Back to Course

महात्मा ज्योतिबा फुले

जन्म व शिक्षण
 • ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण व मूळ आडनाव गोर्हे हे आहे.
 • ज्योतिबा हे क्षत्रिय माळी समाजातील होते.
 • ज्योतिबांचे पूर्वज पुण्यामध्ये फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे गोऱ्हे आडनाव मागे पडून लोक त्यांना माळी म्हणून ओळखू लागले.
 • १८४० साली वयाच्या १३ व्य वर्षी ज्योतीबांचा धनकवडीच्या खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंशी विवाह झाला.
स्त्री शिक्षणाचे कार्य
 • ज्योतीबांनी समाजकार्यास सुरुवात करताना सर्वप्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले.
 • १८४८ साली त्यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
 • ३ जुलै १८५१ रोजी बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली.
 • १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
 • मुलींसाठी शाळा सुरु करण्याच्या ज्योतीबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार बाईंची मुलींसाठी शाळा काढण्याची प्रेरणा होती.
 • १८६४ साली त्यांनी पुण्यातील गोखल्यांच्या बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
 •  १८६५ साली विधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव-ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप घडवून आणला.
 • चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची सामाजिक आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतीबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.
 • ज्योतीबांना अपत्य नव्हते तर त्यांनी काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास दत्तक घेतले.
अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य
 • १९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली. १८५२ मध्ये त्यांनी अस्पृस्यांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरु केली.
 • १८५३ मध्ये पुण्यात ‘महार, मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवणारी मंडळी’ ही संस्था स्थापन केली.
 • १८६८ मध्ये त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
 • १८७३ मध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 • १८७७ मध्ये ‘दीनबंधू’ या वृत्तपत्रातून सामाजिक रूढी-परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.
महात्मा फुलेंची साहित्य संपदा
साहित्य प्रकाशित केलेल्या बाबी
तृतीय रत्न नाटक पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक
ब्राह्मणांचे कसब संधीसाधू ब्राह्मणांचे कार्य
छ. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा शिवचरित्र
गुलामगिरी गुलामांची स्थिती
शेतकऱ्यांचा आसूड शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन
सत्सार सामाजिक प्रश्न
इशारा जातीभेदाविषयी विचार
सार्वजनिक सत्यधर्म निर्मिकची (ईश्वराची) संकल्पना

 

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ज्योतीबांच्या शेवटचा धर्मग्रंथ असून हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.

गौरवोद्गार 
 • ११ मे १८८८ रोजी मुंबई जनतेच्या वतीने रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतीबांना ‘महात्मा’ ही पदवी दिली.
 • बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वाशिंग्टन असे संबोधले आहे.
 • ज्योतीबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ‘हू वेअर द शूद्राज ?’ हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला आहे.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register