स्वतः जळत आपल्या शिक्षणप्रसाराचा प्रकाश समाजांतील सर्व स्तरापर्यंत पोहोचविला.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register