Science :: Current Affairs

चुंबकत्व(MAGNETISM)

या प्रकरणात आपण चुंबकत्व(MAGNETISM), विद्युत धारा व चुंबकीय क्षेत्र,  फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम(Fleming’s left hand rule), विद्युत चालित्र(Electric motor),विद्युत चुंबकीय प्रवर्तन(Electromagnetic Induction), विद्युत जनित्र(जनरेटर) चा अभ्यास अकारण आहोत.

“चुंबक त्याजवळ असलेल्या लोखंडास स्वतःकडे आकर्षीत करते, चुंबकाच्या या गुणधर्मास चुंबकत्व असे म्हणतात.”

चुंबकीय बलरेषा(Magnetic lines of force)

ज्यावेळी एखाद्या चुंबकाभोवती लोहकीस पसरवला असता ते एका विशिष्ट रेशेनी चुंबकाला घेरते या रेषा चुंबक आणि लोहकीस यांच्यातील बलामुळे तयार होतात यास चुंबकीय बलरेषा म्हणतात.

आकृती:

 

 


चुंबकचा शोध:

इ.स. पूर्व ८०० ते ६०० या काळात मौग्नेशिया या आशिया मायनर भागातील रहिवाशांना एक दगड सापडला. या दगडाला लोखंडाला आकर्षित करण्याचा गुणधर्म होता, पुढे याच दगडाला गावातल्या लोकांनी मैग्नेटाईट असे नाव दिले. आणि पुढे हे नाव मौग्नेट म्हणून रूढ झाले.

 


 

चुंबकीय बलारेषांचे गुणधर्म

 • चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरुवात उत्तर धृवापासून होते व शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो.
 • चुंबकीय बलरेषा कोणत्याही बिंदूपाशी काढलेली लांबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते.
 • दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत.
 • जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा अभिक घट्ट असतात तर कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा विरळ असतात.
 • सारख्या ध्रुवास जवळ आणले असता ते परस्परांपासून दूर ढकलले जातात, याला चुंबकीय प्रतिकर्षण म्हणतात.
 • विरुद्ध ध्रुव जवळ आणले असता ते एकमेकांना जवळ खेचतात याला चुंबकीय आकर्षण म्हणतात.
 • एखादा चुंबक कितीही बारीक बारीक कपात गेला तरी त्याला दोन ध्रुव असतात.

 


विद्युत धारा व चुंबकीय क्षेत्र(Electric current and Magnetic field):

 • जर एखाद्या वाहक तारेतून विद्युत धारा जात असेल, तर त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हा गुणधर्म  ओरस्तेड यांनी शोधून काढला.
 • आणि विद्युत आणि चुंबकत्व परस्परांशी संबंधित आहेत हे सिद्ध केले.
 • जेवढी जास्त विद्युत धारा तेवढे जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्र.

उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम:

“जेंव्हा आपल्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असता. आपला ताठ अंगठा विद्युत धारेची दिशा दर्शवतो व उर्वरित वाहकाभोवती असलेली हाताची बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. यालाच उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणतात.”

 

वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुके निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र:

 • वर्तुळाकार मार्गावरील प्रत्येक बिंदुजवळ सामकेंद्री  वर्तुळांच्या रुपात चुंबकीय रेषा आढळतात.
 • जस जसे तारेपासून दूर जावे तास तसे वर्तुळे मोठी होत जातात.
 • त्या तारेतील जेवढी धारा असते त्याच्याच समानुपाती चुंबकीय क्षेत्र असते.
 • तयार होणारे चुंबकीय बल बेरजेने वाढत जाते.

 

नालकुंतलातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र :

 • विसंवाहक वेष्टन (insulated wrapped) असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे गुंडाळून तयार केलेल्या वृत्तचीतीस नालकुंतल म्हणतात.
 • यात तयार होणारे चुंबकीय क्षेत्रचे गुणधर्म हे पट्टी चुंबक क्षेत्रा प्रमाणेच असतात.
 • नालकुंतालाच्या सहाय्याने आपण दिलेल्या पदार्थाच्या दांड्यामध्ये चुंबकत्व निर्माण करू शकतो.
 • जर दिलेला दांडा पोलादी असेल तर अधिक प्रभावी चुंबक क्षेत्र तयार करून कायम स्वरूपी चुंबक तयार करता येते.
 • सर्वसाधारणपाने कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी कार्बन स्टील(पोलाद), क्रोमियम स्टील, कोबाल्ट आणि टंगस्टन स्टील असे संमिश्र वापरतात.
 • साधारणतः औद्योगिक क्षेत्रात निपरमैग आणि अल्निको दोन संमिश्र वापरतात.
  • नीपरमैग – लोखंड + निकोल + अल्युमिनिअम + टायतौनिअम
  • आल्निको – अल्युमिनिअम + निकोल + कोबाल्ट
 • सूक्ष्मश्रवनी, ध्वनिवर्धक, विजेवर चालणारी घड्याळे ऑमीटर, व्होल्ट मीटर, स्पीडोमीटर सारखी उपकरणे यामध्ये अशाप्रकारे तयार केलेले संमिश्रांचे कायम चुंबक वापरतात.

 

विद्युत धारा(Current Electricity)

या प्रकरणामध्ये आपण विद्युत धारा(Current Electricity) संबंधी माहिती घेणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच क्रिया या विजेवर अवलंबून असतात. काही महत्वाच्या कार्यास २४ तास वीजपुरवठा लागतो, म्हणूनच त्याचे महत्व लक्षात घेता तो विविध पर्यायाने पुरविला जातो.

सुमारे २५०० वर्षांपूर्वी श्लेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या लाक्षत आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा (अंबर) लोकरी कापडाने घासला तर त्या दंड्याकडे पिसे आकर्षित होतात. अंबराला ग्रीक भाषेत इलेक्ट्रोन म्हणतात.  अंबराच्या या गुणधर्माला थोमास ब्राऊनने १६४६ साली इलेक्ट्रीसिटी असे नाव दिले.

 

विद्युत धारा(Electric Current)

धातूच्या विद्युत वाहकात(Electric Conductor) साधारणतः एक किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोन हे अनुकेंद्राशी अतिशय क्षीण बलाने बद्ध (Loosely bound) आसतात. अशा एलेक्ट्रोन्स ला मुक्त इलेक्ट्रोन असे म्हणतात. वाहकामध्ये अशे एलेक्ट्रोन्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहज जाऊ शकतात.

“वाहकामधून वाहणारा एलेक्ट्रोनचा प्रवाह किंवा ठराविक क्षेत्रातून एकक कलावधीत वाहणारा विद्युत प्रभार(Electric charge) म्हणजेच विद्युत धारा होय.”

 • सूत्र विद्युत धारा(I) = विद्युत प्रभार(Q)/काळ (t)
 • विद्युत प्रभाराचे SI पद्धतीचे एकक कुलोम(c) आहे.
 • विद्युत धारेचे SI पद्धतीचे एकक अम्पिअर आहे. १ अम्पिअर = १ कुलोम / १ सेकंद

आंद्रे अम्पिअर

 


 

विद्युत परिपथ(Electric Circuit)

विद्युत घाटाच्या(Battery Cell ) दोन्ही अग्रंमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध(Resistance) यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ होय.

 • ज्या आकृतीमध्ये चिन्हांचा उपयोग करून विद्युत परिपथ दर्शवितात त्यास विद्युत परिपथाकृती(Circuit Diagram) असे म्हणतात.
 • इलेक्ट्रोन चा प्रवाह हा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असतो परंतु विद्युत धारेची दिशा मात्र धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते.

विद्युत परीपाथाकृती:

 

विद्युतपरीपाथातील चिन्हे व विद्युत परिपथ:

 

 


 

विद्युत विभव(Electric Potential)

जर एखाद्या तारेतून विद्युत धारा वाहायची असेल तर त्या तारेच्या दोन्ही टोकांमध्ये विद्युत विभव असणे गरजेचे आहे.

म्हणजेच जर अ टोकाकडून ब टोकाकडे विद्युत धारा वाहत असेल तर तेंव्हा अ या टोकाकडे ब तोकापेक्षा जास्त विद्युत विभव असते.

उदा- आकाशात चमकणाऱ्या विजेचा प्रकाशझोत हा नेहमी आकाशाकडून जमिनीकडे असतो. म्हणजेच आकाशाचा विभव जास्त असतो तर जमिनीचा विभव शून्य असतो. (विजेमुळे हवेतील ओक्सिजन चे रुपांतर ओझोन मध्ये होते.)

या प्रकारात 107 व्होल्ट्स इतके विभव निर्माण होऊ शकते.


 

विभवांतर(Potential Difference)

“विद्युत क्षेत्रातील दोन भिन्न बिन्दुमधील विभवांतर म्हणजे – एकक धन प्रभार(Unit positive charge) एका बिंदुपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरीत होताना घडलेले एकूण कार्य.”

 • सूत्र – विभवांतर(V) = कार्य(W)/स्थानांतरीत झालेला एकूण प्रभार(Q)
 • 1V = 1J/1Q
 • SI एकक  Volt

 

विद्युत रोध(Resistance)

जेव्हा एखाद्या वाहकातून विद्युत धारा वाहते तेंव्हा इलेक्ट्रोन चे वाहन होते. हे इलेक्ट्रोन वाहकातील आणू आणि अयानावरआदळतात.यामुळे यामुळे एलेक्ट्रोंच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो. या अडथळा निर्माण करण्याच्या गुणधर्मास विद्युत रोध असे म्हणतात.

 • रोध = विधावंतर / विद्युत धारा
 • ज्या पदार्थाचा विद्युत रोध कमी असतो त्यातून जास्त धारा वाहते, त्यास विद्युत सुवाहक(conductor) असे म्हणतात. उदा – चांदी, तांबे, अल्युमिनिअम.
 • जर पदार्थाचा विद्युत रोध जास्त असेल त्यातून कमी धारा वाहते, त्यास विसंवाहक (Insulator) असे म्हणतात. उदा – लाकूड.

 

ओहम चा नियम(Ohm’s Law)

“वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना(तापमान, क्षेत्रफळ) वाहकातून वाहणारी विद्युत धारा हि त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभावानातारशी (Potential Difference) समानुपाती(Directly Proportional) असते.”

 • V X I
 • V = IR
 • R हा त्या वाहकाचा रोध असून तो दिलेल्या वाहकासाठी स्थिर असतो.
 • SI पद्धतीत रोडचे एकक ओहम आहे.

 


 

रोधकता(Resistivity)

वाहकाचा रोध हा नेहमी त्याच्या लांबी आणि क्षेत्रफळावर अवलंबून असतो.

i.e. R = e. l/A

l – वाहकाची लांबी

e – ऱ्हो स्थिरांक

 • ऱ्हो या स्ठीरांकास वाहकाची रोधाकता असे म्हणतात, त्यालाच विशिष्ठ रोध(Specific Resistance) असेही म्हणतात.
 • रोधाकाचे SI पद्धतीत एकक ओहम-मीटर आहे.
 • जस जसे तापमान वाढवावे तसतसे वाहकाची रोधाकता वाढत जाते.
 • पदार्थाची जितकी रोधाकता कमी तितकी जास्त धारा त्यातून वाहिली जाईल.
 • रोधाकतेचा क्रम = वाहक(Conductor) –> संमिश्र(Alloy) –> विसंवाहक(Insulator)

table:

 

 

 


 

रोधाची जोडणी(Resistance of system)

रोडची जोडणी दोन प्रकारे करता येते –

१. एकसर जोडणी(Series)

 • विद्युत धारा : परीपाथातील प्रत्येक भागातून समान धारा वाहते.
 • परिणामी रोध: जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे एवढा असतो. Rs = R1 + R2 + …. + Rn
 • विभवांतर: जोडणीच्या दोन तोकातील विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यानच्या विभावांताराच्या बेरजेइतका असतो.
 • हि जोडणी परीपाथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात.
 • रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त असतो.

 

२. समांतर जोडणी(Parallel)

 • विद्युत धारा: प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा हि रोडच्या व्यस्त प्रमाणात असते.
 • परिणामी रोध: जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यास्तान्काची बेरीज ही परिणामी रोधाच्या व्यास्तंकाइतकी असते. १/Rp = १/R1 + १/R2+….+ १/Rn
 • विभवांतर: प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते.
 • हि जोडणी परीपाथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात.
 • रोधाच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील स्वतंत्र रोधापेक्षा कमी असतो.

 

 


 

ज्युलचा नियम(Joule’s Law)

“वाहकातून वाहणारी विद्युत धारा I हि t या कालावधीसाठी R रोध असलेल्या वाहकातून जाऊ दिल्यास तयार होणारा उष्मा H बरोबर असतो”

H = I2Rt/४.18 कॅलरी

 • म्हणजेच उष्मा हि विद्युत धारेचा मार्ग, वाहकाचा रोध, कालावधी यांच्याशी समानुपाती(Directly Proportional) असतो.
 • हा तयार होणारा उष्मा आपण वेगवेगळ्या सूत्रांनी दर्शवू शकतो.

H = V2t/४.18 कॅलरी = VIt/४.18 कॅलरी

 


 

विद्युतरोधाचा औष्णिक परिणाम(Heating effect of electric current)

ज्यावेळी एखाद्या वाहकातून इलेक्ट्रोनचे वाहन होते त्यावेळी हे इलेक्ट्रोन धातूतील इतर अनुवर आघात करतात. या एलेक्ट्रोंच्या अंगी असलेल्या स्थितीज उर्जेच्या काही भागाचे उष्णता उर्जेत रुपांतर होते(Potentral Energy to Heat energy).

त्यामुळे वाहकाचे तापमान हळू हळू वाढत जाते यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात.

 • विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे व्यावहारिक उपयोग –
  • विद्युत इस्त्री, विद्युत ओव्हन, विद्युत टोस्टर, विद्युत जालतापक.
  • विद्युत दिवा:
   • यामध्ये टंगस्टन सारख्या धातूच्या तारेचे कुंडल असते.
   • हि तर तापल्यामुळे प्रकाश मिळतो.(द्र्वनांक – 33800० 0 C)
   • या कुंडलाची आयुमर्यादा वाढवण्यासाठी दिव्यामध्ये आर्गोन व नायट्रोजन या सारख्या निष्क्रिय वायूचे मिश्रण असते. ज्यामुळे कुंडलाचे ओक्सिडेषण होत नाही.
  • वितळतार:
   • कोणत्याही विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युत धारा जाऊ नये म्हणून परीपाथात वितळतार वापरतात.
   • हि तर साधारणतः कमी द्र्वनांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेली असते. शिसे व कथिल(Lead and tin)
   • हि तर उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात.
   • जर परिपाठातून ठराविक पर्यादेपेक्षा जास्त विद्युत धारा जाऊ लागली तर या तारेचे तापमान वाढते व तर वितळते.
   • हि तर नेहमी पोर्सेलीन सारख्या रोधक पदार्थापासून बनलेल्या खोबणीत बसवलेली असते.
   • घरगुती वापरासाठी १A, २A, ३A, ४A, 5A  आणि १०A एवढ्या क्षमतेच्या विताळतारा वापरतात.
  • उद्योगधंद्यामध्ये झळकाम (Soldering) जोडकाम(Welding), कर्तन(Cutting), वेधन(Drilling), आणि विद्युत भट्टी या सर्वांचे काम विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर चालते.
  • शस्त्रक्रियेमध्येशरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली प्लाटिनम ची तर वापरतात.

 

जीवाणू, विषाणू आणि रोग ( Bacteria, Virus & Diseases)

जीवाणू, विषाणू आणि रोग ( Bacteria, Virus & Diseases) यांच्याबद्दल अभ्यास करूयात.

जीवाणू (Bacteria)

 • आकाराने मोठे, एकपेशीय, अकेंद्रकी व मुक्त गुणसुञे अशी यांची काही वैशिष्ट्ये.
 • पृथ्वीवर जीवाणूंचे अस्तित्व मानवापेक्षा जास्त काळापासून आहे.
 • जीवाणू हे कुठल्याही वातावरणात तग धरू शकतात. जसे की, जमिनीमध्ये खोलावर, अंतराळात, उकळत्या पाण्यात, अतिशय थंडगार पाण्यात, सल्फुरिक आम्लात इ.

जीवाणूजन्य रोग

१) विषमज्वर (Typhoid)

 • जीवाणू – सालमोनेला टायफी
 • प्रसार – दूषित अन्न व पाणी, घरमाशीद्वारे
 • अवयव – आतड्यांचा प्रादुर्भाव
 • लक्षणे – मळमळ, डोकेदुखी, अतसार, भूक मंदावणे, खूप ताप येणे (१०४ F), पोटावर व छातीवर पूरळ येणे.
 • उपचार – निदान करण्यासाठी विडाल टेस्ट, आैषध म्हणून क्लोरोमासेटीन, व लसीकरणासाठी TAB लस ०.५  ml.

२) क्षयरोग (Tuberculosis)

 • जीवाणू – मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली
 • प्रसार – थुंकीद्वारे, हवेद्वारे
 • अवयव – विशेषतः फुप्फुसावर प्रादुर्भाव
 • लक्षणे – तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळापासून गंभीर ताप येणे, खोकला, वजन कमी होणे, अशक्तपणा किंवा थकवा आणि रक्त थुंकणे.
 • उपचार – निदान करण्यासाठी X-Ray, आैषध म्हणून स्ट्रेप्टोमायसीन व लसीकरणासाठी बी. सी. जी.

३) काॅलरा (Cholera)

 • जीवाणू – विब्रीआे काॅलरा
 • प्रसार – दूषित अन्न व पाणी
 • लक्षणे – पोटदुखी, उलट्या, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, पायांत गोळे येणे
 • उपचार – आैषध म्हणून ORS (Oral Rehydration Solution) व लसीकरणासाठी हाफकीनची लस

४) घटसर्प (Diptheria)

 • जीवाणू – काॅर्निबॅक्टेरियम डिप्थेरी
 • प्रसार – हवेमार्फत
 • अवयव – श्वसनसंस्था
 • लक्षणे – श्वासोच्छवासाला ञास होणे, घसा लाल होणे
 • उपचार – आैषध म्हणून पेनिसीलीन व लसीकरणासाठी ञिगुणी लस

५) डांग्या खोकला (Whooping cough/Pertusis)

 • जीवाणू – हिमोफिलस परट्युसीस
 • प्रसार – हवेमार्फत
 • अवयव -श्वसनसंस्था
 • लक्षणे – तीव्र  खोकला, छातीत दुखणे
 • उपचार – लसीकरणासाठी ञिगुणी लस

६) धनुर्वात (Tetanus)

 • जीवाणू – क्लाॅस्ट्रिडियम टिटॅनी
 • प्रसार – अोल्या जखमेतून
 • अवयव – मध्यवर्ती चेतासंस्था
 • लक्षणे – ताप, तीव्र वेदना, दातखिळी बसणे
 • उपचार – लसीकरणासाठी ञिगुणी लस

७) न्यूमोनिया (Pneumonia)

 • जीवाणू – डिप्लोकोकस न्युमोनी
 • प्रसार – हवेमार्फत
 • अवयव – फुप्फुसावर सुज येणे
 • लक्षणे – छाती दुखणे, श्वसनासाठी ञास, थंडी वाजून येणे, ताप आणि घाम येणे आणि खोकला (सूखी किंवा कफ).
 • उपचार – आैषध पेनिसीलीन

८) कुष्ठरोग (Leprosy)

 • जीवाणू – मायकोबॅक्टेरियम लेप्रि
 • प्रसार – रक्त, द्रवबिंदू
 • अवयव – परिघीय चेतासंस्था
 • लक्षणे – त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर चट्टे, सुरकत्या पडणे, बोट झडणे
 • उपचार – आैषध म्हणून Dapsone, Quinolones, Rifampicin , लस उपलब्ध नाही.

विषाणू (virus)

 • विषाणू हे नाव पॅस्टिअर (Pasteur) या शास्त्रज्ञाने दिले.
 • विषाणूंना ठराविक पेशीरचना नसल्यामुळे ते अपेशीय (Non Cellular)  स्वरूपाचे असतात व विषाणूंमध्ये पेशीरस, पेशीभित्तिकाही नसते.
 • विषाणूंमध्ये एकतर DNA असतात किंवा RNA असतात, दोन्ही एकञ असत नाहीत.
 •  सर्वच विषाणू घातक असतात व यांच्यामुळे वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण होतात.
 • विषाणूंचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने पाहिले जाऊ शकतात.

विषाणूजन्य रोग

१) कांजण्या (Chicken pox)

 • विषाणू – व्हॉरिसेल्ला झोस्टर
 • प्रसार – संपर्क, द्रवबिंदू
 • अवयव – त्वचा
 • लक्षणे – पूर्ण त्वचेवर पाण्यासारखे फोड येणे
 • उपचार – वॅरिसेला विरोधी लस
 • हा रोग एकदा होऊन गेल्यावर दुसर्यांदा होत नाही. त्याची रोगप्रिकारक क्षमता जन्मभर टिकते.

२) देवी रोग (Small pox)

 • विषाणू -वॅरिआेला
 • प्रसार – द्रवबिंदूंच्या मार्फत
 • अवयव -त्वचा
 • लक्षणे -आंधळेपणा, ताप, अंगावर पुरळ
 • उपचार – देवीची लस

३) गोवर (Measles/Rubeola)

 • विषाणू – मिस्कोवायरस
 • प्रसार -हवा, द्रवबिंदू तसेच संपर्कामार्फत
 • अवयव -त्वचा
 • लक्षणे -लाल रंगाचे पुरळ, ताप
 • उपचार -MMR ञिगुणी लस

४) पोलिआे (Polio)

 • विषाणू -एन्ट्रो वायरस
 • प्रसार -दूषित अन्न व पाणी
 • अवयव – मध्यवर्ती चेतासंस्था
 • लक्षणे -अशक्तपणा, ताप, घसा लाल होणे
 • उपचार – साल्क व सॅबिन या दोन लसी उपलब्ध.

५) स्वाईन फ्ल्यू (Swine flu)

 • विषाणू -H1  N1 (पॅन्डेमिक)
 • प्रसार – हवा
 • अवयव – श्वसनसंस्था
 • लक्षणे – ताप, खोकला, थकवा, घसा लाल होणे, छातीत दुखणे
 • उपचार – आैषध म्हणून टॅमिफ्ल्यू/फ्ल्यूवीर/रेलेन्झ आणि लसीकरणासाठी वॅक्सीग्रीप ञिगुणी लस

६) रेबीज (Rabies)

 • विषाणू -Rhabdovirus
 • प्रसार – कुञा, मांजर, ससा, माकड यांसारखे रेबीज झालेले प्राणी चावल्यामुळे
 • अवयव -मध्यवर्ती चेतासंस्था
 • लक्षणे – पाण्याची भिती वाटणे (), अशक्तपणा, ताप, हाता-पायावर सुज येणे
 • उपचार – रेबीज विरोधी लस

७) हेपॅटॅटिस (Hepatatis)

 • विषाणू – A, B, C, D व E हे पाच प्रकारचे विषाणू
 • प्रसार – A आणि E अन्न व पाण्यामार्फत होतात तर  B, C व D रक्ताद्वारे किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरले जातात.
 • अवयव – यकृत
 • लक्षणे – त्वचा व डोळे पिवळे पडणे, पोटदुखी, मळमळ, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, राखाडी रंगाची मैला.
 • उपचार – A, B आणि D साठी लस उपलब्ध आहे परंतु C व E साठी लस उपलब्ध नाही.

८) गालफूगी (Mumps)

 • विषाणू – पॅरामिक्झो वायरस
 • प्रसार – थेट संपर्कामुळे
 • अवयव – लाळग्रंथी
 • लक्षणे – गाल फुगणे, अन्न व पाणी पिण्यास ञास होणे
 • उपचार – MMR ञिगुणी लस

९) रूबेला (Rubella)

 • विषाणू – मिक्झो वायरस
 • प्रसार – संपर्क
 • अवयव – मानेची ग्रथी
 • लक्षणे – ग्रंथीचा आकार वाढणे, शरीरावर चट्टे येणे
 • उपचार –  MMR ञिगुणी लस

१०) AIDS

 • विषाणू – HIV (Human Immuno Defficiency Virus)
 • प्रसार – लागण झालेल्या व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, रक्ताशी थेट संबंध संक्रमित आईकडून बाळाला, ड्रग्ज घेणार्या लोकांना संक्रमित सुया, ब्लेड्स इ.
 • अवयव – ठराविक अवयवावर होणारा रोग नाही
 • लक्षणे – AIDS हा अनेक रोगांचा समूह असल्यामुळे या रोगात क्षयरोग, किण्व संक्रमाण यांसारख्या संधीसाधू संक्रामक रोगांची लागण होते.
 • उपचार – लस उपलब्ध नाही.
 • निदान- ELISA ही चाचणी करतात.

 

ऊती व ऊतींचे प्रकार (Tissue and types of tissue)

समान रचना असणार्या व समान कार्य करणार्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊती एकञ येऊन अवयव बनतात व हे अवयव एकञ येऊन अवयव संस्था बनते. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था इ. ऊतींचा अभ्यास करणार्या शास्ञाला ऊतीशास्ञ असे म्हणतात. ऊती व ऊतींचे प्रकार (Tissue and types of tissue) पुढीलप्रमाणे.

प्राणी ऊती (Animal Tissue)

 • प्राणी ऊतींचे वर्गीकरण मुख्य दोन गटात म्हणजे सरल ऊती व जटील ऊती यात केले जाते.
 • सरल ऊतीमध्ये केवळ अभिस्तर ऊतींचा समावेश होतो तर जटील ऊतींध्ये संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती यांचा समावेश होतो.

१) अभिस्तर ऊती (Epithelial Tissue)

 • यामध्ये पेशी एकमेकींचा अतिशय चिटकून व जवळजवळ असतात. या ऊती तंतूमय पटलाने खालच्या ऊतीपासून वेगळ्या झालेल्या असतात.
 • त्वचा, तोंडातील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.

अभिस्तर ऊतींचे प्रकार-

 • सरल पट्टकी अभिस्तर (SImple Squamous epithelium)

या ऊती आकाराने अतिशय बारीक व चपट्या असतात. तसेच या नाजूक अस्तर तयार करतात.

 • स्तरीत पट्टकी अभिस्तर (Stratified Squamous epithelium)

नावाप्रमाणेच या ऊतींच्या रचनेमध्ये एकावर एक असे थर असतात. हे त्वचेच्या बाह्यस्तरात आढळून येतात. या ऊती अवयवांचे संरक्षण करण्याचे व त्यांची झीज थांबवण्याचे  मुख्य कार्य करतात.

 • स्तंभीय अभिस्तर (Coloumnar epithelium)

नावाप्रमाणेच या ऊतींची रचना स्तंभाप्रमाणे असते. आकाराने लांबट असून त्या आतड्याच्या आतील स्तरात असतात. पचन झालेल्या अन्नातील पोषणद्रव्यांचे शोषण करणे व पाचकरस स्ञवणे हे स्तंभीय अभिस्तर ऊतींचे मुख्य कार्य आहे.

 • रोमक स्तंभीय अभिस्तर (Cilliated coloumnar epithelium)

ज्या संभीय अभिस्तर ऊतींना केसासारखे रोमके असतात, त्यांना रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊती आतड्याच्या आतील स्तरात असतात. या ऊती प्रामुख्याने श्वसनमार्गात आढळतात.

 • घनाभरूप अभिस्तर (Cuboidal epithelium)

नावाप्रमाणेच या ऊती घनाकृती असतात. या ऊती वृक्कनलिकांच्या आतील स्तर, लाळग्रंथीच्या नलिका या ठिकाणी आढळतात. लाळ स्ञवण्यासाठी यांचा उपयोग होतो.

 • ग्रंथिल अभिस्तर (Glandular epitheum)

क्वचित वेळी अभिस्तर ऊतीच्या आतील बाजूस घड्या पडतातत व त्यामुळे बहुपेशीय ग्रंथी तयार होतात, त्यांना ग्रंथिल अभिस्तर ऊती म्हणतात.


२) संयोजी ऊती (Connective Tissue)

 • संयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे.
 • शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकींना जोडण्याचे व शरीरातील अवयवांना आधार देण्याचे  काम संयोजी उती करतात.
 • संयोजी ऊती या जेलीसदृश्य द्रवरूपात स्वतःच्या पेशींना सामावून घेतात.

संयोजी ऊतींचे महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे

 • अस्थी (Bone)

या अतिशय मजबूत असतात व शरीरातील मुख्य अवयवांना आधार देण्याचे कार्य करतात. अस्थिंमार्फत शरीराची आधारचौकट बनवली जाते. अस्थिपेशी या कॅल्शियम आणि फाॅस्फरसच्या संयुगापासून बनलेल्या जेलीसदृश्य द्रवात घट्ट रूतलेल्या असतात.

 • रक्त (Blood)

रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती असून हे ज्या द्रवात सामवलेले असते त्याला रक्तद्रव असे म्हणतात. हे रक्तद्रव प्रथिने, क्षार, संप्ररके, लोहित रक्तकणिका, श्वेतरक्तकणिका व रक्तपट्टीका यांनी बनलेले असते. शरीराच्या विविध भागांकडे रक्तातील वायू, अन्नातील पोषणद्रव्ये व संप्रेरके यांचे वहन करण्याचे कार्य रक्त करते.

 • अस्थिबंध (Ligament)

अतिशय लवचिक व त्याबरोबच मजबूत असणारे हे अस्थिबंध सजीवातील दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतात. आकृतीबंध स्थिर राहण्यास मदत करण्याचे कार्यही अस्थिबंध करतात.

 • स्नायूरज्जू (Tendons)

स्नायूरज्जू तंतूमय व कमी लवचिक असूनही खूप मजबूत असतात. यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात व अस्थि किंवा आकृतीबंधाची हालचाल होऊ शकते.

 • कास्थी (Cartilage)

शरीरभर विस्तृत भागात विखुरलेल्या असून कास्थीमुळे हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक, कान, श्वसननलिका व स्वरयंञातील पोकळीत असतात.

 • विरल ऊती (Areolar)

आंतर इंद्रियांना आधार देणे, ऊतींची झीज भरून काढणे व अवयवांच्या आतील भाग भरणे हे यांचे मुख्य कार्य असते. चेतातंतू, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्यांच्या सभोवताली आणि ऊती त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान विरल ऊती वास्तव्य करतात.

 • चरबीयुक्त युती (Adipose)

या युती त्वचेखाली, वृक्काच्या सभोवताली आढळतात. यांच्या पेशी मेदपिंडाने (fat globules) युक्त असतात. तसेच या ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात.


३) स्नायूऊती (Mascular Tissue)

स्नायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास ‘संकोची प्रथिन’ असे म्हणतात. या प्रथिनांच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची हालचाल होते. ऐच्छिक स्नायू व अनैच्छिक स्नायू असे या ऊतींचे दोन प्रकार पडतात.

 • ऐच्छिक स्नायू (Voluntary muscles)

या स्नायुद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंञण ठेवता येते.

 • अनैच्छिक स्नायू (Involuntary muscles)

या स्नायूंवर आपल्या मनाचे नियंञण नसते. उदा. श्वासपटल, मूञवाहिनी इ


४) चेताऊती (Nervous Tissue)

ज्या ऊती शरीरातील विविध संवेदनशीळ माहितीचे वहन करतात त्यांचा चेताऊती म्हणतात. वृक्षिका, पेशीकाय व अक्षतंतू या तीन भागांनी मिळून चेताऊती बनलेली असते. शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणून चेतापेशींना आेळखले जाते.


 

अस्थि संस्था (Skeletel System)

जे शास्ञ हाडांचा अभ्यास करते त्याला Ostology असे म्हणतात. मानवी शरीरात वयोमानाप्रमाणे हाडांची संख्या व वजन बदलत जाते. शरीराच्या एकूण वजनाच्या जवळपास १८ टक्के वजन हे केवळ हाडांचे असते. मानवातील अस्थि संस्था (Skeletel System) पुढीलप्रमाणे.

मानवी अस्थि संस्था (Skeletel System)

 • बाल्यावस्थेत म्हणजे अगदी अर्भकामध्ये हाडांची संख्या २७० एवढी असते.
 • वयोमानानुसार प्रौढ व्यक्तीमध्ये हाडांची संख्या २०६ इतकी कमी होते कारण वयानुसार बालकांमधील काही हाडे एकमेकांना जोडली जातात.
 • मानवी हाडे ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, इ. ची साठवणूक करतात. मानवी हाडांमध्ये कॅल्शियम ९०%,  कॅल्शियम फाॅस्फेट ६०% तर कॅल्शियम कार्बोनेट हे काही प्रमाणावर असतात.
 • मानवाच्या एका हातातील तळहातामध्ये १३ हाडे असतात (५-Meracarpels     ८-Carpels) आणि बोटामध्ये १४ हाडे असतात.
 •  दंडामध्ये Humerus या नावाचे हाड असते. दंडासमोरील भागात Radius व Ulna अशी दोन हाडे असतात. अंगठ्यामध्ये Radius व करंगळीच्या भागात Ulna .
 • मानवाच्या एका पायातील तळपायात १२ हाडे असतात (७-Tarsals     ५-Metatarsal) आणि बोटामध्ये एकूण १४ हाडे असतात.
 • गुडघ्याच्या खाली पायामध्ये Tibia व Fibula ही हाडे असतात त्यापैकी Tibia  हे हाड शरीराच्या आतल्या बाजूस असते तर Fibula हे बाेहेरील बाजूस असते.
 • मांडीमध्ये femur व गुडघ्यामध्ये knee bone किंवा Patella ही हाडे असतात.
 • पाठीच्या मनक्यात एकूण ३३ हाडे असतात. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे-
 1. मानेत (Cervical) – ७
 2. छातीत (Thorasic) – १२
 3. कंबरेत (Lumbar) – ५
 4. ञिकास्थी (Sacral) – 5
 5. माकडहाड (Coccyx) – 4

परंतु माकडहाड व ञिकास्थी हे जोडून असल्यामुळे मणक्यात एकूण २६ हाडे गृहीत धरली जातात.

 • प्रत्येक हातात व प्रत्येक पायात प्रत्येकी ३० हाडे असतात.
 • छातीच्या पिंजराच्या बगड्यात एकूण २४ हाडे असतात.
 • कवटीमध्ये एकूण २२ हाडे असतात.
 • प्रत्येक कानात ३ हाडे असतात.
 • मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीचे हाड असते व सर्वात लहान हाड कानाचे हाड असते.

सांध्यांचे प्रकार

दोन हाडे ज्या ठिकाणी एकमेकांना जोडली जातात, तेथे सांध्यांची निर्मिती होते.

 • बिजागिरीचा सांधा 

हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य असते. या सांध्याची हालचाल १८०० कोनात होत असते. उदा. कोपर, गुडघा.

 • उखळीचा सांधा 

हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशेने शक्य असते. या सांध्याची हालचाल ३६०० कोनात होत असते. उदा. खांदा.

 • सरकता सांधा 

हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. उदा. मनगट, पायाचा घोटा.


 

उत्सर्जन संस्था (Excretory System)

प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये सतत जैवरासायनिक क्रिया घडत असतात. या पेशीद्वारे तयार झालेले व शरीरासाठी टाकाऊ असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन होय. मानवातील उत्सर्जन संस्था (Excretory System) येथे अभ्यासू.

मानवी उत्सर्जन संस्था (Excretory System)

मानवी उत्सर्जन संस्थेचे मुख्य घटक- वृक्कांची जोडी (Pair of Kidney), मूञवाहिनीची जोडी (Pair of Ureter), मूञाशय (Urinary Bladder) ,मूञोत्सर्जन मार्ग (Urethra)

१) वृक्क (Kidney)

 • पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस वृक्क असते. म्हणजे मानवी शरीरात घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन वृक्के असतात.
 • वृक्कांची लांबी 10 ते 12 cm असून रुंदी ५ ते ७ cm तर जाडी २ ते ३ cm असते.
 • उजवे वृक्कावर यकृत ग्रंथी असल्यामुळे हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते.
 • वृक्कांची शरीरातील जागा ही छातीच्या मनक्यातील १२ व्या हाडापासून ते कंबरेच्या मनक्यातील तिसर्या हाडापर्यंत असते.  वृक्कांच्या बाह्य आवरणाला वलकुट असे म्हणतात.
 • वृक्कांच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकाला नेफ्राॅन असे म्हणतात.
 • वृक्काचे वजन पुरुषांमध्ये 125 ते १70 ग्रॅम असून स्त्रियांमध्ये 115 ते  155 ग्रॅम असते.
 • मानवी शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते.
 • वृक्कांमार्फत दररोज साधारणपणे 180-190 लीटर द्रव गाळणातून 1 – 1.9 लीटर मूत्र तयार होते.
 • मूञवहिनीची लांबी ४० सेमी. असते.
 • मूञ हे आम्लधर्मीय असून त्याचा PH 6.00 असतो.
 • युरोक्रोम/युरो-बिलीनोजन या घटकामुळे मूञाला पिवळा रंग प्राप्त होतो.
 • मुञामध्ये ९५% पाणी, २.५% युरिया आणि २.५% उर्वरित पदार्थ असतात. माणूस दररोज जवळपास २५ ते ३० ग्रॅम युरिया शरीराबाहेर टाकतो.
 • वृक्कामध्ये कॅल्शियम आॅक्झलेटचे खडे जमा होणे यालाच मुतखडा असे समजतात.

वृक्काचे कार्य (Functions Of Kidney)

 •  रक्तातील अमोनिया, युरिया व युरिक आम्ल यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे.
 •  रक्तातील अयनांचे प्रमाण व सामु (pH)  संतुलित ठेवणे.
 •  रक्ताचा परासरण दाब, आकारमान, आम्ल-आम्लरींचे संतुलन तसेच रक्तदाब नियंत्रित करणे.
 •  वृक्कमुळे शर्करा, अमिनो आम्ले आणि पाणी यांचे पुनःअवशोषण घडून येते.
 •   वृक्कातील ADH (Anti Diuretic Hormone) या संप्रेरकामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.

 

प्रजनन संस्था (Reproductive System)

प्रत्येक सजीवामध्ये प्रजनन संस्था (Reproductive System) विकसीत असते जेणेकरून तो स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकेल. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमधील जनुकीय तत्वांचे होणारे संक्रमण म्हणजे प्रजनन. विशिष्ट जातींची संख्या कायम राखण्यासाठी व  ती प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रजनन आवश्यक असते. प्रजनन मुख्यत्वे दोन प्रकारे होते.

१) अलैंगिक प्रजनन

 • केवळ एका जनकाद्वारे होणारे प्रजनन.
 • एकपेशीय सजीवामध्ये साधारणतः अलैंगिक प्रजनन होते.
 • विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनुरात्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत.
 • नवजात पेशी ही तंतोतंत मुळ पेशीसारखी असल्यामुळे या प्रकारच्या प्रजननामध्ये जीवाच्या जाती वैशिष्ट्याचा अभाव असतो.
 • फक्त गुणसुञी विभाजन होते. गुणसुञी विभाजन म्हणजे गुणसुञांची संख्या कायम राखून एक पेशी दुसर्या दोन पेशी तयार करते.

एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार

 •  द्विविभाजन

जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन. अमीबा, पॅरामेशीयम, जीावाणू, क्लोरेल्ला इ.

 • बहुविभाजन

प्रतिकुल परिस्थितीत अमीबा छद्मपाद () आत आेढून घेतो व गोलाकार बनतो. पेशीपटलभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, ज्यास पुटी () म्हणतात. या पुटीमध्ये केंद्रकाचे पुनर्वत्तीय विभाजन होऊन अनेक नवजात पेशी निर्माण होतात व पुटी फुटून अनेक अमीबापेशी बाहेर पडतात. या क्रियेस बहुविभाजन असे म्हणतात.

 • कलिकायन

जनक पेशीला बारीकसा फुगवटा येऊन या कलिकेद्वारे नवीन जीव तयार होतो. उदा. किण्व.

बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार

 • खंडीभवन

पाणी व पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यावर वाढ व विभाजन वेगाने होते. उदा. स्पायरोगायरा

 • पुनर्जनन

विशिष्ट पेशीद्वारे ही प्रक्रिया घडून येते. जेंव्हा प्लॅनेरियाचे अनेक खंडांध्ये तुकडे होतात तेव्हा प्रत्येक खंड नवीन प्लॅनेरियाची निर्मिती करतो.

 • मुकुलायन

जीवांची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगवटा येतो, त्यास मुकुल म्हणतात. या मुकुलाचे रूपांतर नवीन जीवात होते. उदा. हायड्रा.

 • क्लोनिंग 

नवजात प्राणी हा जनक प्राण्याची हुबेहुब प्रतिकृती असून DNA ची रचनाही तंतोतंत असते. जनक पेशीच्या शरीरातील एका परिपक्व पेशीपासून जनुकीय दृष्ट्या समान असणार्या संपूर्ण बहुपेशीय प्राण्याची निर्मिती ज्या प्रक्रियेद्वारे केली जाते, त्यास क्लोनिंग म्हणतात. उदा. डाॅली शीप


६२५२२) लैंगिक प्रजनन

दोन जनक पेशींच्या संयोगाने नवीन पेशी तयार होण्याच्या क्रियेस लैंगिक प्रजनन म्हणतात. स्ञियुग्मक व पुंयुग्मक या जनक पेशी असून युग्मनज ही नवीन तयार झालेली पेशी असते. लैंगिक प्रजननामध्ये अर्धगुणसुञी विभाजन व फलन या दोन मुख्य क्रिया दिसून येतात.

अर्धगुणसुञी– गुणसुञांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकाची निर्मिती.

फलन– दोन अर्धगुणी युग्मकाच्या संयोगातून एका द्वगुणी युग्मनजाची निर्मिती.


मानवातील प्रजनन

अ) पुरूष – प्रजनन संस्था

वृषण व शिश्न हे पुरूष प्रजनन संस्थेचे मुख्य अवयव आहेत.

 • वृषण

पुरूषांतील प्राथमिक प्रजनन अवयव. पुरूषातील युग्मक पेशीची म्हणजेच शु्क्राणु पेशीची निर्मिती वृषणामध्ये होते.  टेस्टोस्टराॅन नावाचे संप्रेरक स्ञवणार्या ग्रंथीचा हा एक प्रकार आहे. शुक्राणुपेशीची निर्मिती होण्यासाठी शरीरापेक्षा २० ते ३० सेल्सियस तापमान कमी आवश्यक असते.

 • वृषणकोश

जवळपास ६ मी. लांबी असून येथे अपरिपक्व शुक्राणूंचा विकास व साठा केला जातो.

 • शुक्राणुवाहिनी

या नलिकेद्वारे शुक्राणू वाहिले जात असून ते मूञोत्सर्जित मार्गापर्यंत पोहचवले जातात. या नलिकेची लांबी साधारणतः ४० सेमी. असते.

 • शुक्राशय व प्रोटेस्ट ग्रंथी

शुक्राशय हे शुक्राणूचे पोषण करणारे शुक्राशय द्राव स्ञावते ज्यामध्ये फ्रुक्टोज ही शर्करा असते जी शरीरात इतरञ कोठेही तयार होत नाही. वीर्य तयार होण्यास शुक्राशय द्राव, प्रोटेस्ट ग्रंथी द्राव व शुक्राणू मदत करतात. प्रत्येक वेळी पुरूषामध्ये ३ ते ४ मिली एवढे वीर्य बाहेर पडत असते. ज्यामध्ये ६०% शुक्राशय द्राव, ३०% प्रोटेस्ट द्राव आणि १०% शुक्राणू असतात.

 • शिश्न

पुरूष प्रजनन संस्थेच्या या भागाद्वारे फलनाच्या जागी शुक्राणूचे वहन केले जाते.

 • शुक्राणू

तीन भागांनी बनलेले असते.

डोके- जनुकीय माहितीचा साठा

मधला भाग- ऊर्जा निर्माण करण्यासाठी तंतूकणिका असतात.

शेपूट- शुक्राणूस अंडापेशीपर्यंत पोहचण्यास मदत करते.


ब) स्ञी- प्रजनन संस्था

योनी, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडाशय हे स्ञी प्रजनन संस्थेचे प्रमुख अवयव आहेत.

 • योनी

योनीमार्ग ते गर्भाशयापर्यंत असणारी स्नायूयुक्त नलिका म्हणजे योनी होय. हा मुलाला जन्म देण्याचा मार्ग असल्यामुळे यास जन्मनलिका असेही म्हणतात. तरुण स्त्रीमध्ये त्याची लांबी सु. 10 सेमी असते. मासिक स्ञाव शरीराबाहेर टाकणे, शुक्राणूंना प्रवेश देणे ही याेनीची कार्ये आहेत.

 • गर्भाशय

शरीरातील सर्वात मजबूत स्नायू व जास्तीत जास्त आकुंचन व प्रसरणाची क्षमता असलेला भाग असल्यामुळे या ठिकाणी गर्भ वाढणे व तो बाहेर ढकलण्यास मदत होते. गर्भाशयाची जाडी साधारण २ सेमी आणि लांबी 7.5 सेमी असते.

 • अंडवाहिनी

अंडाशय व गर्भाशय यांना जोडणारी नलिका. दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. अंडवाहिनीच्या अॅम्पूला या थोड्याश्या रूंद भागात फलन घडून येते. अंडवाहिनी सुमारे 10 सेमी ते 11.5 सेमी लांब असते.

 • अंडाशय

स्ञियांमधील प्राथमिक प्रजनन अवयव असून अंडाशय हे स्ञीमधील जननग्रंथी असते. हे एक अंतःस्ञावी ग्रंथीचा प्रकार आहे जे स्ञियांमध्ये  इस्ट्रोजन हे संप्रेरक स्ञावते. मुलीच्या जन्माच्या वेळि तिच्या शरीरामध्ये २० ते ४० लाख अंडपेशी असतात. तारूण्यावस्थेत केवळ ४०० परिपक्व होतात व उर्वरित नष्ट होतात, तेव्हा या उरलेल्या अंडपेशीचा विकास करणे हेच अंडाशयाचे मुख्य कार्य असते.


 

पचन संस्था (Digestive System)

दैनंदिन आहारात सर्वाधिक आवश्यक असणारे घटक म्हणजे कर्बोदके, प्रथिने व मेद होय. या जटिल घटकांचे रक्तात जसेच्या तसे शोषण होऊ शकत नसल्याने त्याचे साध्या पदार्थांमध्ये रूपांतर करणे गरजेचे असते. म्हणजेच जटिल अन्नघटकाचे साध्या पिष्टमय पदार्थांमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला पचन असे म्हणतात. मानवाची पचन संस्था (Digestive System) विविध घटकांनी बनलेली आहे.

मानवी पचन संस्था (Human Digestive System)

मानवी पचन संस्था मुख्य अन्ननलिका व पचनग्रंथी यांनी बनलेली असते. अन्ननलिका ही मुखापासून ते गुदद्वारापर्यंत साधारण ९५० सेमी. इतकी अाहे. अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो.

 1. मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
 2. ग्रासनी (Pharynx)
 3. ग्रसिका (Esophagus)
 4. जठर/ आमाशय (Stomach)
 5. लहान आतडे (Small Intestine)
 6. मोठे आतडे (Large Intestine)
 7. मलाशय (Rectum) आणि
 8. गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

१) मुख/ तोंड (Mouth)

मानवी पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. मुखातील दाताद्वारे अन्न बारीक  केले जाते व या बारीक अन्नाची चव कळण्याचे कार्य पुढे जिव्हा/जीभ करते. जीभेवर चव जाणण्यासाठी रूचीकलिका असतात. जीभेच्या अग्रभागी गोड, आतील टोकास कडू व दोन्ही कडांना खारट-आंबट चव आेळखू शकणार्या रूचीकलिका असतात. मुखातील लाळेमध्ये अमायलेज/टायलीन हे विकर () असते, ज्यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोज म्हणजेच साखरेत होेते.


२) ग्रासनी  (Pharynx)

अन्ननलिका व श्वसननलिका यांचा सामूहिक मार्ग असून मुखामध्ये बारीक झालेले अन्न ग्रासणीद्वारे पुढे ढकलले जाते.  हे अन्न श्वसननलिकेत जाऊ नये म्हणून अपिलगद्वार () मदत करते.


३) ग्रासिका (Esophagus)

घशापासून जठरापर्यंत अन्नाचे वहन करणारा भाग. अन्नाचे वहन करणारे असूनही या भागात कोणत्याही प्रकारचे पचन व शोषण होत नाही. याची लांबी जवळपास २५ सेमी असते.


४) जठर/अमाशय (Stomach)

जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते.  जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. जठरात ४ ते ५ तासासाठी अन्न साठवले जाते. अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले हे मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. जठरातील जठरग्रंथींमधून पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्यूकस हे घटक असणारा जठररस स्रवताे. प्रथिनांचे रूपांतर त्यांच्या साध्या रूपात म्हणजे अॅमिनो आम्लात करण्याचे कार्य पेप्सिन हे विकर करते. हे रूपांतर घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारे माध्यम हायड्रोक्लोरिक अॅसिड पुरवते व या क्रियेदरम्यान जठर भित्तिकेचे संरक्षण म्यूकसद्वारे होते.


५) लहान आतडे (Small Intestine)

अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग असणार्या या आतड्याची लांबी सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते. लहान आतडे अध्यांञ, मध्यांञ व शेषांञ या तीन विभागात विभागले गेले आहे. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अध्यांञ (Duodenum) असे म्हणतात. कमी गुंडाळलेला भाग म्हणजे मध्यांञ आणि जास्त गुंडाळलेला भाग म्हणजे शेषांञ.


 • स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) 

स्वादुपिंड स्वादुरस स्ञवतो ज्यात मुख्य तीन घटक असतात.

 1. अमायलेज – कर्बोदकांचे पचन ग्लुकोजमध्ये
 2. ट्रिप्सिन – प्रथिनांचे पचन अॅमिनो आम्लात
 3. लायपेज – मेदाचे पचन मेदाम्लात

यकृत:

 • यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी असून पचनामध्ये महत्वाचे कार्य करतात.
 • यकृताने स्रवलेला पित्तरस खालच्या बाजूस असलेल्या पित्ताशयामध्ये वसाठवला जातो.
 • यकृताचे मुख्य कार्य म्हणजे न वापरलेल्या ग्लुकोजचा ग्लायकोजनच्या रूपात साठा करणे.
 • पित्तरसात क्षार असल्यामुळे स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते.

६)  मोठे आतडे (Large Intestine)

मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचे पचन होत नाही केवळ पाणी रक्तात शोषले जाते व न पचलेले अन्न पुढे ढकलले जाते. अपेंडिक्स हा छोटा भाग मोठ्या आतड्याच्या सुरूवातीला असतो. प्राचीन काळात कच्चे अन्न खाणार्या  मानवासाठी पचनक्रियेत हा भाग उपयुक्त असे परंतु सध्या हे केवळ एक अकार्यशील अवशेषांग म्हणून आेळखले जाते.

 


 

श्वसन संस्था (Respiratory System)

केवळ श्वासोच्छवास घेण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणता येत नाही. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्यापुरतीच श्वसनाची क्रिया मर्यादित नसते.सात्मीकरण झालेल्या म्हणजेच पचन झालेल्या अन्नापासून ऊर्जामुक्त करण्याची क्रिया म्हणजे श्वसन होय. मानवी श्वसन संस्था (Respiratory System) पुढिलप्रमाणे-

श्वसनाचे प्रकार

आॅक्सीजनच्या उपलब्धतेनुसार श्वसनाचे मुख्य दोन प्रकार पडतात.

आॅक्सिश्वसन (आॅक्सीजनच्या सानिध्यात ऊर्जा मुक्त केली जाते)

विनाॅक्सिश्वसन (ऊर्जा मुक्त करण्यासाठी आॅक्सीजनची गरज भासत नाही)

मानवी श्वसन संस्था

 • रक्तातील कार्बनडायऑकसाइड चे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो.
 • प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला १४ वेळा एवढा असतो. लहान मुलांत तो प्रति मिनिटाला ४५, मोठ्या मुलांमध्ये प्रति मिनिटाला २५ एवढा असतो.

मानवातील श्वसन संस्थेत अनुक्रमे पुढील घटकांचा सहभाग असतो.

१) बाह्य नाकपुड्या (External Nostrils)

2) घसा (Pharynx)

3) ग्रसनी / स्वरयंत्र (Larynx)

4) श्वसन नलिका (Trachea)

5) श्वसनी (Bronchi) – श्वसनिका (Bronchioles)

6)  फुप्फुसे (Lungs)

7) वायुकोश (Alveoli)

8) श्वासपटल (Diaphragm)

 


१) बाह्य नाकपुड्या (External Nostrils)

मानवी श्वसनक्रिया ही नाकपुड्यांपासून सुरू होते. नाकापुड्यातून हवा आत जाताना ति केसामार्फत गाळली जाते म्हणून हवेतील धुळीचे कण, माती असे टाकाऊ घटक फुप्फुसापर्यंत पोहचले जाऊ शकत नाहीत.

२) घसा (Pharynx)

हा घटक श्वसननलिका व अन्ननलिका या दोन्हीही क्रियेत भाग घेतो. घसा जिथे अन्ननलिकेस जोडला जातो, त्या जागेस गलेट असे म्हणतात.

3) ग्रसनी / स्वरयंत्र (Larynx)

घस्याद्वारे आलेला वायू श्वसननलिकेकडे कंठाद्वारे जातो. श्वसननलिका या भागाद्वारे आवाज निर्माण करू शकते म्हणून या भागाला ध्वनीचा डब्बा असेही म्हणतात. स्वरयंञ/कंठ यामध्ये व्होकल काॅर्ड नावाची एक काॅर्ड असते ज्यामुळे आवाज तयार होतो. पुरूषामध्ये २०mm तर स्ञीयांमध्ये हे प्रमाण ५mm ने कमी असते.

4) श्वसन नलिका (Trachea)

श्वसन नलिकेचे रूपांतर श्वसनात होऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते. वायूचे वहन करणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

5) श्वसनी (Bronchi) – श्वसनिका (Bronchioles)

उजवी श्वसनी ही डाव्या श्वसनीपेक्षा अधिक रूंद, आखुड व अधिक उभी असते. त्यामुळे या ठिकाणी नाणे, इ. वस्तू अडकतात.  फुफ्फुसांमध्ये श्वसनीचे रूपांतर अनेक लहान शाखांमध्ये होते. या सर्व लहान शाखांना श्वसनिका म्हणतात.

6)  फुप्फुसे (Lungs)

ह्रदयाच्या दोन्ही बाजूस छातीच्या पोकळीत असलेली फुप्फुसे हे श्वसनाचा अतिशय महत्वाचा अवयव आहे.

7) वायुकोश (Alveoli)

श्वसनिकांच्या टोकाशी फुग्यांसारखे दिसणारे वायुकोश (Alveoli) असतात. वायुकोशामध्येच विसरण (Diffusion) प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाइड या वायूंची देवाण घेवाण होते. वायुकोश हा फुप्फुसाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. संपूर्ण फुप्फुस हे वायूकोशांनी बनलेले असते.


श्वासोच्छवास (Respiration/ Breathing):

 • श्वासोच्छवास ही भौतिक प्रक्रिया आहे.
 • ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बाह्यश्वसन किंवा श्वासोच्छवास असे म्हणतात.
 • श्वासोच्छवासाची क्रिया श्वास आणि उच्छवास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

श्वास (Breath-In/Inhalation):

ऑक्सिजनयुक्त हवा शरीरामध्ये घेण्याच्या प्रक्रियेला श्वास असे म्हणतात.

उच्छवास (Breath-Out/Exhalation):

कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा शरीराबाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला उच्छवास असे म्हणतात.

श्वासोच्छवास: 

यामध्ये फुफ्फुसे व फुफ्फुस धमनीतील रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाईड यांची देवाणघेवाण होते. या क्रियेला विसरण असे म्हणतात.

श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये वेगळा होऊन रक्तात मिसळला जातो. तर रक्तातील कार्बन डायॉकसाईड फुफ्फुसांमध्ये उच्छवासाद्वारे मिसळला जातो व त्यानंतर फुफ्फुसातून शरीराबाहेर टाकला जातो.


 

प्रकाश(Light)

महत्वाच्या संज्ञा आरसा(), प्रकाशाचे प्रवर्तन(), परावर्तनाचे नियम(), परावर्तनाचे प्रकार(), आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा, आरशाचे सूत्र(), भिंगांचे प्रकार(), मानवी डोळा(), द्र्ष्टीदोष, अपवर्तन(), प्रकाशाचे आपस्करण(), इंद्रधनुष्य(), प्रकाशाचे विकिरण(), प्रकाश(Light).

 

“प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे होय.”

 

आरसा():

आरसा हा परावर्तनशील() पृष्ठभाग आहे. आरशाचे दोन प्रकार आहेत –

१. सपाट आरसा:

सपाट आरसा म्हणजे सपाट काच तिच्या एका पृष्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केले जाते.

 

२. वक्र गोलाकार आरसा:

गोलाकार आरशाचा अर्धा भाग म्हणजेच वक्र गोलाकार आरसा होय. ज्या प्रमाणे सपाट आरशाच्या एका पृष्ठभागावर परावर्तनलेप लावतात त्याप्रमाणे येथेसुद्धा लावतात व एका भाग चका – चक करतात. परावर्तनलेप आतून किंवा बाहेरून लावला आहे यावरून वक्र आरशाचे पुढील दोन प्रकार पडतात –

अ. अंतर्वक्र आरसा

जर गोलाकार पृष्ठाचा आतला भाग किंवा अंतर्भाग चक चकित असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.  आतल्या चक-चकित भागावरून प्रकाशाचे परावर्तन होते.  या अर्शाद्वारे प्रकाशाचे अभिसरण होते म्हणून याला अभिसरण आरसा असे हि म्हणतात.

प्रकाशाचे अभिसारण:

 • जेंव्हा प्रकाश किरण एका बिंदूपाशी एकत्र येतात तेंव्हा प्रकाशाचे अभिसरण होते.
 • अशा प्रकारच प्रकाशझोत वापरून डॉक्टर दात , कण, डोळे इत्याडो पाहू शकतात.
 • सौर उपकरणामध्ये पण याच आरशाचा उपयोग होतो.

 

ब. बहिर्वक्र आरसा

जर गोलाकार पृष्ठाचा बाहेरचा भाग किंवा बहिर्वक्र भाग चक चकित असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.  बाहेरच्या चक-चकित भागावरून प्रकाशाचे परावर्तन होते.  या अर्शाद्वारे प्रकाशाचे अपसारण होते म्हणून याला अपसारी आरसा असे हि म्हणतात.

 प्रकाशाचे अपसरण:

 • जेंव्हा एकच बिंदू प्स्रोतापासुंचे प्रकाश किरण एकमेकांपासून दूर पसरतात तेंव्हा अपसरण झाले असे म्हणता येईल.
 • उदा. रस्त्यावरील दिवे, टेबल लॉम्प

 

गोलीय अरशाशी संबंधित संज्ञा()

१. वक्रता मध्य():

गोलीय आरसा ज्या गोलचा भाग आहे. त्याच्या केंद्र बिंदुला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणतात.

२. ध्रुव():

गोलीय आरशाच्या मध्याला ध्रुव असे म्हणतात.

 

३. मुख्य अक्ष():

वक्रता मध्य आणि ध्रुव यांना जोडणाऱ्या सरळ रेषेला मुख्य अक्ष म्हणतात.

 

४. वक्रता त्रिज्या():

आरशाच्या वक्रता मध्य आणि ध्रुव यांच्यातील अंतरास वक्रता त्रिज्या असे म्हणतात.

 

५. अंतर्वक्र आरशाची नाभी():

अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परवार्तानानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूपाशी एकत्र येतात. यालाच अंतर्वक्र आरशाची मुख्य नाभी म्हणतात.

 

६. नाभीय अंतर():

आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतरास नाभीय अंतर असे म्हणतात.

नाभीय अंतर वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. f = R/२.

 

प्रकाशाचे प्रवर्तन():

एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली असता ती परत फिरतात याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.

 

परावर्तनाचे नियम():

 • आपती किरण()

  • जो प्रकश किरण पृष्ठभागावर पडतो त्यला आपटी किरण असे म्हणतात.
  • आकृती मध्ये —– हा आपटी किरण आहे.

 

 • परावर्तीत किरण()

  • आपटी किरण पृष्ठभागावर पडल्यानंतर माघारी फिरतात त्य किरणला परावर्तीत किरणल असे बोलतात.
  • आकृतीत — हा परावर्तीत किरण आहे.

 

 • स्तंभीका()

  • आपटी किरण आणि परावर्तीत किरण ज्या बिंदूपाशी एकत्र येतात, त्या बिंदुपासून काढलेला लांब म्हणजे स्तम्बिका होय.
  • आपटी किरणाने स्तंभीकेसोबत केलेला कोणास अपतीकोन असे म्हणतात.
  • आकृतीत ____ हा अपतीकोन आहे.
  • परावर्तीत किरणाने स्तंभीकेसोबत केलेला कोण म्हणजे परावर्तीत कोण होय.
  • आकृतीमध्ये ___ हा परावर्तण कोण आहे.

परावर्तनाचा नियम:

 • आपतीकिरण , परावर्तीत किरण आणि स्तंभीका हे सर्व एकच प्रतलात असतात.
 • आपटी किरण आणि परावर्तीत किरण स्तंभीकेच्या विरुद्ध बाजूला असतात.
 • आपटी कोण आणि परावर्तीत कोण समान मापाचे असतात.

 

परावर्तनाचे प्रकार():

1 . नियमित परावर्तन()

 • सपाट अथवा गुळगुळीत पृष्ठ्भाहून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात.
 • या प्रकारात सर्व आपटी आणि परावर्तीत किरण समान असतात.
 • समांतर अपाती किरणांचे परावर्तीत किरणे समांतर असतात.

 

२. अनियमित परावर्तन()

 • खडबडीत पृष्ठभागावर समांतर आपती किरण परावर्तन किरण विस्तृत पृष्ठभागावर पसरतात.
 • समांतर अपपाती किरणांचे परावर्तीत किरणे समांतर असतील असे नाही.

 

आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा:

अ. सपाट आरसा()

 • सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा हि सरळ तसेच मुल वस्तुएवढिच असते.
 • आपण सपाट अराशच्या समोर जेवढ्या अंतरावर आहोत तेवढ्याच अंतराने मागे सपाट आरशात प्रतिमा असते.
 • वस्तू आणि सपाट आरशातील प्रतिमा यांची डावी आणि उजवी बाजू यांची उलातापालट होते.

 

ब. अंतर्वक्र आरशामुळे मिलानारी प्रतिमा:

 • मिळणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप, स्थान आणि आकार वस्तूच्या पृष्ठभागापासून असणाऱ्या अंतरावर अवलंबून असते.
 • खालील नियम व किरणाकृतीच्या सहाय्याने आपणास अंतर्वक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा समजून घेऊ –
  • नियम १ – जर आपटी किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तीत किरण मुख्य नाभीतून जातो.
  • नियम२ – जर आपती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तीत किरण मुख्य अक्षाला समांतर जातो.
  • नियम ३ – जर आपती किरण वक्राच्या मध्यातून जात असेल तर परावर्तीत किरण त्याच मार्गाने परत जातो.

XXXXXXXXXX आकृतीXXXXXXXXXXXX

 

 

गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनाकारता चिन्हांचे संकेत:

 • आरशाचा आरंभ बिंदू म्हणजे ध्रुव(P) होय.
 • मुख्य अक्ष म्हणजे X-अक्ष होय.
 • चिन्ह संकेत()

  • वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे असतात.
  • मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे ध्रुवापासून मोजतात.
  • आरंभबिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात.
  • मुख्य अक्षाला लंब व वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.
  • मुख्य अक्षाला लंब व खालच्या दिशेने मोजलेली अंतरे (अधो अंतरे) शृण असतात.
  • अंतर्वक आरशाचे() नाभीय अंतर शृण असते तर बहिर्वक्र आरशाचे() नाभीय अंतर धन असते.
 • आकृती

 

आरशाचे सूत्र:

सूत्र : (१/v) + (१/u) = (१/f)

जेंव्हा –

प्रतिमेचे अंतर (v) – ध्रुवापासून प्रतिमेचे अंतर.

वस्तूचे अंतर (u)  – वस्तूचे ध्रुवापासून अंतर.

नाभीय अंतर(f) – मुख्य नभीचे ध्रुवापासून अंतर.

 

 

गोलीय आरशामुळे होणारे विशालन():

प्रतिमेची उंची – h२

वस्तूची उंची – h१

विशालन = h२/h१

 • वस्तूंची उंची नेहमी धन असते.
 • जर प्रतिमा आभासी असेल तर उंची धन घेतात. आणि प्रतिमा वास्तव असेल तर ती ऋण घेतात.

 

भिंग आणि भिंगांचे प्रकार():

“भिंग हे दोन पृष्ठ्भागांनी युक्त असे पारदर्शक मध्यम असून त्यापैकी निदान एक पृष्ठभाग गोलीय असतो.”

अ. बहिर्वक्र भिंग ():

 • ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यास बहिर्वक्र भिंग म्हणतात.
 • बहिर्वक्र भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असतो.
 • हे भिंग प्रकाशाचे अभिसरण करू शकतात म्हणून यास अभिसारी भिंग म्हणतात.

 

ब. अंतर्वक्र भिंग():

 • ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यास अंतर्वक्र भिंग म्हणतात.
 • हे मध्यभागी पातळ व कडेला जाड असतात.
 • हे भिंग प्रकाश किरणांचे अपसारण घडवून आणतात. म्हणून यास अपसारी भिंग म्हणतात.

 

बहिर्वक्र भिंगाने प्रतिमा मिळवण्यासाठी पुढील नियम आहेत :

नियम १. –

जर आपती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तीत किरण नाभीतून जातो.

 

नियम२ :

भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून जाणारा प्रकाशकिरण अविचालीतपणे प्रकाशीय मध्यापलीकडे जातो.

 

नियम ३:

जर आपटी किरण नाभीतून जात असेल तर अपरावार्तीत किरण मुख्य अक्षाला समांतर जाते.

 

भिंगाचे सूत्र:

सूत्र: (१/v) – (१/u) =(१/f)

जेंव्हा – u – वस्तूचे अंतर

v – प्रतिमेचे अंतर

f – नाभीय अंतर

 

भिंगामुळे होणारे विशालन:

 • हे अंतर गोलीय आरशाच्या सुत्राप्रमाणेच असते.
 • परंतु हे वस्तूचे आणि प्रतिमेचे अंतर यावरूनही दर्शविता येते –
 • विशालन = (प्रतिमेचे अंतर) / (वस्तूचे अंतर) = v/u

 

भिंगाची शक्ती:

 • प्रकाश किरणाचे अभिसंरण किंवा अपसरण करण्याची भिंगाची क्षमता त्याच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते.
 • भिंगाची शक्ती म्हणजे नाभीय अंतराचा गुनाकाराचा व्यास्तांक होय.
 • सूत्र P = १/f
 • भिंगाच्या शक्तीचे SI पद्धतीचे एकक डायोप्तर आहे.
 • जर नाभीय अंतराचे माप मीटर मध्ये सांगितले. तर भिंगाच्या शक्तीचे SI पद्धतीचे एकक डायोप्तर आहे.

 

मानवी डोळा():

मानवी डोळा हा खालील भागांनी बनला आहे –

पारपटल():

 • अत्यंत पातळ पारदर्शक पातल असतो त्यास पारपटल असे म्हणतात.
 • या पाताळातून प्रकश डोळ्यात प्रवेश करतो. प्रकाशाचे अपवर्तन येथूनच होते.

बुबुळ():

 • आपणास जो डोळ्यातल्या गडद मांसल भाग दिसतो(काळा भाग) त्यास बुबुळ म्हणतात.
 • बुबुळाच्या वरचा पारदर्शक भाग म्हणजे पारपटल होय.
 • वेग वेगळ्या लोकांच्या बुबुलांचे रंग वेग वेगळे असतात.
 • बुबुळ हे बाहुलीवर नियंत्रण ठेवते.

डोळ्यांची बाहुली():

 • बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छिद्र असते त्याला डोळ्याची बाहुली असे म्हणतात.
 • डोळ्यात येणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवणे व प्रमाण नियमित ठेवणे हे कार्य बाहुली करते.
 • जर प्रकाश जास्त असेल तर बाहुली आकुंचन पावते आणि जर प्रकाश कमी असेल तर बहुली रुंदावते.
 • प्रकाशाशी तडजोड करण्याच्या बहिळूच्या या प्रवृत्तीला “नव्या परिस्थितीशी जून घेणे” () म्हणतात.

भिंग():

 • डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच पाठीमागे पारदर्शक द्वीबहिर्वक्र() स्फटीकमय भाग असतो त्यास भिंग म्हणतात.
 • भिंग हे नाभीय अंतरामध्ये सूक्ष्म बदल घडवते.
 • हे भिंग प्रकाशाचे अभिसरण () करून त्याची प्रतिमा थेट पाड्यावर तयार करण्यास मदत करते.

दृष्टीपटल():

 • यावर वास्तव आणि उलट प्रतिमा () तयार होतात.
 • हा पडदा प्रकाश संवेदनशील असतो. ज्यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. त्या खालीलप्रमाणे –
  • शांकुपेशी():

   • ज्या विविध रंगाची जाणीव करून देतात. तेजस्वी प्रकाशाला संवेदनशील असतात.
  • दंडपेशी():

   • ज्या अंधारात मदत करतात(). अंधुक प्रकाशाला संवेदनशील असतात.
 • दृष्टीपाटलाला जोडून दृष्टीचेता () असतात ज्या मेंदूकडे आवेगाचे() वाहन करतात.

 • आपल्याला वेग वेगळ्या ठिकाणच्या वस्तू पाहण्यासाठी भिंग स्वतः मध्ये बदल करत असतो. म्हणजेच नाभीय अंतरात बदल करत असतो.
 • निरोगी डोळ्याकरीता आणि डोळ्यांचे स्नायू शिथिल असताना नाभीय अंतर २.५ असते.
  • दूरवरून येणाऱ्या प्रकाशावेळी

   • भिंग कमी जाडीचे () होते.
   • नाभीय अंतर जास्त असते.
  • जवळच्या वस्तू पाहतात

   • भिंग फुगीर होते.
   • नाभीय अंतर कमी होते.
 • नाभीय अंतर अवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला “समायोजन शक्ती”() म्हणतात.
 • निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना सुस्पष्ट आणि डोळ्यावर तन न येत दिसू शकते त्या अंतरास सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर () म्हणतात. निरोगी डोळ्यासाठी हे अंतर सुमारे २५ cm आहे.
 • बुबुळाचा साधारणतः व्यास २.३ cm असतो

 

डोळे मिजकावणे():

 • डोळ्यांची उघडझाप हि एका विशिष्ट द्रवामुळे होते, ज्याला अश्रू म्हणतात.
 • असे म्हणतात कि मनुष्य आयुष्यभरात २५० मिलियन वेळेस डोळे मिचकावतो.

 

दृष्टि दोष()

 • हा दोष म्हणजे अपवर्तन () दोष असतो.
 • लाघुदृष्टी किंवा निकट दृष्टीत()

  • या दृष्टि दोषात माणूस जवळच्या वस्तू पाहू शकतो.
  • पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.
  • म्हणजेच दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यांतील पाटलाच्या अलीकडेच तयार होते.
  • या दोषाची करणे:

   • बुबुळ लांबट झाल्याने किंवा भिंग वक्र झाल्याने.
   • डोळ्याचे भिंग व दृष्टीपटल यातील अंतर वाढणे.
   • डोळ्यातील भिंगाचे स्नायू () पुरेसे शिथिल ण होणे, या मुळे भिंगाची अभिसरण शक्ती वाढते.
  • उपाय

   • हा दोष सोयीस्कर अंतर्वक्र भिंगाच्या() सहाय्याने सुधारता येतो.
   • या दोषात प्रकाश किरण हे पडद्यावर पडण्यएवजी पडद्याच्या समोरच पडतात. ते पडद्यावर पडावेत म्हणून पहिल्यांदाच येणाऱ्या प्रकाशाचे अपसरण() घडवून आणणे गरजेचे असते. म्हणून अंतर्वक्र भिंग वापरतात.
   • अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते, त्यामुळे हा दोष असलेल्या व्यक्तीला ऋण शक्तीचा चष्मा असतो.
 • दूर दृष्टीत()

  • या दृष्टि दोषात व्यक्ती दूरचे व्यवस्थित पाहू शकतो, पण जावळचे  स्पष्ट पाहू शकत नाही.
  • जवळच्या वस्तूची प्रतिमा पडद्याच्या मागे तयार होते.
  • करणे:

   • डोळ्यांच्या भिंगांची अभिसरण शक्ती कमी होणे.
   • भिंग चपटे होणे.
   • बुबुळाचा व्यास कमी होणे.
   • भिंग व दृष्टीपटल() यांच्यातील अंतर कमी होणे.
   • भिंगाचे नाघीय अंतर वाढणे.
  • उपाय:

   • सुयोग्य बहिर्वक्र भिंग () वापरून हा दोष दूर करता येतो.
   • या दोषात प्रतिमा पडद्याच्या मागे बनते. ती व्यवस्थित पडद्यावर घडावी म्हणून प्रकाशाचे अभिसरण करणे गरजेचे आहे. हे बहिर्वक्र भिंगाद्वारे केले जाते.
   • बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन असल्याने दूर दृष्टीता असणाऱ्या डोळ्यांसाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात.
 • वृद्ध दृष्टीता()

  • हा वयानुसार होणारा दोष आहे.
  • यामध्ये डोळ्यांची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते.
  • वयस्कर माणसाचा निकातबिंदू मागे हटतो. म्हणून जवळच्या वस्तू व्यवस्थित स्पष्टपणे दिसत नाहीत.
  • काहीवेळा वृद्ध लोकांना दूर दृष्टीता व निकट दृष्टीता असे दोन्ही जाणवतात, तेंव्हा हा त्रास दूर करण्यासाठी त्यांना द्वी नाभीय भिंगाची आवश्यकता असते.
  • करणे:

   • बुबुळ लांबट होणे किंवा भिंग वक्र होणे.
   • डोळ्यांचे भिंग व दृष्टीपटल यातील अंतर वाढणे.
   • द्वी नाभीय भिंगाचा वरचा भाग अंतर्वक्र असतो जो निकात्दृष्टीता दूर करतो. तर खालचा भाग बहिर्वक्र असतो जो दूर दृष्टीता दूर करतो.
 • मोतीबिंदू():

  • हा दोष भिंगाची पारदर्शकता काम्मी झाल्याने होतो.
  • या मध्ये भिंग हा दुधाळ होतो व समोरील वस्तू सुस्पष्ट दिसत नाही.
  • हा दोष वयानुसार वृद्ध व्यक्तीत आढळतो. तसेच जन्मतः च काही लोकांना हा दोष असतो.

नेत्रदान()

 • माणसाचा मृत्यू झाल्यावरही काही काळ डोळे जिवंत राहतात.नेत्रदान केल्याने लाखो लोकांना दृष्टि मिळू शकते.
 • जगात जवळपास ३५ मिलिअन लोक हे दृष्टिहीन आहेत. यापैकी ४.५ मिलियन लोक हे पारपटलामुळे दृष्टिहीन() आहेत, ह्यामध्ये ६०% पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे.
 • व्यक्तीच्या मृत्यू नंतर पहिल्याच ४-६ तासात डोळे कडून नेत्रबँकेत  जमा करणे गरजेचे असते. १० ते १५ मिनिटात डोळे कडता येतात.
 • कोण नेत्रदान करू शकतो:

  • कोणताही व्यक्ती, कोणत्याही वयाची व्यक्ती, ज्यांना अगोदर चष्मा होता ते पण नेत्र दान करू शकतात.
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा या रोगांनी ग्रस्त लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
 • कोण नेत्रदान करू शकत नाही:

  • रोगी/मृत व्यक्ती AIDS, हेपेतासीस B व C, रेबीज, धनुर्वात, कॉलरा Meningitis, Encephalitis अशा संक्रामक रोगांनी ग्रस्त रोगी/मृत व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत.

 

 

अंतर्वक्र आरशाचे उपयोग:

 • टोर्च आणि हेडलाईटमध्ये
 • फ्लड लाईटमध्ये
 • प्रोजेक्टर लाम्प्साठी परावर्तक आरसे.
 • सौर उपकरणा मध्ये उष्णता प्रारणे गोळा करण्यासाठी.
 • दाढीचे आरसे, दान्तवैद्याचे आरसे.
 • सौर भट्टी.

बहिर्वक्र भिंगाचे उपयोग:

 • सूक्ष्म दर्शक – जीवाणू विषाणू पाहण्यासाठी
 • दूरदर्शी – दोन बहिर्वक्र भिंग एक केले जातात.
 • प्रकाशीय उपकरणे – कौमेरा, प्रोजेक्टर

 

अपवर्तन():

 • प्रकाश एका पारदर्शक माध्यमामधून दुसर्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलतो, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात.
 • एखाद्या विशिष्ट माध्यमामधून जाताना प्रकाशाचा वेग एक समान असतो  परंतु जेंव्हा मध्यम बदलते तेंव्हा वेग आणि दिशा दोन्ही बदलतात.
 • उदा – सूर्यप्रकाश जेंव्हा हवेतून पाण्यात प्रवेश करतो तेंव्हा त्याचा वेग आणि त्याची दिशा दोन्ही बदलतात.

अपवर्तनाची संकल्पना:

 • समजा दिलेल्या आकृतीमध्ये बाजू PQ आणि बाजू SR ह्या दोन काचेच्या बाजू आहेत.
 • अपवर्तन म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा प्रवास होय. म्हणजेच काचेच्या चीपेतून दोनदा अपवर्तन होत आहे असे म्हणता येईल.
  • पहिले अपवर्तन = हवेतून बाजू PQ वर.
  • दुसरे अपवर्तन = काचेच्या बाजू SR मधून हवेत.
 • जी प्रकाशाची किरणे तिरक्या दिशेने काचेवर पडतात त्याला अपाती किरण म्हणतात.
 • अपाती किरण काचेवर पडल्यानंतर हे किरण स्वतःची दिशा बदलतात. दिशा बदललेल्या काचेतील किरण म्हणजे अपवर्तीत किरण.
 • काचेवर PQ या बाजूवर ज्या बिंदूपाशी अपातीकिरण आदळतात तेथून काडलेला लांब म्हणजेच स्तांभिका होय.
  • म्हणजेच- < i   = अपाती कोण.
  • <r  = अपवर्तीत कोन.

अपवर्तनाचे काही नियम

 • अपाती किरण अपवर्तीत किरण आणि स्त्म्भाक एकच प्रतलात असतात.
 • अपाती किरण आणि अपवर्तीत किरण हे स्तम्भ्काच्याविरुद्ध बाजूस असतात.
 • दिलेल्या माध्यमांच्या जोदिकारता अपाती कोन आणि अपवार्तीत कोन यांचे गुणोत्तर स्थिरांक असते.
  • म्हणजेच Sin(i) / Sin(r) = स्थिरांक
 • या स्ठीरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसर्या माध्यमाचा अपवर्तनांक() म्हणतात.
 • तो n ने दर्शवितात..

 

अपवर्तनांक()

 • प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक हा ठराविक असतो.
 • साधारणतः कुठल्याही माध्यमाचा अपवर्तनांक हा निर्वात पोकळी() च्या संदर्भात काढतात त्यास शुद्ध अपवर्तनांक () म्हणतात.
 • अपवर्तनांक = (पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग) / ( दुसर्या माध्यमातील प्रकाशाचा वेग)

 

अपवर्तनांका संबंधीचे निष्कर्ष:

 • जेवढा अपवर्तनांक जास्त तेवढा जास्त अपवर्तीत किरण स्तम्भाकाकडे झुकतो. म्हणजेच आपटी कोन हा अपवर्तीत कोनापेक्षा जास्त असतो.
 • जर पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या पेक्षा जास्त असेल तर आपटी कोन हा अपवर्तीत कोनापेक्षा कमी असतो.
 • परंतु अपाती किरण जर माध्यमाच्या हद्दीवर तिरकस न पडता लांब पडले तर किरण अविचालीत पुढे जातो. पण गती मात्र बदलते.

 

अपवर्तन आणि अपवर्तनंकामुळे घडणाऱ्या काही नैसर्गिक क्रिया:

 

ताऱ्यांचे लुकलुकणे()

प्रकाशाचे आपस्करण():

इंद्रधनुष्य():

 

प्रकाशाचे विकिरण():

 

error: