Back to Course

गटविकास अधिकारी

गट विकास अधिकारी (BDO)

गट विकास अधिकारी पंचायत समितीचे पदसिध्द सचिव व प्रशासकीय प्रमुख असतात.

निवड  MPSC द्वारे
नेमणूक  राज्यशासन
दर्जा वर्ग १ व वर्ग २
नियंञण राजकीय- पंचायत समिती सभापतीप्रशासकीय-मुख्य कार्यकारी अधिकारी
रजा राज्यशासन
वेतन राज्यशासन
राजीनामा राज्यशासन
बडतर्फी राज्यशासन
दुवा पंचायत समिती व राज्यशासन यांच्यामधील दुवा

गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकार व कार्ये

  1. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहणे.
  2. पंचायत समितीच्या सभांचे, कामकाजाचे नियम तयार करणे व सभांचे इतिवृतांत लिहिणे.
  3. पंचायत समितीच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करणे.
  4. सभापतींच्या निर्देशांनुसार पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे.
  5. पंचायत समितीला मिळणाऱ्या अनुदानातून रक्कम काढणे व ती विकासकामांवर खर्च करणे.
  6. शासनाच्या आदेशानुसार विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
  7. पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करून तो जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविणे.
  8. पंचायत समितीचे अभिलेख सांभाळणे.
  9. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविणे.
  10. ग्रामसेवकास किरकोळ रजा मंजूर करणे.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register