Back to Course

महाराष्ट्रातील महानगरपालिका

महानगरपालिकेची स्थापना –
 • शहरी/नागरी स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर महानगरपालिका हा आहे.
 • भारतामध्ये १६८८ मध्ये मद्रास शहरासाठी पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली.
 • १८८८ मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार चालतो.
 • महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार चालतो.

महाराष्ट्रातील महानगरपालिका

 1. मुंबई शहर
 2. नवी मुंबई
 3. ठाणे
 4. कल्याण-डोंबिवली
 5. उल्हासनगर
 6. भिवंडी – निजामपूर
 7. मीरा-भायंदर
 8. पुणे
 9. पिंपरी-चिंचवड
 10. नाशिक
 11. मालेगाव
 12. कोल्हापूर
 13. औरंगाबाद
 14. सांगली- मिरज कुपवाड
 15. सोलापूर
 16. जळगाव
 17. धुळे
 18. अहमदनगर
 19. नांदेड
 20. नागपूर
 21. अमरावती
 22. अकोला
 23. वसई-विरार
 24. लातूर
 25. परभणी
 26. चंद्रपूर
 27. पनवेल
सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण २७ महानगरपालिका आहेत. २०१६ मध्ये २७ वी पनवेल ही महानगरपालिका स्थापन झाली़.
सर्वाधिक महानगरपालिका असणारी राज्ये –
 • महाराष्ट्र- २७
 • मध्य प्रदेश- १६
 • उत्तर प्रदेश- १४
 • बिहार- १३
 • आंध्र प्रदेश- १३
एकापेक्षा अधिक महानगरपालिका असणारे महाराष्ट्रातील जिल्हे –
 • ठाणे ६
 • पुणे २
 • नाशिक २
मुंबई महानगरपालिकेचा विस्तार मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेची सदस्य संख्या २२७ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register