Back to Course

भारतीय सामाजिक परिषद

भारतीय सामाजिक परिषद ही एकोणिसाव्या शतकात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात सुरु केलेली एक चळवळ होती.

स्थापना

  • १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस ही पूर्णतः राजकीय संस्था असावी असा निर्णय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात घेतला गेला व  न्या. रानडे यांनी डिसेंबर १८८५ मध्ये सामाजिक परिषदेचा पाया घातला.
  • या बैठकीत न्या. रानडे यांनी संस्कृत धर्मग्रंथातील अनेक वचनांच्या आधारे प्राचीनकाळी बालविवाहाची पद्धत नव्हती, बालविवाहाला पुष्टी देणारी शास्त्रवचने नंतर जोडलेली आहेत हे त्यांनी दाखवून दिले.
  • या परिषदेचे चिटणीस दि. ब. रघुनाथराव होते तर मिरजेच्या श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले.
  • मद्यपान निषेध, मुलींना शिक्षण देणे, हुंड्याची चाल मोडून काढणे, विधवा विवाहाला संमती असणे, मुलामुलींचे विवाह लहानपणी न करणे इत्यादी अटींच्या शपथपत्रावर संस्थेच्या सभासदांना सही करणे बंधनकारक होते.
सामाजिक परिषदेचे कार्य
  • न्यायमूर्ति रानडे यांनी हिंदू धर्मग्रंथांच्या आधशरे बालविवाह, केशवपन, विधवाविवाहाची अमान्यता, इत्यादी परंपरा प्रारंभीच्या समाजात प्रचलित नव्हत्या; नंतरच्या काळातच त्यांचा समावेश केला गेला हे दाखविले.
  • भारतात स्वातंत्र्यापेक्षाही सामाजिक सुधारणेच्या प्रश्नाला व त्या संदर्भात करावयाच्या कार्याला प्राधान्य द्यावे, असे न्या. रानडे यांचे मत होते.  इ. स. १८९० मध्ये संमती वयाचे बिल विधान परिषदेत आणले गेले व त्यामुळे सनातनी व सुधारक यांच्यातील वाद वाढला. अखेर इ.स. १८९१ मध्ये संमती वयाचा कायदा पास झाला.
  • इ. स. १८९६ मध्ये कलकत्ता, इ. स. १८९७ मध्ये अमरावती, इ. स. १८९८ मध्ये मद्रास, १८९९ मध्ये लखनौ व १९०० मध्ये लाहोर येथे सामाजिक परिषदेने अधिवेशने भरवून समाज जागृतीचे कार्य केले होते.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register