Back to Course

राजा राममोहन रॉय

जन्म

राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला. अकबरशहाने रॉय यांना ‘राजा’ ही पदवी भलं केली आहे.

शिक्षणविषयक कार्य 
 • १८१७ साली कोलकाता येथे डेव्हिड हेअर यांच्या साहाय्याने ‘हिंदू कालेज’ची स्थापना.
 • १८२६ साली हिंदू एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी कोलकाता येथे वेदांत कालेजची स्थापना.
धार्मिक व सामाजिक कार्ये 
 • १८१५ साली आत्मीय सभेची स्थापना
 • १८२२ साली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना
 • वरील दोन्ही संघटनांच्या एकत्रीकरणातून २० ऑगस्ट १८२८ रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना
वृत्तपत्रविषयक कार्य 
 • १८२१ साली ”संवादकौमुदी” हे पाक्षिक सुरु केले.
 • १८२२ साली ‘मिरात-उल-अखबर’ हे पर्शियन वृत्तपत्र सुरु केले.
 • ‘ब्रह्मनिकल मॅगझीन या मासिकातून ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार केला.
 • ‘वज्रसूची’ यासंस्कृत ग्रंथाचे भाषांतर केले.
स्त्री सुधारणाविषयक कार्य
 • विधाविवाहाचा पुरस्कर्ता
 • १८२९ साली लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा सातत्याने पाठपुरावा करून सतीबंदीचा कायदा संमत करून घेतला.
 • भारतात स्त्री-दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ राजा राममोहन रॉय यांनी उभी केली.

निधन : २७ सप्टेंबर १८३३ रोजी ब्रिस्टॉल (इंग्लंड) येथे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.

SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register