पुरस्कार :: Current Affairs

साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय साहित्य अकादमीकडून 1954 पासून दरवर्षी  २४ भाषेतील (आठव्या परिशिष्ठातील २२ भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी भाषा) उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो. यामध्ये ताम्रपत्रासह रोख रक्कम एक लाख रुपये दिली जाते. साहित्य अकादमी फेलोशिपनंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये देण्यात येणारा द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

साहित्य अकादमी फेलोशिप

किम यांग शिक यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर

 • दक्षिण काेरियाच्या नामांकित लेखिका व रवींद्रनाथ टागाेर यांच्या साहित्याच्या अनुवादक तथा अभ्यासक किम यांग शिक यांना भारतीय साहित्याच्या विकासात दिलेल्या उल्लेखनीय याेगदानाबद्दल मानद फेलाेशिप जाहीर करण्यात अाली अाहे.
 • भारतीय साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा हा सर्वाेच्च सन्मान मिळवणाऱ्या ८७ वर्षीय किम यांग शिक या पहिल्या विदेशी लेखिका ठरल्या अाहेत.
 • किम या रवींद्रनाथ टागाेर यांच्या साहित्याच्या तज्ज्ञ अभ्यासक असून, त्यांनी ‘गीतांजली’चा काेरियन भाषेत अनुवाद केला अाहे.
 • तसेच रवींद्रनाथ टागाेर यांच्या अनेक नाटकांसह साहित्य अकादमीचे पहिले सचिव कृष्ण कृपलानी यांच्या टागाेरांवरील पुस्तकाचाही काेरियन भाषेत अनुवाद केला अाहे.
 • ४ जानेवारी १९३१ मध्ये जन्मलेल्या किम या टागाेर साेसायटीच्या संस्थापक-अध्यक्षा व भारतीय कला संग्रहालयाच्या संस्थापक-निर्देशिका अाहेत.

साहित्य अकादमी भाषा सन्मान

स्थापना

1 996 साली

उद्देश

भाषेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे.

स्वरूप

सध्या एक पुरस्कार पञक आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1996 मध्ये पुरस्काराची धनराशी रुपये 25,000 होती, 2001 मध्ये रु. 40,000 , 2003 मध्ये रु 50,000, आणि सन 2009 मध्ये 1 लाख रु झाली आहे.

 

 • मगाही भाषेतील साहित्याचे लेखक श्री. शेष आनंद मधुकर यांना साहित्य अकादमी भाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 • हा पुरस्कार देण्याकरिता ते माघवी भाषेचे दुसरे लेखक आहेत.
 • हा सन्मान साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते दिला गेला.
 • शेष आनंद मधुकर हे मगाही भाषेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे. त्यांनी हिंदीतील व्याख्याता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
 • 19५0 मध्ये त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी भाषेच्या संपन्नतेत प्रचंड योगदान केले आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कलाकारांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार मानण्यात येतो.

स्थापना

या पुरस्काराची सुरुवात ३१ मे १९५२ पासून झाली.

मुख्यालय

संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

उद्देश

संगीत, नाटक आणि नृत्य कलेला प्रोत्साहन देणे.

पुरस्काराचे स्वरूप

संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती प्राप्त पुरस्कार्थींना- 3 लाख रुपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट

संगीत नाटक अकादमी पुरस्कार्थींना- 1 लाख रुपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट

वितरण

संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार- २०१६

 • महाराष्ट्रातील तिघांना 2016 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 • ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मा तळवळकर   प्रभाकर कारेकर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • यावर्षी 4 मान्यवरांना अकादमी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर 43 कलाकारांना अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार

खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून २००२ पासून मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. ‘हॉकीचे जादुगार’ अशी ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताला सुवर्णयुगाची अनुभूती दिली. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते.

या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कारद्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.

