Back to Course

ग्रामसेवक व ग्रामसभा

ग्रामसेवक (Gramsevak)

 • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६० नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो.
 • ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो.
 • हा ग्रामपंचायतीचा पदसिध्द सचिव असतो.
 • ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग ३ चा सेवक असून मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास ग्रामविकास अधिकारी असे संबोधले जाते.एका ग्रामपंचायतीसाठी एक अथवा एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो. ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असे म्हणतात.
 
 पाञता
 1.  तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 2. तो व्यक्ती १२ वी उत्तीर्ण असावा.
 3. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मते योग्य असावा.
निवड  जिल्हा निवड समितीमार्फत
नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी
वेतन जिल्हा निधीमधून दिले जाते.
रजा किरकोळ रजा गतविकास अधिकारी देतात व अर्जित रजा मुख्य कार्यकारी अधिकारी देतात.
नियंञण जवळचे नियंञण गटविकास अधिकारी नंतरचे नियंञण मुख्य कार्यकारी अधिकारी
राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
बडतर्फी  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

ग्रामसेवकाचे अधिकार व कार्ये

 1. गावातील जन्म, मृत्यू व विवाह यांच्या नोंदी ठेवणे.
 2. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज पाहणे.
 3. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख व नियंञण ठेवणे.
 4. गावातील विविध कर गोळा करणे.
 5. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
 6. ग्रामसभेचे आयोजन करणे व कामकाजाचा इतिवृतांत लिहिणे.
 7. ग्रामपंचायतीचा वार्षिक अहवाल, आर्थिक हिशोब पंचायत समितीव जिल्हा परिषदेला सादर करणे.
 8. ग्रामपंचायतीचा पञव्यवहार, नोंदणी, पुस्तके व अभिलेख सांभाळणे.
 9. ग्रामपंचायतीचे अंदाजपञक तयार करणे.
 10. गावाचा ग्रामनिधी सांभाळणे.
 11. ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व सभांचे इतिवृत्त लिहिणे.
 12. शासनाच्या विविध योजनांची माहिती वेळोवेळी गावकऱ्यांना देणे.

ग्रामसभा (Gramsabha)

भारतामध्ये प्राचीन काळापासुन ग्रामसाबेचे अस्तित्व आढळुन येते.सुरूवातीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६ मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली होती. १९९२-९३ सालीत करण्यात आलेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीने राज्य घटनेच्या कलम २४३ (A) मध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामसभा हा थेट लोकशाही प्रणालीच्या अंमलबजावणीचा मुलभूत पाया आहे. ग्रामसभेमुळे ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिक लोकाभिमुक, जबाबदार व पारदर्शक होण्यास मदत होते. यामुळेच ग्रामसभेला लोकशाहीची शेवटची कडी मानली जाते.

 1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६ मध्ये ग्रामसभेचा उल्लेख करण्यात आला आहे.
 2. १९९२ सालि झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीमुळे ग्रामसभांना घटनात्मक दर्जा प्राप्त होऊन भारतीय राज्य घटनेच्या कलम २४३ (A) मध्ये ग्रामसभेचा उल्लेख करण्यात आला आहे.

ग्रामसभेची रचना

सदस्य  ग्रामपंचायत क्षेञातील १८ वर्षावरील सर्व प्राैढ नागरिक

अध्यक्ष – सरपंच

आयोजन – ग्रामसेवक ( आदेश सरपंच देतात.)

नोटीस – ग्रामसभा बोलावण्याचा अधिकार सरपंचास असतो. ग्रामसभेची नोटीस किमान ७ दिवस अगोदर काढली जाते. सर्वसाधारण सभेची नोटीस किमान ४ दिवस अगोदर काढली जाते.

गणपूर्ती – गावातील एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के किंवा १०० इतकी असावी.

बैठका – ग्रामसभेच्या एका वर्षात किमान ४ बैठका घेणे आवश्यक असते. १)२६ जानेवारी  २)१ मे  ३)१५ ऑगस्ट  ४)२ ऑक्टोबर

SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register