Back to Course

केवलप्रयोगी अव्यय

मनातील उत्कट भावना व्यक्त करताना जे उद्गार वापरले जातात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार 
 • हर्षदर्शक – वा-वा, आ-हा, ओ-हो, अहा, अहाहा इ.
 • शोकदर्शक – हाय, हाय-हाय, अरेरे, देवा रे, हरहर, शिव-शिव, रामा रे, अगाई, आई गं, ऊं, अं इ.
 • आश्चर्यदर्शक – बाप रे, अबब, अहाहा, ओहो, ऑ, अरेच्चा इ.
 • प्रशंसादर्शक – शाब्बास, फक्कड, छान, भले, वाहवा, ठीक, खाशी, य़ंव इ.
 • संमतिदर्शक – बराय, ठीक, अच्छा, जीहां, जी, हां इ.
 • विरोधदर्शक – छट, छे छे, हॅट, अंहं, उंहू, ऊः , च इ.
 • तिरस्कारदर्शक – फुस, इश्श, हुडत, हुड, हत्, छत्, छी, शी, थुः , धिक् इ.
 • संबोधनदर्शक – अगा, अगो, अहो, अरे, बा, रे, अगं इ.
 • मौनदर्शक – गप, चूप, गुपचूप, चुपचाप इ

 

व्यर्थ उद्गारवाचक अव्यये

जी उद्गारवाचक अव्यये कोणताही भाव व्यक्त करत नाहीत व त्यांच्या वाक्यातील अस्तित्वामुळे वाक्यावर कोणताही परिणाम होत नाही त्यांना व्यर्थ उद्गारवाचक अव्यये असे म्हणतात. उदा. बापडा, म्हणे, आपला, वेडे इ.

 1. तुम्ही मोठी माणसं ! मी बापडा काय बोलणार.
 2. तिला म्हणे आज मोठ्या रकमेची लॉटरी लागली.
 3. तो आपलं काहीही वाकड करू शकणार नाही.
 •  बोलताना विनाकारण उगीचच पुनःपुन्हा आलेल्या शब्दांना पादपूरणार्थ केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात. उदा. आत्ता, आणखीन, बरंका इ.
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register