Back to Course

पंचायत स. अधिकार व कार्ये

पंचायत समितीचे अधिकार व कार्ये

महाराष्ट्र जिल्हा परिषद व व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०८ मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आले आहे. पंचायत समितीकडे एकूण ७५ विषय सोपविण्यात आले आहेत. त्यापैकी काही महत्वाचे पुढीलप्रमाणे –

 1. जिल्हा परिषदेस आपल्या विकास योजना तयार करता याव्यात म्हणून आपल्या कार्यक्षेञातील आवश्यक असलेल्या विकास कार्याचा आराखडा जिल्हा परिषदेला सादर करणे.
 2. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची तालुकास्तरावर अंमलबजावणी करणे.
 3. ग्रामपंचायतीला विकास कार्यांमध्ये मदत करणे.
 4. गटाशी संबंधित जिल्हा परिषदेने सोपविलेले कार्य पार पाडणे.
 5. गटासाठी मिळणार्या अनुदानातून हाती घ्यावयाच्या विकास कामांची योजना तयार करणे.
 6. विविध उद्याोगविषयक व शेतीविषयक कार्ये पार पाडणे.
 7. कर व कर्ज वसुली करणे.
 8. जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे व पशुसंवर्धनाचा विकास करणे.
 9. दर तीन महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करणे.
 10. गटविकास अधिकार्याच्या कार्यावर देखरेख व नियंञण ठेवणे.
पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधने
 1. विविध कर (व्यवसाय, पाटबंधारे,पाणीपट्टी, याञा इ)
 2. अनुदाने -पंचायत समितीच्या क्षेञानुसार शासनाकडून अनुदान मिळते.

अंदाजपञक –

 1. पंचायत समितीचे अंदाजपञक गटविकास अधिकारी तयार करतात.
 2. पंचायत समितीच्या अंदाजपञकाला अंतिम मंजुरी जिल्हा परिषद देते.
 3. जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला कर्जपुरवठा केला जातो.

हिशोब तपासणी –

पंचायत समितीची हिशोब तपासणी स्थानिक निधी लेखापालाद्वारे केली जाते व पंचायत समितीची कार्यालयीन तपासणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाते.

सरपंच समिती

तालुक्यातील ग्रामपंचायत व पंचायत समितींचा योग्य समन्वय रहावा म्हणून सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस बोंगीरवार समितीने १९७० मध्ये केली होती. ही एक सल्लागारी स्वरूपाची समिती आहे.

सदस्य संख्या १५ (१/५ सरपंचांची निवड दरवर्षी चक्राकार पद्धतीने होते)
कार्यकाल  १ वर्ष
अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
सचिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे पदसिद्ध सचिव असतात.
बैठका दरमहा एक बैठक

सरपंच समितीची कार्ये –

 1. ग्रामपंचायतींच्या कार्यात सुसूञता आणणे.
 2. ग्रामपंचायत व पंचायत समितींचा योग्य समन्वय साधणे.
 3. ग्रामपंचायतींच्या कार्यावर देखरेख व नियंञण ठेवणे.
 4. तालुका स्तरावर विकास योजना राबवताना जिल्हा परिषदेला शिफारसी करणे.

पंचायत समितीची आमसभा

पंचायत समितीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती आमसभा बोलावतात.

अध्यक्ष तालुक्यातील जेष्ठ आमदार
सचिव तहसिलदार
बैठका एका वर्षात दोन. पंचायत समितीने आमसभा जिल्हा परिषदेच्या आमसभेच्या एक महिना अगोदर घ्यावी लागते.
कार्ये १) तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेऊन जनतेला माहिती देणे.

२) आमसभेत घेतलेल्या निर्णयांची माहिती जिल्हा परिषदेला देणे.

SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register