Back to Course

जि. प. अधिकार व कार्ये

जिल्हा परिषदेचे अधिकार व कार्ये

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०० मध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकार व कार्यांचे वर्णन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकडे सुरूवातीला १२९ विषय सोपविण्यात आले होते. परंतू सध्या १२८ विषय आहेत.

 1. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध-विकास , जलसिंचनाविषयी योजना राबविणे.
 2. शेती संबंधित नवनवीन तंञज्ञान व बी-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे.
 3. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना शैक्षणिक सुविधा पुरविणे.
 4. जिल्हयातील विविध विकास योजनांना मंजुरी देणे.
 5. जिल्हयाच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्थानिक साधनसामग्रीची उपयोगिता वाढविणे.
 6. जिल्हा परिषदेच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखरेख व नियंञण ठेवणे.
 7. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व प्राथमिक आरोगयकेंद्रांची स्थापना करणे.
 8. जिल्हा स्तरावर विविध साथीच्या रोगांवर प्रतिबंधासाठी लसीकरण कार्यक्रम राबविणे.
 9. ग्रामीण भागातील रस्ते व दळणवळण विषयक सुविधा उपलब्ध करून देणे.
 10. आदिवासी लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आश्रमशाळा व मोफत वाचनालये, वसतीगृहाची व्यवस्था करणे.
 11. ग्रामीण भागातील लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे.
 12. राज्य सरकारने वेळोवेळी सोपवलेली कार्ये पुर्ण करणे.
 13. पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या कार्यांवर नियंञण ठेवणे.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाची साधने

 1. राज्य सरकार प्रत्येक जिल्हा परिषदेस विकास कार्यासाठी ७५ टक्के अनुदान देते.
 2. जिल्हा परिषद क्षेञातील महसूल उत्पन्नाच्या ७० टक्के अनुदान जिल्हा परिषदेला मिळते.
 3. जिल्ह्यातील विविध कर- पाणीपट्टी, मनोरंजन, घरपट्टी, याञाकर, बाजार इ.
 4. राज्य शासन एकूण जमीन महसूलाच्या ७० टक्के रक्कम जिल्हा परिषदेला देते.

हिशोब तपासणी –

जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी लोक लेखा समिती व संबंधित राज्याचे महालेखापाल यांच्याकडून केली जाते. कार्यालयीन तपासणी राज्य शासनाद्वारे केली जाते.

अंदाजपञक –

जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करतात व स्थायी समिती अंदाजपञकाला मंजुरी देते.

जिल्हा परिषदेची आमसभा

जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक वर्षाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमसभा बोलावतात. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी १/५ सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावली जाते.

बैठका- एका वर्षात दोन

अध्यक्ष- जिल्हा पालक मंञी

सचिव- जिल्हाधिकारी

सदस्य- खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य.

 

SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register