Back to Course

काळ

वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, याचा बोध जो होतो, त्याला काळ असे म्हणतात. काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत.

 1. वर्तमानकाळ –  अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)साधा  ड) रीति
 2. भूतकाळ      – अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)रीति  ड) रीति
 3. भविष्यकाळ  –  अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)रीति  ड) रीति

अपूर्ण काळ

वाक्यातील क्रियेची अपूर्णता दाखविण्यासाठी अपूर्ण काळ वापरतात. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शविणारे धातूसाधित व त्यापुढे असे या सहाय्याक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. उदा. १) ती मुलगी नाच.

या शब्दांपासून अपूर्ण काळातील वाक्ये पुढीलप्रमाणे-

 • ती मुलगी नाचत आहे. (अपूर्ण वर्तमानकाळ)
 • ती मुलगी नाचत होता. (अपूर्ण भुतकाळ)
 • ती मुलगी नाचत असेल. ( अपूर्ण भविष्यकाळ)

पूर्ण काळ

वाक्यातील क्रियेचे पूर्णत्व दर्शविण्यासाठी पूर्ण काळ वापरतात. पूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रियेचे पूर्णत्व दर्शविणारे धातूसाधित व त्यापुढे अस या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. उदा. मधू लाडू खा.

या शब्दांपासून पूर्ण काळातील वाक्ये पुढीलप्रमाणे-

 • बाळ्याने पेरू खाल्ला आहे. (पूर्ण वर्तमानकाळ)
 • बाळ्याने पेरू खाल्ला होता. (पूर्ण भूतकाळ)
 • बाळ्याने पेरू खाल्ला असेल. (पूर्ण भविष्यकाळ)

साधा काळ आणि रीति काळ

एखादी क्रिया सतत घडत असल्याचे दर्शविण्यासाठी तिन्ही काळात ती क्रिया सतत घडत असल्याचे दर्शविणारे क्रियापद वापरले तर साधा काळ होतो आणि तिच क्रिया दर्शविण्यासठी संयुक्त क्रियापद वापरल्यास रीति काळ होतो.

 • राणी टेनिस खेळते. ( साधा वर्तमानकाळ)
 • राणी टेनिस खेळत असते. ( रीति वर्तमानकाळ)
 • राणी टेनिस खेळायची. (साधा भूतकाळ)
 • राणी टेनिस खेळत असे. (रीति भूतकाळ)
 • राणी टेनिस खेळेल. (साधा भविष्यकाळ)
 • राणी टेनिस खेळत जाईल. (रीति भविष्यकाळ)

भाषेचा व्यवहार करताना काळाचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळुन येतो. शिवाय त्यातही विविध सुक्ष्म छटा आढळतात. भाषेचा अभ्यास करताना काळाचे विशेष उपयोग पुढीलप्रमाणे-

१) वर्तमानकाळाचे उपयोग
 • सर्वञ सत्य असलेले विधान करताना, ञिकालबाधित सत्य सांगताना, शास्ञीय नियम, नित्य घटना, सुविचार, म्हणी सांगताना साधा वर्तमानकाळ वापरतात. उदा.
 1. सूर्य पूर्वेस उगवतो.
 2. सोमवारनंतर मंगळवार येतो.
 3. पाण्याचा उत्कलनांक १०० अंश सेल्सियस आहे.
 4. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
 5. सुंदर अक्षर हा विद्यार्थ्याचा सर्वात मौल्यवान दागिना आहे.
 • भूतकाळातील घटना सांगताना काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात. अशा काळाला ऐतिहासिक वर्तमानकाळ म्हणतात. उदा.
 1. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. (म्हणजेच म्हणाला होता.)
 2. महाराज तलवार उपसतात व शञूवर हल्ला करतात.
 • लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात. यामध्ये संनिहित भविष्यकाळ असतो. अशी वाक्ये शक्यतो आज्ञा किंवा कृती या प्रकाराची असतात. उदा.  तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. (म्हणजेच मी येईन.)
 • भूतकाळात काढलेले उद्गार दर्शवताना ती वर्तमानकाळात अवतरणचिन्हे वापरून लिहिण्याची पद्धत आहे. उदा. समर्थ रामदास म्हणतात, “जगी सर्व सुखी असा कोण आहे. ”
 • लगतचा भूतकाळ सांगताना काही वेळा वर्तमानकाळ वापरला जातो. उदा. मी बसतो (बसलो होतो) तोच तुम्ही हजर.
२) भूतकाळाचे उपयोग
 • ताबडतोब घडणार असलेली क्रिया दर्शवण्यासाठी काही वेळा क्रियापदाचे भूतकालीन रूप वापरतात. यामध्ये संनिहित भविष्यकाळ असतो. उदा. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच (येईन)
 • एखादी क्रिया भविष्यकाळात खाञीने होणार, या अर्थी कधी कधी भूतकाळी रूपे वापरतात. अशा वाक्याला निःसंशय भविष्यकाळ म्हणतात. उदा. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज.(खाञी)
 • संकेत व्यक्त करायचा असल्यास. उदा. पाऊस आला (येईल) तर ठीक.
 • वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहेत अशा अर्थी. उदा. तो बघ, तुझा मिञ आला.
३) भविष्यकाळाचे उपयोग
 • काही वेळा संकेत व्यक्त करायचा असल्यास. उदा. तू मदत देशील तर मी आभारी होईन.
 • काही वेळा अशक्यता दर्शवताना. उदा. सगळेच मूर्ख कसे असतील? (अशक्यता)
 • काही वेळा संभावना व्यक्त करताना. उदा. गुरूजी आत शाळेत असतील. (असण्याचा संभव)
 • काही वेळा इच्छा व्यक्त करताना. उदा. मला दोन रूपये हवे होते. (आहेत)
SEE ALL Add a note
YOU
Add your Comment

Login

Create an Account Back to login/register