Back to Course

जगन्नाथ शंकरशेठ

जन्म 
 • जगन्नाथ शंकरशेठ (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५) हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते.
 • त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असे होते, तथापि ते नाना शंकरशेठ या नावानेच अधिक परिचित झाले. त्यांचा जन्म एका ब्राह्मण (सोनार) व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला.
शैक्षणिक कार्य
 • भारतात शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापन केली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.
 • एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.
 • बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले.
 • स्टुडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) स्वतःच्या वाड्यात त्यांनी चालू केली; तसेच द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल १८५७ मध्ये सुरू केले.
 • १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला.
 • सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली.
 • अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते.
 • या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी द बाँबे असोसिएशन स्थापण्यात १८५२ मध्ये पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.
सामाजिक कार्य
 • नानांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला.
 • भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.
 • याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले.
देणग्या

नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या :

 • रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,०००;
 • व्हिक्टोरिया अंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,०००;
 • जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,०००;
 • एल्‌फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि
 • जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००
जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषविलेली पदे
 1. संस्थापक अध्यक्ष – बाँम्बे असोसिएशन
 2. सभासद – बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी
 3. उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज
 4. अध्यक्ष – डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट
 5. सदस्य – सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल)
 6. सदस्य – बोर्ड ऑफ एज्युकेशन
 7. सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी
 8. विश्वस्त – एल्फिन्स्टन फंड
 9. अध्यक्ष – पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती)
 10. संस्थापक – जगन्नाथ शंकरशेठ स्कुल
 11. संस्थापक सभासद – जे. जे. आर्टस् कॉलेज
 12. सदस्य – मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ
 13. फेलो -मुंबई विद्यापीठ
 14. अध्यक्ष – हॉर्टिकल्चर सोसायटी
 15. अध्यक्ष – जिओग्राफिकल सोसायटी
 16. डायरेक्टर – बाँम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
 17. ट्रस्टी – बाँम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
 18. सदस्य – द इनलँड रेल्वे असोसिएशन
 19. संचालक /सदस्य – ग्रेट ईस्टर्न रेल्वे
 20. आद्य संचालक – रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने)
 21. संचालक – बँक ऑफ वेस्टर्न इंडिया
 22. संचालक – कमर्शिअयल बँक ऑफ इंडिया
 23. संस्थापक – द मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया
 24. संचालक/अध्यक्ष – बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना)
 25. अध्यक्ष – बादशाही नाट्यगृह
 26. पहिले देशी मॅजिस्ट्रेट

 

देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register