पुरस्काराचे स्वरूप 

या पुरस्काराचे स्वरूप एक फोटो, प्रमाणपञ व ५ लाख रूपये असे आहे

आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पुरस्कारप्राप्त खेळाडू 

हा पुरस्कार आतापर्यंत 51 खेळाडूंना मिळालेला आहे. –

२००२ शाहुराज बिराजदार बॉक्सिंग
२००२ अशोक दिवान हॉकी
२००२ अपर्णा घोष बास्केटबॉल
२००३ चार्ल्स कर्नेलियस हॉकी
२००३ राम कुमार बास्केटबॉल
२००३ धरम सिंह हॉकी
२००३ ओम प्रकाश व्हॉलीबॉल
२००३ स्मिता शिरोले यादव रोइंग
२००४ दिगंबर मेहंदले एथलेटिक्स (दिव्यांग)
२००४ हरदयाल सिंह हॉकी
२००४ लाभ सिंह एथलेटिक्स
२००५ मारुति माने कुस्ती
२००५ मनोज कुमार कोठारी बिलियर्ड्स आणि  स्नूकर
२००५ राजिंदर सिंह हॉकी
२००६ हरिश्चंद्र बिराजदार कुस्ती
२००६ उदय के॰ प्रभु एथलेटिक्स
२००६ नंदी सिंह हॉकी
२००७ राजिंदर सिंह कुस्ती
२००७ शमशेर सिंह कबड्डी
२००७ वरिंदर सिंह हॉकी
२००८ ज्ञान सिंह कुस्ती
२००८ हकम सिंह एथलेटिक्स
२००८ मुखबैन सिंह हॉकी
२००९ सतबीर सिंह दाहिया कुस्ती
२००९ ईशर सिंह देओल एथलेटिक्स
२०१० अनीता चानू भारोत्तोलन
२०१० सतीश पिल्लै एथलेटिक्स
२०१० कुलदीप सिंह कुस्ती
२०११ शब्बीर अली फुटबॉल
२०११ सुशील कोहली जलतरण
२०११ राजकुमार कुस्ती
२०१२ गुनदीप कुमार हॉकी
२०१२ विनोद कुमार कुस्ती
२०१२ जगराज सिंह मान एथलेटिक्स
२०१२ सुखबीर सिंह टोकस दिव्यांग खेळ
२०१३ सैयद अली हॉकी
२०१३ अनिल मान कुस्ती
२०१३ मैरी डिसूजा सक्विरा एथलेटिक्स
२०१३ गिरिराज सिंह एथलेटिक्स (दिव्यांग  खेळ)
२०१४ ज़ीशान अली टेनिस
२०१४ गुरमेल सिंह हॉकी
२०१४ के पी ठक्कर जलतरण
२०१५ रोमियो जेम्स हॉकी
२०१५ शिव प्रकाश मिश्र टेनिस
२०१५ टी पी पद्मनाभन नायर व्हॉलीबॉल
२०१६ सिल्वानस डुंग डुंग हॉकी
२०१६ सती गीता एथलेटिक्स
२०१६ राजेंद्र प्रल्हाद शेल्के रोइंग
२०१७ सैयद शाहिद हाकिम फ़ुटबॉल
२०१७ सुमराइ टेटे हॉकी
२०१७ भूपेंदर सिंह एथलेटिक्स

 

‘नारीशक्ती’ पुरस्कार

नारी शक्ती पुरस्कार (स्त्री शक्ती पुरस्कार) ही महिलांच्या असामान्य कामगिरीसाठी स्त्रियांना देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सहा श्रेणींमध्ये दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये झाली. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, नवी दिल्ली येथे 8 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक (रू .100,000) आणि प्रमाणपत्र दिले जाते

श्रेणी

हा पुरस्कार भारतीय इतिहासातील प्रतिष्ठित स्त्रियांच्या नावावरून पुढील श्रेणींमध्ये दिला जातो.

 1. अहिल्या बाई होळकर पुरस्कार:
 2. कन्नगी पुरस्कार: एक महान तमिळ स्त्री कन्नगीच्या नावावरून
 3. माता जिजाबाई पुरस्कार:
 4. राणी गियादिनलिनू झेलिआंग पुरस्कार: 20 व्या शतकातील आध्यात्मिक आणि राजकीय नागा राणी गेडलिनुच्या नावावरून
 5. राणी लक्ष्मी बाई पुरस्कार:
 6. रानी रूद्रममा देवी पुरस्कार (स्त्री व पुरुष दोघांसाठी): रुढ्रामा देवी नावाचा 13 व्या शतकातील दख्खनची राज्यकर्ती

नारी शक्ती पुरस्कार-२०१७

 • अनाथांची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारीशक्ती’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. सिंधुताई सपकाळ

या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सिंधुताईंना बरेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही –

 • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
 • २०१० – स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
 • मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
 • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
 • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
 • राजाई पुरस्कार.
 • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
 • श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
 • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
 • २००८ – दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

 उर्मिला आपटे 

उर्मिला बळवंत आपटे या मुंबई येथील ‘भारतीय स्त्री शक्ती’ स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. यांना त्यांच्या संस्थेच्यावतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाच्या योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय स्त्री शक्ती ही स्वयंसेवी संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरिक आरोग्य, स्वाभीमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसुत्रीवर मोहिम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून समुपदेशनाचे कार्य करते.

शौर्य पुरस्कार (Gallantry Awards)

स्वातंत्र्योत्तर काळात, 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारद्वारे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र या तीन शौर्य पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. ते 15 ऑगस्ट 1947 पासून अंमलात आले. त्यानंतर 4 जानेवारी, 1952 रोजी अशोक चक्र वर्ग -1, अशोक चक्र वर्ग -2 आणि अशोक चक्र वर्ग -3 या अन्य तीन शौर्य पुरस्कारांची सुरुवात भारत सरकारने केली. 15 ऑगस्ट १९४७ पासून ते प्रभावी ठरले. जानेवारी 1967 मध्ये या पुरस्कारांचे अनुक्रमे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र असे नामकरण करण्यात आले. हे वीरता पुरस्कार वर्षातून दोनदा घोषित केले जातात – प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मग स्वातंत्र्यदिनानिमित्त. या पुरस्कारांचे प्राधान्य क्रम आहे परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र.

शौर्य पुरस्कार-2018

 • २५ जानेवारी २०१८ रोजी केंद्र सरकाने ‘शौर्य पुरस्कार-2018’ (Gallantry Awards-2018) ची घोषणा केली आहे.
 • ज्यामध्ये भारतीय वायु सेन कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • २६ जानेवारी २०१८ रोजी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची पत्नी आणी आई यांचा सम्मान केला.
 • अशोक चक्र हा शांती काळात दिला जाणारा सर्वोच्च सम्मान पुरस्कार आहे.
 • कीर्ति चक्र हा पुरस्कार मेजर विजयंत विष्ट यांना प्रदान करण्यात आला आहे.
 • तर शौर्य चक्र पुरस्काराचे मानकरी देवेंद्र मेहता, खैरनर मिलिंद किशोर (मरणोत्तर), अखिल राज आरवी, निलेश कुमार नयन (मरणोत्तर) कैप्टन रोहित शुक्ला, कैप्टन अभिनव शुक्ला, कैप्टन प्रदीप शौर्य आर्य, हवलदार मुबारक अली, हवलदार रबीन्द्र थापा, नायक नरेंदर सिंह, लांस नायक बदहर हुसैन आणि पी. टी. आर. मंचू हे ठरले आहेत.

ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार (अकादमी पुरस्कार) हा चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट दिग्दर्शक, कलाकार आणि लेखकांचा सन्मान करण्यासाठी अमेरिकन ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स (AMPAS) कडून जातो. पहिला अकादमी पुरस्कार सोहळा 16 मे 1929 रोजी हॉलीवूडमधील हॉटेल रूजवेल्ट येथे आयोजित करण्यात आला होता.

८९ वे ऑस्कर पुरस्कार-२०१७

 • या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किम्मेल यांनी केले.
 1. सर्वोत्कृष्ट चित्रपट – द शेप ऑफ वॉटर
 2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिसोरी)
 3. सर्वोत्कृष्ट अभिनेता – गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)
 4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – गुलेरमो डेल टोरो (शेप ऑफ वॉटर)
 5. सर्वोत्कृष्ट गीत – रिमेंमबर मी (कोको)
 6. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अलेक्झँडर डेस्प्लॅट (शेप ऑफ वॉटर)
 7. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी – ब्लेड रनर २०४९
 8. सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) – जॉर्डन पीले (गेट आउट)
 9. सर्वोत्कृष्ट पटकथा – (अडॅप्टेड)- जेन्म आयव्हरीचा (कॉल मी बाय युवर नेम)
 10. सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट – द सायलंट चाइल्ड
 11. सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री – हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द ४०५
 12. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग – ली स्मिथ (डंकर्क)
 13. सर्वोत्कृष्ट वीएफएक्ससाठी – ब्लेड रनर २०४९

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार १९८५ पासून देण्यात येतात. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात. आपली सेवा बजावताना विक्रमी कामगिरी करणाऱ्या, उत्पादनात विशेष योगदान देणाऱ्या, नवनिर्मितीचे कौशल्य असणाऱ्या, प्रसंगावधान व साहस दाखविणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या कामगारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार- स्वरूप

श्रम पुरस्कारांची एकूण संख्या ३३ आहे

श्रम रत्न

एकूण पुरस्कार १ – रु. दोन लाख आणि त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल एक सनद.

श्रम भूषण

एकूण पुरस्कार-४- रु. 100000 आणि एक सनद

श्रम वीर/श्रम वीरांगना

एकूण पुरस्कार-१२- रु. 60000 आणि एक सनद

श्रम श्री/ श्रम देवी

एकूण पुरस्कार -१६-रु. 40000 आणि एक सनद

 • पुरस्कार विजेत्यांना रोख रकमेव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या हस्ते सनद दिली जाते. तसेच पुरस्कार विजेत्यांना द्वितीय श्रेणीच्या रेल्वे तिकिटांवर ७५ टक्के सवलत मिळते.
 • श्रम रत्न हा पुरस्कार वगळता इतर पुरस्कार सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान संख्येत दिले जातात.
 • या पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाते व वितरण पंतप्रधानांच्या सोयीच्या वेळेनुसार केले जाते.

प्रधानमंत्री श्रम पुरस्कार 2016

 •  शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सेवेसाठी ‘प्रधानमंत्री श्रम पुरस्कार २०१६’ ची घोषणा करण्यात आली आहे.
 • श्रमरत्न, श्रमभूषण, श्रम वीर/वीरांगना आणि श्रमश्री/श्रमदेवी अशा चार श्रेणीत हे पुरस्कार देण्यात येतो.
 • देशभरातील ५० कामगारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • सेल, भेल आणि टाटा स्टीलच्या एकूण १२ कामगारांना श्रमभूषण पुरस्कार जाहीर झाला.
 • यावर्षी श्रमरत्न पुरस्कारासाठी देशभरातून कुणाचीच निवड झालेली नाही.
 • याशिवाय १८ जणांना श्रमवीर/श्रमवीरांगणा पुरस्कार तर २० कामगारांना श्रमश्री/श्रमदेवी पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार 1901 पासून नोबेल फाउंडेशनकडून स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ देण्यात येत आहे. हा पुरस्कार शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

दरवर्षी स्टॉकहोम (स्वीडन) येथे पुरस्कारांचे  वितरण करण्यात येते.  मात्र शांततेचे नोबेल पुरस्कार ओस्लो (नॉर्वे) येथे प्रदान केले जातात. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येत नाही, मात्र एखादी व्यक्ती पुरस्कार घोषित झाल्यास मरण पावली तर तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सुरुवातीस अर्थशास्त्र या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती. १९६८ साली स्वीडिश नॅशनल बँकेने आपल्या  ३०० व्या वर्धापनाच्या निमित्ताने दिलेल्या देणगीमधून अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची स्थापना करण्यात आली. १९६९ साली अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार डच आणि नॉर्वेजियन अर्थशास्त्री जॅन टिन्बर्गन आणि रग्नेर फ्रिच यांना देण्यात आला.

नोबेल पुरस्कारप्राप्त भारतीय

भारतीय नागरिकत्व असणारे

 1. रवींद्रनाथ टागोर- (साहित्य) (1913)- रवींद्रनाथ टागोर हे नोबेल विजेते पहिले भारतीय होते. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता झाला. ते ‘गुरुदेव’ या नावाने ओळखले जात. गीतांजली या कवितासंग्रहासाठी त्यांना 1913 साली नोबेल पुरस्कार मिळाला.
 2. चंद्रशेखर वेंकटरामन- (विज्ञान) (1930)- भौतिकशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण हे होते. 1930 मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला. रमण यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुचिरप्पाल्लीजवळील तिरुवीकक्कल येथे झाला. त्यांनी चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ते कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. चंद्रशेखर वेंकटरमण यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांना ‘सर’ या पदवी देऊन सन्मानित केले गेले. त्यांच्या संशोधनात त्यांनी प्रतिबिंबित प्रकाशात इतर तरंगलांबीचे किरण देखील कसे उपस्थित आहेत हे पडताळून पाहिले. त्यांचे संशोधन रमण परिणाम म्हणून ओळखले जाते.
 3. मदर टेरेसा- (शांतता) (1979)- मदर टेरेसा यांचा जन्म अल्बेनियामध्ये स्कोप्जे नावाच्या ठिकाणी झाला. हे ठिकाण आता युगोस्लाव्हिया मध्ये आहे. त्याचे बालपणीचे नाव अएग्नस गोंक्सहा बोजाक्सिऊ होते. 1928 मध्ये त्या आयर्लंडची संस्था सिस्टर्स ऑफ लोरेटो मध्ये सहभागी झाल्या. १९२९ मध्ये त्या मिशनरी बनून कलकत्ता येथे आल्या. निराधार आणि बेरोजगार लोकांच्या दुःखाला दूर करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतली. गरिबांच्या आणि आजारी लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी मिशनरी ऑफ चॅरिटी नावाची संघटना स्थापन केली आणि कुष्ठरोग्यांसाठी निर्मल हृदय नावाची संस्था स्थापन केली.
 4. अमर्त्य सेन- (अर्थशास्त्र) (1998)- 1999 च्या नोबेल पुरस्काराचे मानकरी अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले आशियाई आहेत. शांतिनिकेतनमध्ये जन्मलेल्या या विद्वान अर्थशास्त्रीने सार्वजनिक कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना मांडली आहे. त्यांनी कल्याण आणि विकास विविध पैलूंवर अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहे
 5. कैलाश सत्यार्थी- (शांती) (2014)

भारतीय वंशाचे

 1. हरगोविंद खुराना 1968- हरगोबिंद खुराना यांना वैद्यकीयशास्त्र क्षेत्रात संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय वंशाचे डॉ. खुराणा यांचा जन्म पंजाबमध्ये रायपूर (सध्या पाकिस्तान) येथे झाला. लिव्हरपूल विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी घेतली. 1 9 60 मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. त्यांनी त्यांच्या संशोधनातून जनुकीय कोडची व्याख्या केली आणि प्रथिने संश्लेषणात त्याची भूमिका शोधून काढली.
 2. सुब्रमण्यम चंद्रशेखर 1983- 1983 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई येथे झाले. ते नोबेल पारितोषिक सर सी. रमण यांचे भाचे होते. नंतर चंद्रशेखर अमेरिकेत गेले, तिथे त्यांनी खगोलभौतिक मंडळाशी आणि सौर मंडळाशी संबंधित अनेक पुस्तके लिहिली.
 3. वेंकटरामन रामकृष्णन 2009- 

भारतात जन्मलेले

रोनाल्ड रॉस

नोबेल पुरस्कार २०१७

शांतता- संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान International Campaign To Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेला.

साहित्य- साहित्यातील नोबेल पुरस्कार ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना मिळाला. ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

भौतिकशास्त्र-  रेनर वेईस, बॅरी बॅरीश, कीप थॉर्न या अमेरिकन संशोधकांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. गुरुत्वीय लहरींचे संशोधन

रसायनशास्त्र- जाक डुबोशे, योआखिम फ्रैंक और रिचर्ड हेंडरसन यांना cryo electron microscopy च्या संशोधनाबाबत

वैद्यकीयशास्त्र- जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना  ‘molecular mechanisms controlling the circadian rhythm’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी

अर्थशास्त्र- रिचर्ड थेलर

गोल्डन ग्लोब पुरस्कार

प्रत्येक वर्षी, हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (एचएफपीए) मनोरंजन-जगातील विशेष कामगिरींसाठी गोल्डन ग्लोब पुरस्काराने देशी-परदेशी कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित करते. जानेवारी 1944 मध्ये लॉस एंजल्स येथे पहिले गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरित करण्यात आले होते. दरवर्षी जानेवारीत दिले जाणारे हे पुरस्कार 9३ आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या मताच्या आधारावर दिले जातात. हे पत्रकार हॉलीवूडशी आणि अमेरिकेबाहेरील मीडियाशी संलग्न असतात.

75 वे गोल्डन ग्लोब पुरस्कार

लाॅस एंजेलीस येथे पार पडलेल्या ७५ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग या चित्रपटास सर्वाधिक चार पुरस्कार मिळाले. तसेच भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता अजीज अन्सारी यांना म्युझिकल कॉमेडी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

गोल्डन ग्लोबमधील सर्व पुरस्कार आणि विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे-

बेस्ट मोशन पिक्चर- ड्रामा- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग

बेस्ट मोशन पिक्चर- म्युझिकल/ कॉमेडी- लेडी बर्ड

बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर ड्रामा- फ्रान्सेस मॅकडोरमंड

बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर ड्रामा- गॅरी ओल्डमॅन

बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को

बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- सोर्स रोनन

बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्ट्रेस) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- एलिसन जेनी, आई, तोन्या

बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- सॅम रॉकवेल

बेस्ट डायरेक्टर, मोशन पिक्चर – गुलिर्मो डेल टोरो (दि शेप ऑफ वॉटर)

बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) मोशन पिक्चर, म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को (दि डिझास्टर आर्टिस्ट)

बेस्ट स्क्रीनप्ले, मोशन पिक्चर – मार्टिन मॅक्डॉनाग (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग)

बेस्ट मोशन पिक्चर, अॅनिमेटेड – कोको

बेस्ट मोशन पिक्चर, फॉरेन लॅंग्वेज – इन दि फेड

बेस्ट ओरिजिनल साँग, मोशन पिक्चर – दिस इज मी (दि ग्रेटेस्ट शोमॅन)

बेस्ट टीव्ही सीरिज, ड्रामा – दि हैंडमेड्स टेल

बेस्ट परफॉर्मन्स अॅक्टर, टीव्ही सीरिज, ड्रामा- स्टर्लिंग के ब्राउन (दिस इज अस)

बेस्ट टीव्ही सीरिज, म्यूझिकल/ कॉमेडी – दि मार्वलस मिसेस मेजल (अमेजन)

बेस्ट परफॉर्मन्स इन टीव्ही सीरिज (अॅक्ट्रेस) म्युझिकल/ कॉमेडी – रेचल ब्रॉसनहन (दि मार्वलस मिसेस मेजल)

बेस्ट टीव्ही लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही – बिग लिटिल लाइज (एचबीओ)

बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही (अॅक्ट्रेस) – निकोल किडमॅन (बिग लिटिल लाइज)

बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – इवान मॅकग्रेगर (फार्गो)

बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (एक्ट्रेस) – लॉरा डर्न (बिग लिटिल लाइज)

बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – एलेग्जेंडर स्कार्सगार्ड

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यास सन १९८८-८९ पासून सुरुवात झाली. तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व  पणाला लावून आपले जीवन क्रीडाविकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षिचा गौरव करण्यासाठी सन २००१-२००२ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारची सुरुवात झाली.

पुरस्काराचे स्वरूप

 1. जींवन गौरव पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु.३.०० लाख.
 2. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक-कार्यकर्ते) – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु.१.०० लाख
 3. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 4. जिजामाता पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 5. एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)- गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 6. जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शक) – रु. १०,०००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-२०१८ मध्ये जाहीर

 • गेल्या ३ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
 • २०१४-१५ ते २०१६-१७ या ३ वर्षातील ७७६ पैकी १९५ पुरस्काराची घोषणा या ठिकाणी करण्यात आली.
 • या क्रीडा पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा खेळाडू, संघटक, कार्यकर्ते पुरस्कार, साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार आदींचा समावेश आहे.
 • यामध्ये अाैरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.

जीवनगाैरवचे मानकरी

 1. रमेश तावडे (अॅथलेटिक्स,२०१४-१५)
 2. डाॅ. अरुण दातार (मल्लखांब, २०१५-१६)
 3. बिभीषण पाटील (शरीरसाैष्ठव, २०१६-१७)
error: