Back to Course

पंडिता रमाबाई

पंडिता रमाबाई
जन्म व शिक्षण 
 • पंडिता रमाबाई यांचा जन्म, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून जातीबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
 • रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.
 • त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत.
 • इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र मानल्या गेलेल्या जातीच्या वकिलांशी लग्न केले. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या.
जीवन व समाजकार्य
 • बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना केली.
 • आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीती’ हे पुस्तक लिहिले.
 • १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले.
 • भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती.
 • पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.
 • त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.
 • १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली.
 • २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
 • ११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली परंतु इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले.
 • त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला.
 • २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला.
 • त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत.
 • महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.
 • इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते.
 • पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले.
 • पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register