Uncategorized :: Current Affairs

Test Page

Android App updated

We have updated Spardha Pariksha App. If you are still using old version of Spardha Pariksha App, We request you to update this App. Click button below to update this App from Google Play Store.

 

 

 

 


Spardha Pariksha - MPSC

विरामचिन्हे

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे लक्षात  येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात,त्यांना विरामचिन्हे म्हणतात. विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.

प्रकार चिन्ह नियम/ उपयोग उदा.
पूर्णविराम (.) याचा वापर वाक्य पूर्ण झाले की करतात.
 1. आज दसरा आहे.
 2. येथून निघून जा.
 3. रमा ला कन्या प्राप्ती झाली.
स्वल्प विराम (,)
 1. वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी.
 2. मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी
 3. समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.
 4. एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.
 5. वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो.
 1. आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले.
 2. पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली,कोकिळा गाऊ लागली, गायी हंबरू लागल्या, वासरे बागडू लागली.
 3. विद्यार्थी मित्रांनो , प्रिया म्हणाली, मी आज येणार नाही.
 4. कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
अर्धविराम (;)
 1. ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात.
 2. संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.
 3. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता.
 1. ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.
 2. त्या देशात राजा होता; तरी सत्ता लोकांच्या हाती होती.
 3. ‘वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही; परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्वं संपत्ती उधळून टाकली.’
अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत : ९, १२, १८, २२.
प्रश्नचिन्ह (?)
 1. याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो.
 2. वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते.
 1. रमाची परीक्षा कधी आहे?
 2. सुरेशचे लग्न कधी होणार?
उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.
 1. शाब्बास, असाच अभ्यास कर!
 2. छान, हीच खरी देशसेवा आहे!
अवतरण चिन्ह (“ ’’)
(‘ ’)
 1. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
 2. एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
 1. अहमदनगर हे ‘ ऐतिहासिक ’ शहर आहे.
 2. “ आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
संयोगचिन्ह (-)
 1. एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
 2. एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
 1. अहमदनगर हे ‘ ऐतिहासिक ’ शहर आहे.
 2. “ आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
अपसरण चिन्ह (-)
 1. पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात.
 2. विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.
 1. भक्तीने वाहिलेली फुले – मग ती कोणतीही असोत – देवाला प्रियच वाटतात.
 2. दशरथाचे पुत्र चार – राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न

लेखन करताना विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असा आहे. जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. म्हणून लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा वापर करावा.

Quiz – 6 नदीप्रणाली व कोकण (भूगोल)

1. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकर्यातून उभा राहिला?
2. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे ----------- यांनी निश्चित केली आहे.
3. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते?
4. खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत? अ) सरळ समुद्र किनारा ब) विस्तीर्ण समुद्र बुड क) सहकारी संस्था ड) सरकारी आधार
5. जोड्या जुळवा.
नदी   उपनदी
(अ) तापी(१) तावरजा
(ब) मांजरा(२) घोडा
(क) प्रवरा(३) मुळा
(ड) भीमा (४) अनेर
 

 

                                       
6. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?
7. महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
8. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?
9. महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
10. सातपुडा पर्वरांगामुळे ---- व ----- नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

 

Quiz 5 – जीवशास्ञ (विज्ञान)

Please go to Quiz 5 – जीवशास्ञ (विज्ञान) to view this test

[Quiz-4] अंकगणित- सरासरी

Please go to [Quiz-4] अंकगणित- सरासरी to view this test

Quiz-3 1857 चा उठाव

Please go to Quiz-3 1857 चा उठाव to view this test

Quiz-2 [Indian Polity]

Please go to Quiz-2 [Indian Polity] to view this test

Current Affairs Quiz-1

Please go to Current Affairs Quiz-1 to view this test

Sample Test

Please go to Sample Test to view this test
error: