History :: Current Affairs

गोबर धन योजना

गोबर धन योजना (Galvanizing Organic Bio-Agro Resources – DHAN) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रथम जाहीर केली होती. या योजनेचा केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांनी ३० एप्रिल २०१८ रोजी हरियाणातील कर्नाल येथे गोबर-धन योजनेचा शुभारंभ केला.

उद्दिष्ट्ये

 1. ग्रामीण स्वच्छतेवर सकारात्मक परिणाम घडवून आणणे.
 2. शेण आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा व संपत्तीची निर्मिती करणे.
 3. ग्रामीण क्षेत्रात आजिविकेच्या नवीन संधी निर्माण करणे.
 4. ग्रामीण भागातील शेतकरी व इतर व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ करणे.

या योजनेद्वारे २०१८-१९ या वर्षी विविध राज्यांत ७०० बायोगॅस केंद्रांची स्थापना करण्याचे लक्ष्य आहे. ही योजना शेतात शेणखत आणि घनकचनेचे रुपांतर बायोगॅस आणि कंपोस्टमध्ये करेलबायोसीएनजी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसह पशुपक्ष्यांचे उत्पन्न वाढवून खेडोपाडी स्वच्छ ठेवण्यात मदत होईल

वैदिक काळ

वैदिक वाङ्मय

ऋग्वेद 

 • ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ‘ऋग्वेद’ होय.
 • ‘ऋचा’ म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य.
 • अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला ‘सूक्त’ असे म्हणतात.
 • ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत.

यजुर्वेद 

 • यजुर्वेद संहितेमध्येे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत.
 • यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे.
 • पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे.

सामवेद

 • काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरांत मंत्रगायन केले जाई.
 • ते गायन कसे करावे, याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे.
 • भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे.

अथर्ववेद

 • अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे.
 • अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते.
 • आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत.
 • तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे.
 • राजाने राज्य कसे करावे, याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे.

ब्राह्मणग्रंथ

यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे सांगणाऱ्या ग्रंथांना ‘ब्राह्मणग्रंथ’ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत.

आरण्यके

अरण्यात जाऊन, एकाग्र चित्ताने केलेले चिंतन ‘आरण्यक’ ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, याची खबरदारी यात घेतलेली दिसते.

उपनिषदे

‘उपनिषद्’ म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म-मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. वैदिक कर्मकांडाचे टीकात्मक परिक्षण करणारे ग्रंथ आहे. हे वेदांचे अंतिम भाग असल्याने त्यांना वेदांत सुद्धा म्हणतात. उपनिषदांची एकूण संख्या 108 असल्याचे मानले जाते.

स्मृती ग्रंथ 

स्मृती म्हणजे स्मरण करून लिहिण्यात आलेले ग्रंथ होय. प्राचिन धर्म सूत्रांच्या आधारे स्मृती साहित्याची निर्मिती केली गेली आहे. प्राचीनकाळात एकूण 6 स्मृंती ग्रंथ आहेत.  १. मनुस्मृती 2. यज्ञवाल्क्य स्मृती ३. नारद स्मृती 4. पराशय स्मृती ५. बृहस्पति स्मृती 6. कात्यायन स्मृती

इतर साहित्य

 • वेदांग : वेद सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी उत्तर वैदिक काळात वेदांगांची निर्मिती करण्यात आली. एकूण सहा (6) वेदांग आहेत. व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, शिक्षा, छंद व कल्प.
 • उपवेद : एकूण सहा उपवेद आहेत. आयुर्वेद, धनुर्विद्या, गंधर्व, स्थापत्य, कला, अर्थशास्त्र.
 • पुराण : जुन्या धर्म, तत्त्वज्ञान व साहित्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथांना पुराण म्हटले जाते.
 • महाकाव्ये : दोन्ही महाकाव्ये संस्कृत भाषेत असून लिहिण्यासाठी ब्राह्मी लिपी वापरली आहे.
 1. रामायण- वाल्मिकी यांनी लिहिले. इ.स,पूर्व 5 व्या ते इ.स. 12 व्या शतकात निर्मिती झाली असावी (उत्तरोत्तर सुधारणा झाल्या). प्रभु रामचंद्रांचे रावणासोबत युद्धाबद्दल उल्लेख.
 1. महाभारत- महर्षी व्यासने रचना केली. इ.स.पूर्व 10 वे शतक ते इ.स. 4 थे शतक या काळात निर्मिती. हे महाकाव्य रामायणापेक्षा जुने आहे. याला शतसाहस श्रीसंहिता असेही म्हटले जाते. तसेच पाचवा वेदही मानले जाते.

वेदकालीन नद्या

सिंदु नदीच्या उपनद्यांची वेदकालीन नावे :-

 • झेलम – वितस्ता
 • चिनाब – असिक्नी
 • रावी – परुश्नी
 • बियास – विपास
 • सतलज – शुतुद्री
 • इंडस – सिंधु
 • नदीतरण / घागरऱ्हाक्रा – सरस्वती
 • गोमती – गोमल

वेदकालीन कुटुंबव्यवस्था व दैनंदिन जीवन

वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे ‘गृहपती’ असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती.

सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले.

वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टेविणून त्याच्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे ‘कूड’. या घरांच्या जमिनी शेणा-मातीने सारवलेल्या असत. घरासाठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात.

वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात ‘यव’, ‘गोधूम’, ‘व्रीहि’ यांसारखे शब्द आढळतात. यव म्हणजे सातू (बार्ली). गोधूम म्हणजे गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता.

वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. ‘निष्क’ नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठीही होई.

गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत.

आर्थिक आणि सामाजिक जीवन

वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे.

वैदिक काळात घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गाईंचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती. इतरांनी गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई.

घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले, आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ खूप वेगवान होते.

त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातिव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली.

आश्रमव्यवस्था

आदर्श आयुष्य कसे जगावे, यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना ‘चार आश्रम’ असे म्हटलेले आहे.

 • पहिला आश्रम म्हणजे ‘ब्रह्मचर्याश्रम’. गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ.
 • ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत, अशी अपेक्षा असे.
 • तिसरा आश्रम म्हणजे ‘वानप्रस्थाश्रम’. या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी रहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे.
 • चौथा आश्रम म्हणजे ‘संन्यासाश्रम’. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये, असा संकेत होता.

वेदकालीन धार्मिक कल्पना

 • धर्मकल्पना वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्येविविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ.
 • सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियमअधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले.
 • वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा. हे नियमित असणारे सृष्टिचक्र आहे. सृष्टिचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ‘ऋत’ असे नाव दिले.
 • प्राणिमात्रांचे जीवन हाही सृष्टिचक्राचाच एक भाग आहे. सृष्टिचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत, असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे, असे समजले जाई.

वेदकालीन राजकीय व्यवस्था 

 • वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. त्याला ‘ग्रामणी’ असे म्हणत.
 • अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे ‘विश्’. त्याच्या प्रमुखाला ‘विश्पति’ असे म्हणत.
 • अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले. ‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई.
 • प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती.
 • राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला ‘भागदुघ’ असे म्हणत. ‘भाग’ म्हणजे वाटा. ‘जन’च्या उत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा, तो भागदुघ.
 • राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’, ‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’ अशा चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत.
 • ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस ‘समिती’ असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे.

हडप्पा संस्कृती

1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले. अनेक शहरे सिंधु नदीच्या खोऱ्यात सापडल्याने सिंधु संस्कृती असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, जम्मु-कश्मिर इ. प्रदेशात विस्तारीत संस्कृती होती. हे नागरीकीकरण सिंधु व तिच्या उपनद्या, घागरा आणि आता लोप पावलेली सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले होते. 

हडप्पा संस्कृतीचा काळ साधारणपणे इ.स.पुर्व 3500-इ.स.पूर्व 1800 होता. हडप्पा संस्कृतीचा उगम कसा झाला, संस्कृतीची स्थापना कोणी केली याविषयी माहिती अजुनही उपलब्ध नाही. आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागला आहे. त्यांपैकी सुमारे १५०० भारतात आणि सुमारे ५०० पाकिस्तानात आहेत.

हडप्पा कालीन महत्त्वाची ठिकाणे व त्यांचे संशोधक

 
राज्य ठिकाण संशोधक
गुजरात धौलविरा आर. एस. बिश्त 

लुनी नदीच्या काठावर

लोथल एस. रंगनाथ राव (१९५४)

भोगवा नदीच्या काठावर

रंगपुर माधवस्वरुप वत्स, भगतत्राव
राजस्थान कालीबंगन ए. घोष

घग्गर नदीच्या काठावर

हरियाणा बनवाली आर.एस.विष्ठ
रोपर वाय.डी.शर्मा
जम्मू-काश्मीर मांडा जे. पी. जोशी (१९७६-७७)
पंजाब हडप्पा दयाराम सहानी (१९२१-२३)

रावी नदीच्या काठावर

सध्या पाकिस्तानात

उत्तर प्रदेश आलमगीर  यज्ञदत्त शर्मा
सिंध  मोहनजोदाडो  रखलदास बॅनर्जी (१९२२)

सिंधू नदीच्या काठावर

सध्या पाकिस्तानात

 चान्हुदारो  गोपाल मुजुमदार (१९३१)

किल्ला नसलेले एकमेव ठिकाण

 कोटदीजी  धूर्ये
बलुचिस्तान  सुटकाजेंदर  आर. एल. स्टाईन

 

