Back to Course

विष्णुशास्त्री पंडित

जन्म व शिक्षण 
  • विष्णुशास्त्री पंडित (१८२७-१८७६) हे समाजसुधारक, मराठी ग्रंथकार आणि वृत्तपत्रकार होते. त्यांचे पूर्ण नाव विष्णु परशुराम शास्त्री पंडित असे होते. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे घराणे सातारा जिल्ह्यातील बावधान ह्या गावचे होते.
  • सातारचे प्रख्यात विद्वान राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर आणि त्यांचे चिरंजीव नारायाणाचार्य ह्यांच्याकडे न्याय आणि व्याकरण ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजीचे अध्ययन केले.
  • महादेवशास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे सहाध्यायी होते.
समाजकार्य 
  • १८४८ मध्ये त्यांनी सरकारी शिक्षणखात्यात नोकरी पत्करली. तेथे शिक्षक, भाषांतरकार, भाषांतरपरीक्षक अशी कामे केली.
  • १८६४ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईच्या इंदुप्रकाश ह्या सामाजिक. सुधारणावादी वृत्तपत्राचे ते संपादक झाले. 
  • स्त्रियांच्या उन्नतीची त्यांना तळमळ होती. एका विधवेशी स्वतः विवाह करून आपण कर्ते सुधारक असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते.
  • १८७० मध्ये पुण्यास शंकराचार्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुनर्विवाहविषयक वादात भाग घेऊन आपले विचार त्यांनी साधार आणि तर्कशुद्धपणे मांडले होते.
  • ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांनी पुनर्विवाहाच्या सशास्त्रतेसंबंधी लिहिलेल्या ग्रंथाचे त्यांनी केलेले ”विधवाविवाह” हे भाषांतर १८६४ मध्ये प्रसिद्ध झाले.
  • त्यांच्या अन्य ग्रंथांत मॅक्‌डॉनल्डकृत कॉनिकल ऑफ नाना फडणवीस ह्या आणि अन्य काही ग्रंथांच्या आधारे लिहिलेली नाना फडणवीस  ह्यांची संक्षिप्त बखर (१८५९), मरेकृत हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडियाच्या १० ते १४ प्रकरणांवर आधारित हिंदुस्थानाचा इतिहास (१८६१), इंग्रजी आणि मराठी कोश (१८६४), संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश (१८६५) आदींचा समावेश होतो.
  • शंकर पांडुरंग पंडित ह्यांच्या साहाय्याने त्यांनी तुकारामाच्या अभंगांची गाथा दोन खंडांत संपादिलेली आहे (१८६९, १८७३).
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register