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये-

नियोजनबद्ध नगरे

 • ग्रीड पॅटर्न शहर रचना.
 • शहराची विभागणी – सिटॅडल आणि सामान्य भाग.
 • सिटॅडल मध्ये उच्च कुलिन व शासनकर्ते राहत असावेत.
 • रस्तेरुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात.
 • हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती.
 • मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत.
 • सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते.
 • शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणांचा समावेश. उदा. मोहनजोदाडो येथील धान्य कोठारे आणि सार्वजनिक कुंड. (कदाचित धार्मिक विधीपूर्वी स्नान करण्यासाठी वापर होत असावा.)
 • शहरांभोवती तटरक्षक भिंती.

शेती

 • तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यांमध्ये गहू, सातू (बार्ली) ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. यांखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता.
 • जमिनी नांगरल्या जात. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे.
 • शेतीला सिंचनासाठी नद्यांवर बांधारेही बांधले जात. उदा. धौलाविरा.
 • अन्नधान्य साठवण्यासाठी गोदामे होती. (मोहनजोदाडो).
 • प्राणी पाळले जात. – बैल, म्हैस, शेळी, डुक्कर, उंट, गाढव.
 • हत्ती, हरिण इ. प्राण्यांबद्दल माहिती होती. मात्र घोडा त्यांना माहित नसावा.

तंत्रज्ञान व कला :-

 • अवजारांसाठी मुख्यतः ब्राँझ आणि दगडांचा वापर.
 • विविध नाणी, व्यापारी जहाजे बनवली जात. सोनार विविध आभूषणे बनवत. त्यासाठी स्टिएटाईट आणि लॅपीस लॅझुली दगडांचा तसेच सोने आणि तांब्यांचा वापर होत.
 • हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यांमध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात
 • कुंभार कामासाठी चाकाचा वापर होत असे.
 • मोहनजोदाडो येथे नर्तिकेची प्रसिद्ध मूर्ती सापडली आहे.

व्यापार

 • सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत.
 • काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात.
 • परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे.
 • संपूर्ण प्रदेशात सारखीच वजन व मापे.
 • मापांसाठी दशमान पद्धतीचा वापर. वजनमापे बनवण्यासाठी वेगवेगळया दगडांचा वापर होत असे.
 • जहाजांचा वापर व्यापारासाठी होत; तसेच बैलगाडीही वापरत.
 • लॅपिस लॅझुली या मौल्यवान दगडांचा व्यापार दुरस्थ भागाबरोबर चालत.

राजकीय व्यवस्था

व्यवस्थेबद्दल ठोस पुरावे नाहीत; मात्र प्रचंड विस्तारलेल्या नागरीकरण आणि मोहनजोदाडो येथील सार्वजनिक कुंड व सापडलेल्या पुरोहित सदृश्य मूर्तीच्या आधारे असे म्हणता येईल की शासन व्यवस्था नक्कीच अस्तित्वात होती.

धर्म

 • स्त्री देवता व नैसर्गिक शक्तींची पूजा करत असावेत.
 • अनेक नाणी आणि मुद्रांवर पशुपती शिवाची चित्रे आढळली आहेत.
 • पिंपळाचे झाड आणि एक शिंगी प्राण्यांची मुद्राचित्र सापडले आहेत.
 • मात्र धर्माबाबत काहीही स्पष्ट सांगता येत नाही; कारण लिखित पुरावे किंवा मंदिर सदृश्य इमारती आढळल्या नाहीत.
 • हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत.

लिपी

हडप्पा कालीन लोक चित्र लिपी वापरत असत. मात्र आजपर्यंत त्याचा अर्थ समजू शकलेला नाही.

लोकजीवन व समाज

 • उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता.
 • विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री-पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत.
 • शस्त्रांस्त्रांचा अभाव – समाज शांतताप्रिय होता.
 • समाजात जातीभेद नसावेत.
 • स्त्रीयांना समाजात महत्त्वाचे स्थान.
 • गुलामगिरी अस्तित्त्वात होती.
 • मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.

संस्कृतीचा अंत

संस्कृतीच्या उगमाप्रमाणे अस्ताविषयी ही कोणतीही ठोस माहिती नाही. साधारणपणे इ.स.पूर्व 1800 मध्ये संस्कृतीचा अंत झाला.त्याची खालील कारणे असावीत –

 • दुष्काळ आणि भूकंप.
 • पुन्हा पुन्हा येणारे महापूर
 • व्यापारातील घट
 • सिंधू नदीने पात्र बदलले असावे.
 • प्रदेशातील शुष्कता वाढणे व घग्गर नदी कोरडी पडणे.
 • आर्यांचा हल्ला.
 • परिस्थितीकीय असमतोल.

मात्र यापैकी कोणतेही एक कारण इतिहासकारांना मान्य नाही.

सर जॉन शोअर

सर जॉन शोअर :- 1793 ते 1798 

 1. सर जॉन शोअर हा तटस्थ धोरणाचा पुरस्कर्ता होता.
 2. इंग्रज मराठे व निजामांच्या खर्डा येथील तटस्थ राहिल्याने मराठ्यांनी निजामाचा पराभव केला.

रॉबर्ट क्लाईव्ह

रॉबर्ट क्लाईव्ह :- 1757 ते 1760 व दुसऱ्यांदा 1765 ते 1767

 1. मे 1765 मध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्हची नेमणूक करण्यात आली.
 2. दिल्लीच्या बादशहाकडुन रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताचे दिवाणी अधिकार मिळविले.
 3. 12 आॅगस्ट 1765 रोजी बंगाल प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली.
 4. दुहेरी राज्यव्यवस्था :- राज्याचे नाममाञ अधिकार बंगालच्या नवाबाकडे ठेवण्यात आले. तर कायमस्वरुपी अधिकार इंग्रजांनी स्वत:कडे ठेवले.
 5. नवाबास जबाबदार असे दोन नायब नवाब निर्माण करुन कंपनीसाठी सारा वसुली करण्याची जबाबदारी त्यांचेवर ठेवण्यात आली. लवकरच दुहेरी राज्य व्यवस्थेचे दोष दिसुन येण्यास सुरुवात झाली.

लॉर्ड मिंटो

लॉर्ड मिंटो:- १८०७ ते १८१३

 1. १८०९ मध्ये\ रणजितसिंहांशी लॉर्ड मिंटोने करार केला.
 2. लॉर्ड मिंटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले.
 3. १८१३ – चार्टर अ‍ॅक्ट : या कायद्यानुसार कंपनी प्रशासनाला एक लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले. या कायद्याने भारतातील व्यापारावरील कंपनीचा एकाधिकार काढून घेण्यात आला. (फक्त चहाचा व्यापार व चीनबरोबरचा व्यापार वगळता).

लाॅर्ड मिंटो दुसरा

लाॅर्ड मिंटो दुसरा :- (1905 ते 1910)

 1. 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले. 
 2. लाॅर्ड मिंटो याने 1908 मध्ये फॅक्टरी कमिशन नेमले. 
 3. 1907 मध्ये देशातील पहिला पोलाद कारखाना जमशेदपुर येथे जमशेदजी टाटा यांनी स्थापन केला.

लाॅर्ड हॉड्रिग्ज दुसरा

लाॅर्ड हॉड्रिग्ज दुसरा :- (1910 ते 1916)

 1. 12 डिसेंबर 1911 रोजी भारताची राजधानी कलकत्त्याहुन दिल्ली येथे आणण्यात आली.  
 2. लाॅर्ड हॉड्रिगज याने बंगालची फाळणी रद्द केली. याची घोषणा 12 डिसेंबर 1911 रोजी पंचम जार्ज या ब्रिटीश सम्राटाने केली. 
 3. 1915 मध्ये इंग्रजांनी डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट पास केला. 
 4. 1915 मध्ये ब्रिटीश शासनाने पहिल्यांदाच ग्रामपंचायत विषयक कायदा केला.

लाॅर्ड वेलिंगडन

लाॅर्ड वेलिंगडन :- (1931 ते 1936)

 1. या व्हाईसरॉयच्या काळात 1931 व 1932 मध्ये दुसरी व तिसरी गोलमेज परिषद पार पडली. 
 2. मार्च 1933 मध्ये गोलमेज परिषदेवर श्वेत पत्रिका जाहीर करण्यात आली. 
 3. 1932 मध्ये डेहराडुन येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी स्थापन करण्यात आली. 
 4. 1931 मध्ये ब्रिटीश शासनाने काॅंग्रेसला बेकायदेशीर घोषित केले.

लाॅर्ड लिनलिथगो

लाॅर्ड लिनलिथगो :- (1936 ते 1943)

 1. ब्रिटीश हिंदुस्थानचा सर्वाधिक काळ असलेला व्हाईसरॉय म्हाजे लाॅर्ड लिनलिथगो हा होता. 
 2. 08 आॅगस्ट 1940 रोजी दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत हा इंग्लंडच्या बाजुने सामील झाला आहे अशी घोषणा लाॅर्ड लिनलिथगो याने केली त्यामुळे प्रांतिक सरकारने राजीनामे दिले. 
 3. 1942 साली सुरु झालेल्या छोडो भारत चळवळीमध्ये लाॅर्ड लिनलिथगो याने काॅंग्रेसवर बंदी घातली.
error: