मराठी :: Current Affairs

शब्दसिद्धी

                                                      सिद्ध शब्द आणि साधित शब्द

शब्दसिद्धी

सिद्ध शब्द-

मूळ धातू किंवा मूळ शब्द शब्द म्हणजे सिद्ध शब्द होय. जा, ये, बोल, बस, पी, कर यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात, त्यांना सिद्ध शब्द म्हणतात.

 • तत्सम शब्द-

संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे शब्दाच्या रूपांत काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत, त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. तत्सम म्हणजे त्याच्यासारखे. उदा.

पुष्प, सत्कार, प्रीति, उत्सव, भीति, वृक्ष, कन्या, पिता, पुञ, गुरू, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, अग्नि, नदी, कमल, करण, पर्ण, यद्यपि, भगवान, परंतु, अरण्य, हस्त, मस्तक इ.

 • तद्भव शब्द-

संस्कृत भाषेतील शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल झालेला असतो. असे मूळ रूपात बदल होऊन आलेले शब्द म्हणजेच तद्भव शब्द होय. उदा.

कान- कर्ण, कोवळा- कोमल, चाक- चक्र, पाय-पद, दुध-दुग्ध, आग-अग्नि, काम-कर्म, पान-पर्ण, आेठ-आेष्ठ इ.

 • देशी शब्द-

मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की जे तत्सम, तद्भव किंवा परभाषीय नाहीत. ते महाराष्ट्रातील पुर्वी राहणाऱ्या लोकांचे बोलीभाषेतील शब्द असावेत. अशा शब्दांना देशी किंवा देशज शब्द म्हणतात. उदा.

झाडाच्या डहाळीवर राघू आणि लुगडं नेसलेली चिमणी झोपलेली असताना एक खुळा बोका, रेडा आणि घोडा आले. त्यांनी दगडधोंडे मारायला सुरूवात केली. ते त्यांच्या डोक्याला ,डोळ्याला, पोटाला, पाठीला, कमरेला आणि गुडघ्याला लागले. त्यांच्या हाडांचा खुळखुळा झाला. ते ऐकून वांग्यातल्या ढेकणाने बाजरीचे पीठ मुस्काटाला लावले.

 • अरबी शब्द-

उस्ताद उर्फ बिस्मील्ला खान शानदार जमातीचा शाहीर होता. पण नंतर पैजा लावून त्याच्यात फाजील फलाना हैवानी कैफ आला. तो पै पै ला मोताद झाला. त्याला अद्दल घडली. त्याने खजील होऊन साहेबांकडे नक्कल अर्ज केला की, माझ्या बक्कल खर्चासाठी आणि हाशीलसाठी काही मजबूत इनाम मंजूर केल्याचा जाहीरनामा काढा. मला मुलामा दिलेली कनातही देण्याचा हुकूम काढावा. मी जामीनावर जाहीर करतो की, यापुढे मौज न करता मेहनतीने कलम चालवीन आणि शहरावर अलंगनौबत नजर ठेवीन.

 • फारसी शब्द-

एक गरीब अवलीया साधू गुजराण करण्यासाठी हंगामी रियाज करून शहनाई वाजवायचा. तो अचानक पेशवा बनला. मग तो अस्सल शौकिन बनून दरबारात मैफिली अगर जलसा भरवू लागला. त्याची तनखा आणि खुमारी वाढली. तो अव्वल जरतारी फारशी पोषाख, शाईची दौत, निशान आणि अत्तर वापरू लागला. तावदानी मेण्यात बसू लागला. शेलका खुराक, खाना खाऊ लागला. त्यामुळे त्याची रग आणि वजन वाढले. त्याचे फडणवीस आणि सुमारे हजारो सौदागर त्याची खाविंद म्हणून सरबराई आणि खुशामत करू लागले. त्यांना तो अबकारी हप्ता म्हणून दर महिन्याला सरकारी दप्तरांतून मोहरांचा लाखोटा देऊ लागला. या हकीकतीचा खलिता गुन्हेगारांना आणि कामगारांना समजल्यावर ते खफा होऊन त्यांनी सगळीकडे दंगाधोफा सुरू केला. सर्व चीजवस्तू, किताब आणि सामान एवढी कुमक त्यांनी लुटली. त्यांच्यात कारभारावरून खडाजंगी सुरू झाली. त्यामुळे दस्तुरखुद्द साधूला जाब देऊन जेलमध्ये जावे लागले. त्याला चाबकाने मारण्यात आले. त्याची जहागीरी आणि अब्रूही गेली. हे ऐकून सर्वजण लेझीम खेळू लागले.

 • कानडी शब्द-

आण्णा कांबळे हा ताई आणि आक्का बरोबर तूप, भाकरी, आमसूल, उडदाचे पापड आणि कोशिंबीर गडंगनेर म्हणून खात होता. त्यांना त्यांच्याकडेच गाजर आणि पडवळ विळीने, खलबत्त्याने की अडकित्त्याने कापायचे हे समजेना. तेवढ्यात चिंधीचे मुंडासे बांधलेला शिंपी बांबूची परडी आणि हंडा घेऊन आला आणि म्हणाला, तू बांगड्या भर… तुझी मुरकुंडी वळवीन…. तुझ्या खोलीची किल्ली माझ्या चिरगुटाच्या पिशवीत आहे.

 • पोर्तुगीज शब्द-

एक पगारी आणि जुगारी खमीस घातलेला पोर्तुगीज पाद्री नाताळाच्या वेळी कोबी, पायरी, हापूस, पपई, अननस, फणस, काजू, बटाटे, पाव, बिस्किट, पेरूचे आचार व तंबाखू घेऊन तुरूंगात गेला. तेथून पैशांच्या तिजोरीच्या आणि अलमारीच्या चाव्या, काडतूसांचे घेमेले, बिजागीरीचा बंब, पिंप, इस्ञी, बादली, साबण, साबुदाणा, परात, मेज, टिकाव व रोटी या वस्तूंचा लिलाव करून कसलाही पुरावा न ठेवता व्हरांड्यात पलटणसह पिस्तूल दाखवून पसार झाला. त्यामुळे फित लावलेल्या व टोपी घातलेल्या पोलिसांच्या शिरपेचाला फालतू बूच बसले. त्यासाठी कर्नल मेस्ञी हा लवाद नेमला.

 • गुजराती शब्द-

हरताळात इजा झाल्याने नानावटी हा गुजराती शेटजी त्यांच्या दादरच्या हवेलीत पथारीवर मावा व ढोकळा खात रिकामटेकडा बसला असताना घी चा डबा आणि मथळ्याचे चोपडे घेऊन सारोळ्याचा दलाल आला. शेटजी त्यांना म्हणाला, आमच्या वतीने मी तुमची भलामण करतो की, जेमतेम चरख्यावर तरी खादीचे सदरे बनवा आणि डांगराची लागवड करा. मग आपण दूधपाक खाऊन गरबा खेळू.

 • तामिळ शब्द-

मलय पर्वतावर मांजरापाटी कपडे घालून डेंगूळ आलेले चिल्लेपिल्ले खेळत होते. काय खेळत होते तर…. आरिंग मिरिंग…लवंगा तिरिंग…आपडी थापडी गुळाची पापडी…अटक मटक चवळी चटक…आणि ऐलमा पैलमा खेळल्यावर मठ्ठा प्यायले.

 • तेलुगु शब्द-

बंडी घातलेला तांडेल अनारसे तूप खाऊन विटी दांडू खेळत असताना येळकोट येळकोट आेरडल्याने गदारोळ झाला. तेवढ्यात एक तेलुगु आळूमाळु टाळा लावलेल्या डबीत लेंडी घेऊन निघाला असताना किडूक मिडूकांनी त्यांना वेढा घातला. तेंव्हा तो आेरडला, तुला बुरगुंडा होईल.

साधित शब्द

सिद्ध शब्दांपासून जे शब्द बनतात त्यांना साधित शब्द म्हणतात.

उपसर्गघटित आणि प्रत्ययघटित शब्द-

 • उपसर्गघटित शब्द

मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात. या अक्षारांना उपसर्ग असे म्हणतात. ही अक्षरे अव्ययरूप असतात व ती केंव्हा केव्हा मूळ धातूचा अर्थ फिरवतात. उदा.

हार या धातूचा मूळ अर्थ हरण करणे किंवा नेणे असा आहे. पण मागे उपसर्ग लावल्यामुळे त्याच्या मूळ अर्थात होणारा बदल पुढीलप्रमाणे-

आ+हार= आहार

वि+हार=विहार

सं+हार=संहार

प्र+हार=प्रहार

परि+हार=परिहार

अप+हार=अपहार

उप+हार=उपहार

उपसर्ग हे स्वतंञपणे येत नाहीत. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात, त्यांना उपसर्गघटित शब्द असे म्हणतात.

मराठीतील उपसर्गांचे प्रकार-

१. संस्कृत उपसर्ग

अति- अतिश, अत्यंत, अतिक्रमण, अतिरेक, अतिप्रसंग

अधि- अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अधिकरण, अद्ययन, अधिदैवत

अनु- अनुक्रम, अनुकरण, अनुवाद, अनुभव, अनुस्वार, अनुमती

अप- अपशब्द, अपमान, अपशकुन, अपराध, अपयश, अपकार

अभि- अभिनय, अभिरूची, अभिनंदन, अभ्यास, अभिद्य, अभिमुख

अव- अवकृपा, अवतरण, अवनत, अवमान, अवगुण

आ- आमरण, आक्रोश, आजन्म, आक्रमण

उत्- उत्तीर्ण, उद्योग, उत्प्रेक्षा, उत्कर्ष, उत्तम, उन्नती, उत्पत्ती

उप- उपाध्यक्ष, उपपद, उपवास, उपकार, उपनेञ

दुस्- दुर्गुण, दुर्जन, दुर्लभ,दुष्कृत्य

निर, नि-निरंतर, निर्धन, निरोगी, निकामी, निर्गत, निर्लज्ज

परा- पराकाष्ठा, पराजय, पराभव, पराक्रम

परि- परिणाम, परिपाठ, परिवार, परिपाक, परिपूर्ण, परिश्रम

प्र- प्रत्येक, प्रवाह, पगति, प्रतिदिन, प्रबल,प्रतिध्वनी, प्रतिकूल

वि- विसंगति, विशेष, विज्ञान, विख्यात, विधवा, विपत्ती

सम्- संयोग, संतोष, संकल्प, संगीत, संस्कृत, संस्कार, संगम

सु- सुकर, सुग्रास, सुगंध, सुभाषित, सुशिक्षित, सुगम

 

२. मराठी उपसर्ग

अ-अन् – अबोल, अजाण, अनोळखी, अडाणी

आड- आडवाट, आडवळण, आडनाव, आडकाठी

अद- अदकोस, अदपाव, अदशेर

अव- अवघड, अवजड, अवलक्षण, अवदसा, अवखळ, अवकळा

नि- निलाजरा, निकामी, निनावी, निकोप

पड- पडसाद, पडताळा, पडजीभ, पडछाया

फट- फटकळ, फटफजिती

भर- भरदिवसा, भरधाव, भरचौकात, भरजरी

 

३.फारसी व अरबी उपसर्ग

ऐन- ऐनदौलत, ऐनहंगाम, ऐनखर्च

कम- कमजोर, कमकुवत, कमनशीब

गैर- गैरसमज, गैरसावध, गैरसोय, गैरहजर, गैरशिस्त, गैरहिशोबी

दर- दरमहा, दरमजल, दरसाल, दररोज

ना- नापसंत, नाउमेद, नालायक, नाराज

बद- बदलौकिक, बदनाम, बदसूर, बदफैल

बिन- बिनतक्रार, बिनचूक, बिनधोक

बे- बेअब्रू, बेकायदा, बेदम, बेडर, बेईमान

सर- सरचिटणीस, सरकार, सरहद्द, सरदार

हर- हररोज, हरगडी, हरसाल

 

 • प्रत्ययघटित शब्द

शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.

प्रत्यय दोन प्रकारचे असतात.

१. कृत् किंवा धातूसाधित- धातूंना जोडले जातात ते कृत् प्रत्यय. कृत् प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात, त्यांना कृदन्त असे म्हणतात.

२. तद्धित किंवा नामसाधित- नामे, सर्वनामे, विशेषण किंवा अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना तद्धिते असे म्हणतात.

                                                     धातूसाधिते किंवा कृदन्ते

१. संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातूसाधिते (कृदन्ते)

अ- चोर, देव, सर्प, माभ, भाव

अक- तारक, मारक, रक्षक, लेखक, पाचक

अन- वदन, वंदन, नयन, पालन, चरण

अना- कल्पना, प्रार्थना, वेदना, तुलना

अनीय- रमणीय, श्रवणीय, वदनीय, पूजनीय

आ- कथा, इच्छा, चिंता

इ-ई – हरी, त्यागी, भाषी

इक- पथिक, रसिक

त- हत, भूत, रत, कृत, मृत

तृ(ता)- श्रोता, दाता, ञाता, भर्ता

तव्य- श्रोतव्य, कर्तव्य, गन्तव्य

ति- युक्ति, नीति, शक्ती, स्तुति, कृती

य- त्याज्य, पेय, देय, भोग्य, कार्य

 

२. मराठी प्रत्यय व त्यापसून बनलेली धातूसाधिते

अ- कर, लूट, डर, खोट, तूट, फूट

आ- ठेवा, ठेचा, वेढा, आेढा, झगडा

आई- घडाई, शिलाई, चढाई, खोदाई

आऊ- लढाऊ, शिकाऊ, जळाऊ, टाकाऊ

आरी- रंगारी, पुजारी, पिंजारी

आळू- विसराळू, लाजाळू, झोपाळू

ई- मोडी, कढी, बुडी, कढी

ईक- पडीक, सडीक, पढीक

ईत- चकचकीत, लखलखीत

ईव- कोरीव, पाळीव, जाणीव, घोटीव, रेखीव

ऊ- झाडू, लागू, चालू

ऊन- देऊन, बसून, रडून, ऊडून, करून

खोर- चिडखोर, भांडखोेर, दिवाळखोर

णावळ- खाणावळ, लिहिणावळ, धुणावळ, दळणावळ

प- कांडप, वाढप, दडप

पी- कांडपी, वाढपी, दडपी

णारा- ऐकणारा, लिहिणारा, सांगणारा, बोलणारा

लाजरा, कापरा, दुखरा, हसरा, नाचरा

                                                  शब्दसाधिते किंवा तद्धिते

धातूंखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात, त्यांना शब्दसाधिते किंवा तद्धिते असे म्हणतात.

 

१. संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले तद्धित शब्द

अ- राघव, पांडव, यादव, भार्गव

इक- मानसिक, धार्मिक, कायिक, मासिक, वाचिक

इत- मूर्छित, आनंदित, दुःखित

ईन- नवीन, कुलीन, शालीन

कीय- राजकीय, परकीय, स्वकीय

त्व- जडत्व, गुरूत्व, विद्वत्व, मूर्खत्व, महत्व

मान- श्रीमान, बुद्धीमान

 

२. मराठी प्रत्यय लागून तयार झालेली शब्दसाधिते

अ- भरडा, गारठा, आेढा, ठेवा, ठेचा, वेडा

आई- विटाई, खोदाई, लढाई, दांडगाई, दिरंगाई, कुचराई

ई- लाकडी, पितळी, बोली, मापी

कर- खेळकर, खोडकर, प्रभाकर, सुखकर

करी- वारकरी, भाडेकरी, शेतकरी, पहारेकरी

कट- मळकट, मातकट, पोरकट, तेलकट

की- पाटीलकी, उनाडकी, शेतकी, माणुसकी

खोर- चिडखोर, भांडखोर, चहाडखोर

वाईक- आस्थेवाईक, नातेवाईक

सर- वेडसर, गोडसर, आेलसर, काळसर

 

३. फारसी प्रत्यय लागून तयार झालेली धातूसाधिते

गर, गार- जादूगर, सौदागर, गुन्हेगार

वान- बागवान

ई- नेकी, हमाली, मजुरी, खुशी

स्तान- तुर्कस्तान, अरबस्तान, कबरस्तान

गिरी- मुलुखगिरी, गुलामगिरी,

दार- पोतदार, दुकानदार, फौजदार

दाणी- अत्तरदाणी, पिकदाणी, मच्छरदाणी

बाज- नखरेबाज, दारूबाज, दगलबाज

बंद- हत्यारबंद, चिरेबंद, नालबंद

खाना- तोफखाना, दवाखाना, कारखाना

नवीस- फडणवीस, चिटणवीस

नीस- फडणीस, चिटणीस

आबाद- हैदराबाद, आैरंगाबाद

नामा- करारनामा, पंचनामा, जाहीरनामा, हुकुमनामा

 

अभ्यस्त शब्द

अनेक शब्दांमध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुर्नरावृत्ती झालेली असते. अशा प्रकारे अक्षराचे किंवा शब्दाचे अभ्यस्त (द्वित्व) होऊन तयार झालेल्या शब्दाला अभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा.

दगडबिगड, हळूहळू, घरघर

अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार पडतात.

१) पूर्णाभ्यस्त शब्द-

एक संपूर्ण शब्द जेंव्हा दोनदा येऊन एक जोडशब्द बनतो त्या जोडशब्दाला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा.

कोणीकोणी, मागोमाग, लाललाल, हालहाल, तुकडेतुकडे, एकएक, पुढेपुढे, हायहाय, मधूनमधून, जे जे, वा वा, घरघर, इ.

२) अंशाभ्यस्त शब्द-

कधी कधी एक शब्द पुन्हा तसाच न येता त्यातील एखादे अक्षर बदलून एकापाठोपाठ दोनदा येऊन जोडशब्द बनतो, अशा जोडशब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदा.

गोडधोड, किडूकमिडूक, शैजारीपाजारी, दगडबिगड, झाडबिड, घरबिर, उरलासुरला, बारीकसारीक, उद्याबिद्या, इ.

काही वेळी पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरूक्ती होते. उदा.

अक्कलहुशारी, जुलुमजबरदस्ती, अंमलबजावणी, साजशृंगार, बाडबिस्तारा, डावपेच, कागदपञ, दंगामस्ती, थट्टामस्करी, मानमरातब, रीतरिवाज, धनदौलत, इ.

३) अनुकरणवाचक शब्द-

काही शब्दांमध्ये एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनरुक्ती असते. अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. उदा.

लुटूलुटू, चुटचुट, गडगड, कडकडाट, वटवट, तुरूतुरू, गुटगुटीत, खदखदून, किरकीर, इ.

 

 

वाक्यांचे प्रकार व वाक्य संकलन

वाक्यांचे अर्थावरून प्रकार

 1. विधानार्थी- ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, ते विधानार्थी वाक्य. उदा. माझे बाबा आज गावी गेले.
 2. प्रश्नार्थी- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, ते प्रश्नार्थी वाक्य. उदा. तू कोल्हापूरहून केंव्हा येणार आहेस?
 3. उद्गारार्थी- ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, ते उद्गारार्थी वाक्य. उदा. अबब ! केवढा मोठा साप !
 4. होकारार्थी (करणरूपी)- वाक्यातील विधाने होकारार्थी असल्यास. उदा. राम अभ्यास करतो.
 5. नकारार्थी ( अकरणरूपी)- वाक्यातील विधाने नकारार्थी असल्यास. उदा. सीता मुळीच अभ्यास करत नाही.

वाक्यांचे क्रियापदाच्या रूपावरून प्रकार-

 1. स्वार्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदा. मीरा नाचत असते.
 2. आज्ञार्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशिर्वाद, प्रार्थना, विनंती, किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदा. परमेश्वरा, त्याचे भले कर.
 3. विध्यर्थी- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. उदा. मुलांनी आई-वडिलांची व गुरूजनांची सेवा करावी.

वाक्यांचे वाक्यातील विधानांनुसार प्रकार-

 1. केवलवाक्य- वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्या वाक्याला शुद्ध वाक्य किंवा केवलवाक्य असे म्हणतात. उदा. राम कविता वाचतो. केवलवाक्य हे साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल.
 2. संयुक्त वाक्य- दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.उदा. त्याला निमंञण दिले; परंतु तो आला नाही.उद्या सुट्टी मिळेल आणि मी गावाला जाईन.संयुक्त वाक्याचे तीन प्रकार आहेत.
  1. केवलसंयुक्त (केवल आणि केवल)
  2. मिश्रसंयुक्त (मिश्र आणि मिश्र)
  3. केवलमिश्रसंयुक्त (केवल आणि मिश्र)मिश्रवाक्य आणि संयुक्त वाक्य यांत फरक असा की,मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते. बाकीची सर्व गौण असतात. व ती गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्य असतात व ती प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

 3.  मिश्रवाक्य- एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्रवाक्य असे म्हणतात.

प्रधानवाक्य- अर्थाच्या दृष्टीने स्वतंञ असते, त्यास मुख्य किंवा प्रधानवाक्य म्हणतात.

गौणवाक्य- अर्थाच्या दृष्टीने प्रधानवाक्यावर अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य किंवा पोटवाक्य असे म्हणतात. उदा.

जे चकाकतेते सोने नसते. या वाक्यात जे चकाकते हे एक केवलवाक्य आहे व ते सोने नसते ते दुसरे केवलवाक्य आहे. त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंञ वाक्य नाही, ते दुसर्या केवल वाक्यावर म्हणजे ते सोने नसते यावर अवलंबून आहे.

 

वाक्यसंश्लेषण किंवा वाक्यसंकलन

सकाळी आठ वाजण्याचा सुमार असावा. मी बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. इतक्यात मला तार मिळाली. तारेत लिहिले होते. मुंबईस ताबडतोब निघून या.

वरिल ५ वाक्याचे एकञितपणे वाक्य असे तयार होईल की,

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना मला ताबडतोब मुंबईस निघून येण्याबद्दल एक तार आली.

 • दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक केवलवाक्य बनवणे.
 • केवलवाक्यात एकच मुख्य क्रियापद असवे लागते. म्हणजे दिलेल्या वाक्यापैकी एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठरवून वाक्यातील क्रियापदांची धातूसाधिते, नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे आपणास बनवावी लागतात. उदा.
 1. मी सिनेमा बघतो. माझे वडील माझ्यावर चिडतात. – माझ्या सिनेमा बघण्यावर माझे वडील चिडतात.
 2. विंदा. करंदीकर हे कवी आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिलाला. – कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरसकार मिळाला.
 3. माझ्या आजीने मला एक डबा पाठविला. त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते. – माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठविला.
 4. मी चहा पितो. माझ्या वडिलांना ते आवडत नाही. – माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
 5. रविंद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रविन्द्रनाथांनी गीतांजली हे काव्य लिहिले. – गीतांजलीचे लेखक रविंद्रनाथ हे थोर कवी होते.
 6. पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोपर्यात ते लावले. याची मला मोठी आवड आहे. – पुष्कळ वर्षापूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोपर्यात लावले.
 7. मी नोकरीतून निवृत्त झालो. मला थोडी फुरसत मिळाली. सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवून घेतला. त्याची बागेत स्थापना केली. – नोकरीतून निवृत्त झाल्यावर फुरसत मिळताच सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवून घेवून त्याची मी बागेत स्थापना केली.
 8. बाबांनी मला तेथल्या एका माणसाची आेळख करून दिली. त्याने हे कोहळे पिकवले. एकेक कोहळा किती किलोचा म्हणता ? चाळीस. – चाळीस किलोचा एकेक कोहळा पिकवणाऱ्या तेथल्या एका माणसाची बाबांनी मला आेळख करून दिली.
 • दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनवणे.
 • दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविताना त्यांना जोडणारी योग्य अशीच उभयान्वयी अव्यये वापरायला हवीत. प्रधानत्वबोधक किंवा गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. केवळ प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय वापरले तर बनणारे वाक्य केवळ-संयुक्त होते. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशा दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरल्यास ते मिश्र संयुक्त वाक्य होते. दोन्ही प्रकारच्या वाक्यांना संयुक्त वाक्यच म्हणतात.
 1. समुच्चयबोधक- विजा चमकू लागल्या. पावसाला सुरूवात झाली. – विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली.
 2. विकल्पबोधक- लोक आपली स्तुती करोत. लोक आपली निंदा करोत. – लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.
 3. न्यूनत्वबोधक- आपण मरावयास हरकत नाही. आपण किर्तीरूपाने उरावे. – मरावे परी किर्तीरूपी उरावे.
 4. परिणामबोधक- वाटेत मोटार नादुरुस्त झाली. मला यावयास उशीर झाला. – वाटेत मोटार नादुरूस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.
 • मिश्र वाक्य बनवणे
 1. स्वरूपबोधक- गुरूजी म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. – गुरूजी म्हणाले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
 2. कारणबोधक- मला बरे नाही. मी नोकरीला जाणार नाही. – मी नोकरीला जाणार नाही कारण मला बरे नाही.
 3. उद्देशबोधक- आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो. – आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.
 4. संकेतबोधक- उद्या सुट्टी मिळेल. मी तुझ्या घरी येईन. – उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन.

केवळ मिश्रवाक्य बनवायचे असल्यास उपयोजिले जाणारे उभयान्वयी अव्यय हे गौणत्वबोधकच असायला हवे. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशा दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरून बनविलेल्या वाक्यास मिश्र संयुक्त वाक्य असे म्हणतात.

काळ

वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, याचा बोध जो होतो, त्याला काळ असे म्हणतात.

मुख्य काळ तीन आहेत.

 1. वर्तमानकाळ- अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)साधा  ड) रीति
 2. भूतकाळ      – अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)रीति  ड) रीति
 3. भविष्यकाळ – अ) अपूर्ण  ब) पूर्ण  क)रीति  ड) रीति

अपूर्ण काळ-

वाक्यातील क्रियेची अपूर्णता दाखविण्यासाठी अपूर्ण काळ वापरतात. अपूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रिया अपुरी दर्शविणारे धातूसाधित व त्यापुढे अस या सहाय्याक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. उदा.

ती मुलगी नाच.

या शब्दांपासून अपूर्ण काळातील वाक्ये पुढीलप्रमाणे-

ती मुलगी नाचत आहे. (अपूर्ण वर्तमानकाळ)

ती मुलगी नाचत होता. (अपूर्ण भुतकाळ)

ती मुलगी नाचत असेल. ( अपूर्ण भविष्यकाळ)

पूर्ण काळ-

वाक्यातील क्रियेचे पूर्णत्व दर्शविण्यासाठी पूर्ण काळ वापरतात. पूर्ण काळात क्रियापदाची रूपे बनवताना क्रियेचे पूर्णत्व दर्शविणारे धातूसाधित व त्यापुढे अस या सहाय्यक क्रियापदाची त्या त्या काळातील रूपे येतात. उदा.

मधू लाडू खा.

या शब्दांपासून पूर्ण काळातील वाक्ये पुढिलप्रमाणे-

बाळ्याने पेरू खाल्ला आहे. (पूर्ण वर्तमानकाळ)

बाळ्याने पेरू खाल्ला होता. (पूर्ण भूतकाळ)

बाळ्याने पेरू खाल्ला असेल. (पूर्ण भविष्यकाळ)

साधा काळ आणि रीति काळ-

एखादी क्रिया सतत घडत असल्याचे दर्शविण्यासाठी तिन्ही काळात ती क्रिया सतत घडत असल्याचे दर्शविणारे क्रियापद वापरले तर साधा काळ होतो आणि तिच क्रिया दर्शविण्यासठी संयुक्त क्रियापद वापरल्यास रीति काळ होतो. उदा.

राणी टेनिस खेळते. ( साधा वर्तमानकाळ)

राणी टेनिस खेळत असते. ( रीति वर्तमानकाळ)

राणी टेनिस खेळायची. (साधा भूतकाळ)

राणी टेनिस खेळत असे. (रीति भूतकाळ)

राणी टेनिस खेळेल. (साधा भविष्यकाळ)

राणी टेनिस खेळत जाईल. (रीति भविष्यकाळ)

                                             काळांचे विशेष उपयोग

भाषेचा व्यवहार करताना काळाचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुसऱ्याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळुन येतो. शिवाय त्यातही विविध सुक्ष्म छटा आढळतात. भाषेचा अभ्यास करताना काळाचे विशेष उपयोग पुढीलप्रमाणे-

 • वर्तमानकाळ- सर्वञ सत्य असलेले विधान करताना, ञिकालबाधित सत्य सांगताना, शास्ञीय नियम, नित्य घटना, सुविचार, म्हणी सांगताना साधा वर्तमानकाळ वापरतात. उदा.
 1. सूर्य पूर्वेस उगवतो.
 2. सोमवारनंतर मंगळवार येतो.
 3. पाण्याचा उत्कलनांक १०० अंश सेल्सियस आहे.
 4. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
 5. सुंदर अक्षर हा विद्यार्थ्याचा सर्वात मौल्यवान दागिना आहे.

भूतकाळातील घटना सांगताना काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात. अशा काळाला ऐतिहासिक वर्तमानकाळ म्हणतात. उदा.

 1. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. (म्हणजेच म्हणाला होता.)
 2. महाराज तलवार उपसतात व शञूवर हल्ला करतात.

लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना काही वेळा वर्तमानकालीन क्रियापदे वापरतात. यामध्ये संनिहित भविष्यकाळ असतो. अशी वाक्ये शक्यतो आज्ञा किंवा कृती या प्रकाराची असतात. उदा.  तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. (म्हणजेच मी येईन.)

भूतकाळात काढलेले उद्गार दर्शवताना ती वर्तमानकाळात अवतरणचिन्हे वापरून लिहिण्याची पद्धत आहे. उदा. समर्थ रामदास म्हणतात, “जगी सर्व सुखी असा कोण आहे. ”

लगतचा भूतकाळ सांगताना काही वेळा वर्तमानकाळ वापरला जातो. उदा. मी बसतो (बसलो होतो) तोच तुम्ही हजर.

 • भूतकाळ-ताबडतोब घडणार असलेली क्रिया दर्शवण्यासाठी काही वेळा क्रियापदाचे भूतकालीन रूप वापरतात. यामध्ये संनिहित भविष्यकाळ असतो. उदा. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच (येईन)

एखादी क्रिया भविष्यकाळात खाञीने होणार, या अर्थी कधी कधी भूतकाळी रूपे वापरतात. अशा वाक्याला निःसंशय भविष्यकाळ म्हणतात. उदा. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज.(खाञी)

संकेत व्यक्त करायचा असल्यास. उदा. पाऊस आला (येईल) तर ठीक.

वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहेत अशा अर्थी. उदा. तो बघ, तुझा मिञ आला.

 • भविष्यकाळ- काही वेळा संकेत व्यक्त करायचा असल्यास. उदा. तू मदत देशील तर मी आभारी होईन.

काही वेळा अशक्यता दर्शवताना. उदा. सगळेच मूर्ख कसे असतील? (अशक्यता)

काही वेळा संभावना व्यक्त करताना. उदा. गुरूजी आत शाळेत असतील. (असण्याचा संभव)

काही वेळा इच्छा व्यक्त करताना. उदा. मला दोन रूपये हवे होते. (आहेत)

 

अलंकार

दागिणे किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सोंदर्यात भर पडते. त्याप्रमाणे भाषेतही अलंकार असतात व त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या साैंदर्यातही भर पडते. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते अशा शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात. भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार होतात.

 1. शब्दालंकार
 2. अर्थालंकार

शब्दालंकार-

जेंव्हा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात साैंदर्य निर्माण होते, अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात. शब्दालंकाराच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनुप्रास

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरार्वृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला साैंदर्य प्राप्त होते, तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.  उदा.

१. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

या वाक्यात प, ह, ळ ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा आली आहे.

२. आज गोकुळात रंग खेळतो हरी । राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी ।

या वाक्यात र आणि ज ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या वाक्यपंक्तीला शोभा आली आहे.

 

२) यमक अलंकार

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदा.

१. जाणावा तो ज्ञानी

पूर्ण समाधानी

निःसंदेह मनी

सर्वकाळ

अनुप्रासात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते तशी यमकातही असते. माञ अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कोठेही असू शकते, पण यमकातही ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते. चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी.

 • पुष्ययमक-

सुसंगति सदा घडो

सुजन वाक्य कानी पडो

कलंक मतीचा झडो

विषय सर्वथा नावडो

 • दामयमक-

आला वसंत कविकोकिल हाही आला

आलापितो सुचवितो अरूणोदयाला

 

३) श्लेष अलंकार

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो. उदा

सुनिल ः काय करतोस

अनिल ः काही नाही. पडलोय

सुनिल ः पडलास ? लागल का मग ?

या संवादात पडला या शब्दाचे दोन अर्थ होतात. निवांत पहुडलेले (निजलेले) असणे. आणि दुसरा म्हणजे कुठुन तरी पडणे.

श्लेष म्हणजे आलिंगण किंवा मिठी. एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात. त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.  उदा.

सूर्य उगवला झाडीत…

झाडूवाली आली रस्ता झाडीत…

शिपाई आले गोळ्या झाडीत..

अन् वाघही आला तंगड्या झाडीत…

उपरोक्त वाक्यामध्ये झाडीत या शब्दावर श्लेष करण्यात आला आहे. श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकार देखील आहे.

 • शब्दश्लेष- वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष नाहीसा झाला तर तो हा शब्दश्लेष होय. उदा.

मिञाच्या उदयाने सर्वांनाच आनंद होतो

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.

या वाक्यामध्ये मिञ ऐवजी त्याच अर्थाचे दोस्त, सखा हे शब्द ठेवले, किंवा जीवन शब्दाऐवजी पाणी, जल हे शब्द ठेवले, तर त्यातील श्लेष नाहीसा होतो, म्हणून हा शब्दश्लेष होय.

 • अर्थश्लेष- वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिल्यास त्यास अर्थश्लेष म्हणतात. उदा.

तू मलिन, कुटिल, नीरस जड हि पुनर्भवपणेहि कच साच.

या आर्येतील मलिन, कुटिल, नीरस जड हे शब्द बदलून त्याच अर्थाने दुसरे शब्द वापरले तरी श्लिष्ट नाहीसा होत नाही.

 • सभंग श्लेष- शब्दाचे दोन अर्थ आहेत हे लक्षात येण्यासाठी त्या त्या शब्दाची विशिष्ट प्रकारे फोड करावी लागते, यास सभंग श्लेष असे म्हणतात. उदा.

१. श्रीकृष्ण नवरा मी नवरी…

शिशुपाल नवरा मी न-वरी

२.कुस्करू नका ही सुमने….

जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस आर्पिली ही सु-मने

 • अभंग श्लेष- शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेंव्हा दोन अर्थ संभवतात, त्यास अभंग श्लेष म्हणतात. उदा.

ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले,

आैषध नलगे मजला, परेसुनी माता बरे म्हणुनी डोले.

 

२. अर्थालंकार

अर्थालंकाराच्या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पना-

अ) उपमेय- ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक.

आ) उपमान- ज्याच्याशी तुलना करायची आहे, किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक.

क) साधारणधर्म- दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंमधील समान गुणधर्म.

ड) साम्यवाचक शब्द- वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

 

अर्थालंकाराचे प्रकार-

१. उपमा-

दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रितीने जेथे दाखविलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन असते. उदा.

 1. मुंबईची घरे माञ लहान….. कबुतराच्या खुराड्यासारखी.
 2. सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी
 3. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

सामान्यतः उपमा अलंकारात सारखा, जसा, जेवि, सम, सदृश्य, गत, परि, समान यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.

२. उत्प्रेक्षा-

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो, त्यांतील एक(उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू(उपमा) च आहे, अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. उदा.

 1. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
 2.  किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची किती बाकदार ।                                                                        शिरोभागी तांबडा तुरा हाले । जणू जास्वंदी फूल उमललेले ।।                                                                      अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार ।।
 • उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
 • उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.

३. रूपक-

उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते, तेथे रूपक हा अलंकार होतो.  उदा.

 1. बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी ।                                                                                                      अमृताची वृष्टी । मज होय ।।                                                                                                                  (स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहेत.)
 2. ऊठ पुरूषोत्तमा । वाट पाहे रमा ।                                                                                                             दावि मुखचंद्रमा । सकळिकांसि ।।                                                                                                            (येथे मुख व चंद्र ही एकरूप मानून मुखचंद्रमा असा शब्दप्रयोग केला आहे.)
 • उपमेत एक वस्तू दुसर्यासारखी आहे(सादृश्य) असे वर्णन असते.
 • उपमेच्या थोडे पुढे जाऊन उत्प्रेक्षेत त्या दोन वस्तू जवळजवळ सारख्या (एकत्व) केल्याची कल्पना कलेली असते.
 • रूपकात आणखी पुढे जाऊन त्या दोन वस्तू म्हणजे उपमेय व उपमान या एकरूप असल्याचे स्पष्टपणे सांगितलेले असते.

४. अनन्वय-

अनन्वय हे केंव्हा केंव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते.

उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नसेल, म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय म्हणजे तुलना. अनन्वय म्हणजे तुलना नसणे. ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, तो अनन्वय. उदा.

 1. झाले बहु….होतिल बहु….आहेतहि बहु…परि यासम हा….
 2. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरि
 3. कर्णासारखा दानशूर कर्णच…

५. अपन्हुती-

अपन्हुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे. उपमान हे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते, तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो. उदा.

 1. न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल ।                                                                                         न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ।।
 2. आेठ कशाचे….. देठचि फुलल्या पारिजातकाचे
 3. मानेला उचलितो, बाळ मानेला उचलितो ।                                                                                             नाही ग बाई, फणा काढूनि नाग हा डोलतो ।।

६. व्यतिरेक-

व्यतिरेक म्हणजे अधिक्य. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे वर्णन केलेले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो. उपमेयाचे उपमानावर अधिक्य. हे अधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येते.

अ) उपमेयाच्या उत्कर्षाने  व   आ) उपमानाच्या अपकर्षाने    उदा.

 1. त ू माउलीहून मयाळ । चंद्राहूनी शीतळ ।                                                                                                पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।
 2. सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।                                                                                                  त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी झोपतो ।
 3. कामधेनूच्या दूग्धाहूनिही आोज हिचे बलवान

७. भ्रांतिमान-

उपमानाच्या जागू उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तेथे भ्रांतिमान अलंकार असतो. कवी ज्याचे वर्णन करत आहे, त्या पाञाच्या मनात निर्माण झालेला भ्रम दाखविण्यासाठी भ्रांतिमान अलंकार वापरला जातो. उदा.

हंसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा ।

मानिला निटिलदेश तिचाच साचा ।

शंख-द्वयी धरुनि कुंकुम कीरवाणी ।

लावावया तिलक लांबविला स्वपाणि ।

 अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा, अशी समजूत करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळ राजाने आपला हात लांब केला.)

 1. भृंगे विराजित नवी अरविंदपञे ।                                                                                                             पाहूनि मानुनी तिचीच विशालपञे ।                                                                                                       घालीन अंजन अशा मतिनें तटाकी ।                                                                                                       कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।                                                                                                                    (भुग्यांनी सुशोभित झालेली कमलपञे हे दमयंतीचे नेञच आहेत, असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला व पाण्यामुळे भिजला.)

८. ससंदेह-

भ्रान्तिमान अलंकारात उपमान हे उपमेय आहे असा जो भ्रम होतो, तो निश्चित असतो पण उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते, त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. उदा.   चांदण्या राञी पत्नीच्या मुखाकडे पाहताना प्रियकराला वाटले ः

कोणता मानू चंद्रमा? भूवरीचा की नभीचा?

चंद्र कोणता? वदन कोणते?

शशांक-मुख की मुख शशांक ते?

निवडतील निवडो जाणते

मानी परि मन सुखद संभ्रमा-मानू चंद्रमा, कोणता?

९. अतिशयोक्ती-

कोणतीही कल्पना आहे त्याच्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार हा होतो. उदा.

दमडीच तेल आणलं… सासूबाईच न्हाणं झालं…

मामंजीची दाढी झाली…. भावोजींची शेंडी झाली…

उरल तेल झाकून ठेवलं…. लांडोरीचा पाय लागला…

वेशीपर्यंत आोघळ गेला… त्यात उंट पिहून गेला…

यात असंभ्यावतेची परिसीमा असते. असंभाव्यता किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते, तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो.

१०. दृष्टान्त-

एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्त अलंकार होतो. उदा.

लहानपण देगा देवा ।

मुंगी साखरेचा रवा ।

ऐरावत रत्न थोर ।

त्यासी अंकुशाचा मार ।

उपमेमध्ये सादृश्य दाखिवताना जसे, जेवी, सम, सारखा असे शब्द येतात. माञ दृष्टान्तात सादृश्य दाखविणारे साम्यवाचक शब्द नसतात. हा या दोन अलंकारातील फरक आहे.

न कळता पद अग्नि वरी पडे । न करि दाह असे ना कधी घडे ।

अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करितसे ।

११. अर्थान्तरन्यास-

एखादे सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला, तर अर्थान्तरन्यास हा अलंकार होतो. अर्थान्तर म्हणजे दुसरा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अशा प्रकारे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, असा या अलंकाराचा अर्थ आहे. उदा.

बोध खलास न रूचे अहिमुखी दुग्ध होय गरल ।

श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ

१२. स्वभावोक्ती-

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालींचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेंव्हा केलेले असते, तेंव्हा त्यास स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. उदा.

१. मातीत ते पसरले अतिरम्य पंख ।

केले वरी उदर पांडुर निष्कलंक ।।

चंचु तशीच उघडी पद लांबविले ।

निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ।।

२. गणपत वाणी विडी पिताना…. चावायचा नुसताच काडी…

म्हणायचा अन् मनाशीच की… या जागेवार बांधित माडी…

मिचकावुनी मग उजवा डोळा… आणि उडवुनि डावी भिवई…

भिरकावुनि ती तशीच द्यायचा… लकेर बेचव जैशी गवई…

१३. अन्योक्ती-

अन्योक्ती म्हणजे अन्य व्यक्तीला उद्देशून बोलणे. कित्येक वेळा एखाद्या व्यक्तीला स्पष्टपणे बोलता येत नाही. अशा वेळी ज्याबद्दल बोलायचे, त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोहत व्यक्त करण्याची जी पद्धत असते, तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. अर्थात, लेकी बोले सुने लागे अशा प्रकारची पद्धत असते. उदा.

येथे समस्त बहिरे लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक ।।

हे मूर्ख यांस किमपीही नसे विवेक । रंगावरून तुजला गणतिल काक ।।

१४. पर्यायोक्त-

एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता अप्रत्यक्ष रितीने किंवा आडवळणाने सांगणे, यांस पर्यायोक्त असे म्हणतात. उदा.

१. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.

२. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.

३. माझ्या उत्तरपञिकेवर खूश होऊन परिक्षकांनी मला वन्स मोअर दिला आहे.

१५. विरोधाभास-

एखाद्या विधानावर वर वर दिसायला विरोध आहे, असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो, अशआ ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. उदा.

 1. वियोगार्थ मीलन हाते नेम हा जगाचा ।
 2. जरी आंधळी मी तुला पाहते .
 3. स्वतासाठी जगलास तर मेलास… दुसर्यासाठी जगलास तरच जगलास
 4. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही.

१६. सार-

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो, तेंव्हा सार हा अलंकार असतो. उदा.

आधीच मरकट तशातही मद्य प्याला… झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला…

झाली तयास तदनंतर भूतबाधा… चेष्टावधू मग किती कपिच्या अगाधा…

१७. चेतनगुणोक्ती-

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत, अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, असे जेथे वर्णन असते, तेथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो. उदा.

कुटुंबवत्सल्य इथे फणस हा । कटिखांद्यावर घेवूनि बाळे ।

कथिते त्याला कुशल मुलांचे । गंगाजळीचे बेत आगळे ।

१८. व्याजस्तुती-

बाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जेथे वर्णन असते, तेथे व्याजस्तुती हा अलंकार होतो. उदा.

काय विद्वान आहेस रे तू !

केवढा उदार रे तू !

१९. व्याजोक्ती-

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न केला जातो, तेथे व्याजोक्ती हा अलंकार होतो. उदा.

१.  येता क्षण वियोगाचा पाणी नेञांमध्ये दिसे ।

डोळ्यांत काय गेले हे ? म्हणूनी नयना पुसे ।।

२. काय गे बघशी मागे वळूनी अशी ?

विचारिता म्हणे, माझी राहिली पिशवी कशी ?

संधी

संधी: अर्थ

संधी म्हणजे सांधणे, जोडणे. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण निर्माण होतो. वर्णांच्या अशा एकञ येण्याला संधी असे म्हणतात.

संधीचे प्रकार

 1. स्वर संधी
 2. व्यंजन संधी
 3. विसर्ग संधी

स्वर संधी

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे स्वरांनी जोडले असतील तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. स्वर+स्वर अशी त्यांची रचना असते. उदा.

सूर्य+अस्त= (अ+अ)= सूर्यास्त

स्वर संधीचे प्रकार

सजातीय स्वर संधी

-हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर  -हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. याला सजातीय स्वर संधी असे म्हणतात. उदा.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+अ=आ सूर्य+अस्त  सूर्यास्त
अ+आ=आ देव+आलय देवालय
आ+अ=आ विद्या+अर्थी विद्यार्थी
 आ+आ=आ महिला+आश्रम महिलाश्रम
 इ+इ=ई मुनि+इच्छा मुनीच्छा
इ+ई=ई गिरि+ईश गिरीश
 ई+ई=ई मही+ईश महीश
उ+उ=ऊ गुरु+उपदेश गुरूपदेश
ऊ+उ=ऊ भू+उद्धार भूद्धार

गुणादेश स्वर संधी

 1. अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोऐवजी ए येतो.
 2. अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास त्या दोहोऐवजी अो येतो.
 3. तसेच अ किंवा आ यांच्यापुढे ऋ आल्यास त्या दोहोऐवजी अर् येतो.

उदा.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+इ=ए मनुष्य+इतर मनुष्येतर
अ+ई=ए राम+ईश्वर रामेश्वर
आ+इ=ए ज्ञान+इश्वर ज्ञानेश्वर
आ+ई=ए लंका+ईश्वर लंकेश्वर
अ+उ=अो पर+उपकार परोपकार
अ+ऊ=अो जल+ऊर्मी जलोर्मी
आ+उ=अो धारा+उष्ण धारोष्ण
आ+ऊ=अो गंगा+ऊर्मी गंगोर्मी
अ+ऋ=अर् सप्त+ऋषी सप्तर्षी
आ+ऋ=अर् राजा+ऋषी राजर्षी

वृद्ध्यादेश स्वर संधी

 1. अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहोऐवजी ऐ येतो.
 2. अ किंवा आ यांच्यापुढे अो किंवा अौ आल्यास त्या दोहोऐवजी अौ येतो. याला वृद्ध्यादेश असे म्हणतात.

उदा.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
अ+ए=ऐ क्षण+उक क्षणैक
आ+ए=ऐ सदा+एव सदैव
अ+ऐ=ऐ जन+ऐक्य जनैक्य
आ+ऐ=ऐ विद्या+ऐश्वर्य विद्येश्वर्य
अ+अो=अौ जल+अोघ जलौघ
आ+अो=अौ यमुना+अोघ यमुनौघ
अ+अौ=अौ वन+आैषधी वनौषधी
आ+अौ=अौ क्षमा+आैचित्य क्षमौचित्य

यणादेश स्वर संधी

इ, उ व ऋ (-हस्व किंवा दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास-

 1. इ, ई बद्दल य हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.
 2. उ, ऊ बद्दल व हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. आणि
 3. ऋ बद्दल र हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.

उदा.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
इ+अ=य्+अ=य प्रति+अंतर प्रत्यंतर
इ+आ=य्+आ=या वि+आसंग व्यासंग
इ+उ=य्+उ=यु अति+उत्तम अत्युत्तम
ई+उ=य्+उ=यु नदी+उगम नद्युगम
इ+ए=य्+ए=ये प्रति+एक प्रत्येक
ई+ए=य्+ए=ये किती+एक कित्येक
उ+अ=व्+अ=व मनु+अंतर मन्वतंर
उ+आ=व्+आ=वा सु+आगत स्वागत
ऊ+ई=व्+ई=वी भानू+ईश्वर भान्वीश्वर
ऋ+आ=र्+आ=रा पितृ+आज्ञा पिञाज्ञा
ऋ+आ=र्+अौ=रौ पितृ+आैदार्य पिञौदार्य

उर्वरीत स्वर संधी

ए, ऐ, अो, अौ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तरी त्याबद्दल अनुक्रमे अय, आय, अवी, आवि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.

उदा.

एकञ येणारे स्वर व संधी पोटशब्द जोडशब्द
ए+अ=अय्+अ=अय ने+अन नयन
ऐ+अ=आय्+अ=आय गै+अन गायन
आे+ई=अव्+ई=अवी गो+ईश्वर गवीश्वर
आै+इ=आव्+इ=आवि नौ+इक नाविक
 आे+अ=अव्+अ=अव पो+अन पवन
 आै+अ=आव्+अ=आव पौ+अन पावन

व्यंजन संधी

जोडाक्षर तयार होताना  जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल, तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. व्यंजन+व्यंजन किंवा व्यंजन+स्वर असे त्याचे स्वरूप असते.

प्रथम व्यंजन संधी

पहिल्या पाच वर्णांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
विपद्+काल द्+क्=त्+क्=त्क्  द् चा त् विपत्काल
वाग्+पति ग्+प्=क्+प्=क्प् ग् चा क् वाक्पति
वाग्+ताडन ग्+त्=क्+त्=क्त् ग् चा क् वाक्ताडन
षड्+शास्ञ ड्+श्=ट्+श्=ट्श  ड् चा ट् षट्शास्ञ
क्षुध+पिपासा ध्+प्=त्+प्=त्प् ध् चा त् क्षुत्पिपासा
आपद्+काल द्+क्=त्+क्=त्क् द् चा त्  आपत्काल
शरद्+काल द्+क्=त्+क्=त्क् द् चा त्  शरत्काल
क्षुद्+पीडा द्+प्=त्+प्=त्प् द् चा त्  क्षुत्पीडा

तृतीय व्यंजन संधी

पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. याला तृतिय व्यंजन संधी म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
वाक्+विहार क्+व्=ग्+व्=ग्व क् चा ग् वाग्विहार
षट्+रिपू ट्+र्=ड्+र्=ड्र ट् चा ड् षड्रिपू
सत्+आचार त्+आ=द्+आ=दा त् चा द् सदाचार
उत्+गम त्+ग्=द्+ग्=द्ग त् चा द् उद्गम
उत्+ध्वस्त त्+ध्=द्+ध्=द्ध त् चा द् उद्ध्वस्त
सच्चित+आनंद त्+आ=द्+आ=दा त् चा द् सच्चिदानंद
सत्+वासना त्+व=द्+व=द्व त् चा द् सद्वासना
विद्युत+दीप त्+द्=द्+द्=द्द त् चा द् विद्युद्दीप
भगवत्+भक्ती त्+भ=द्+भ्=द्भ त् चा द् भगवद्भक्ती
अच्+आदी च्+आ=ज+आ=जा च् चा ज् अजादी
अप्+ज प्+ज्=ब्+ज=ब्ज प् चा ब् अब्ज
जगत्+ईश्वर त्+ई=द्+ई=दी त् चा द् जगदीश्वर
षट्+आनन ट्+आ=ड्+आ=डा ट् चा ड् षडानन
सत्+भावना त्+भ्=द्+भ्=द्भ त् चा द् सद्भावना
दिक्+विजय क्+व्=ग्+व्=ग्व क् चा ग् दिग्विजय
भगवत्+गीता त्+ग्=द्+ग्=द्ग त् चा द् भगवद्गीता
दिक्+अंबर क्+अ=ग्+अ=ग क् चा ग् दिगंबर
दिक्+जह क्+अ=ग्+ग्=ग्ग क् चा ग् दिग्गज
दिक्+अन्त क्+अ=ग्+अ=ग क् चा ग् दिगन्त

अनुनासिक संधी

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो, याला अनुनासिक संधी म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
षट्+मास ट्+म्=ण्+म्=ण्म  ट् चा ण् षण्मास
जगत्+नाथ त्+न्=न्+न्=न्न त् चा न् जगन्नाथ
सत्+मती त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् सन्मती
चित्+मय त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् चिन्मय
मत्+माता त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् मन्माता
तत्+मय त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् तन्मय
सत्+मार्ग त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् सन्मार्ग
भगवत्+नाम त्+म्=न्+म्=न्म  त् चा न् भगवन्नाम
षट्+मुख ट्+म्=ण+म्=ण्म  ट् चा ण् षण्मुख
वाक्+मय क्+म्=ङ+म्=ङम् क् चा ङ वाङमय
जगत्+नियंता त्+न्=न्+न्=न्न त् चा न् जगन्नियंता
वाक्+निरस क्+न्=ङ+न्=ङन् क् चा ङ वाङनिरस
वाक्+निश्चय क्+न्=ङ+न्=ङन् क् चा ङ वाङनिश्चय
दिक्+मूढ क्+म्=ङ+म्=ङम् क् चा ङ  दिङ्मूढ

‘त’ व्यंजन संधी

त या व्यंजनापुढे-

च्, छ् आल्यास त बद्दल च् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
सत्+चरिञ त्+च्=च्+च्=च्च त् चा च् सच्चरिञ
तत्+छञ त्+छ=च्+छ=च्छ त् चा च् तच्छञ
उत्+छेद त्+छ=च्+छ=च्छ त् चा च् उच्छेद

ज् , झ् आल्यास त बद्दल ज् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
उत्+ज्वल त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् उज्ज्वल
सत्+जन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् सज्जन
जगत्+जीवन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् जगज्जीवन
यावत्+जीवन त्+ज्=ज्+ज्=ज्ज् त् चा ज् यावज्जीवन
शरत्+झंझावत त्+झ=ज्+झ्=ज्झ् त् चा ज् शरज्झंझावत

ट् , ठ् आल्यास त बद्दल ट् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
तत्+टीका त्+ट्=ट्+ट्=ट्ट त् चा ट् तट्टीका

ल् आल्यास त बद्दल ल्  होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण झालेला बदल संधी
उत्+लंघन त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् उल्लंघन
उत्+लेख त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् उल्लेख
तत्+लीन त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् तल्लीन
विद्युत्+लता त्+ल्=ल्+ल्=ल्ल त् चा ल् विद्युल्लता

श् आल्यास त बद्दल च् होतो व श बद्दल छ् होतो.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण संधी
सत्+शिष्य त्+श्=च्+छ=च्छ सच्छिष्य
सत्+शील त्+श्=च्+छ=च्छ सच्छिल
मृत्+शकटीक त्+श्=च्+छ=च्छ मृच्छकटिक
उत्+शिष्ट त्+श्=च्+छ=च्छ उच्छिष्ट

‘म’ पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म्’ मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास ‘म्’ बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

उदा.

सम+आचार=समाचार

सम्+गती= संगती

सम्+कल्प=संकल्प

सम्+बंध=संबंध

किम्+कर=किंकर

‘छ्’ पूर्वी -हस्व स्वर आल्यास त्या दोहोंमध्ये ‘च्’ हा वर्ण येतो.

उदा.

रत्न+छाया=रत्नच्छाया

शब्द+छल=शब्दच्छल

विसर्ग संधी

विसर्ग हे स्वरादी आहेत. विसर्ग हे कोणत्यातरी स्वरांनंतर येतात. विसर्गसंधी मध्ये एकञ येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेंव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.

विसर्ग-उकार संधी

विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा अो होतो.

यशः+धन=यशोधन मनः+रंजन=मनोरंजन
तेजः+निधी=तेजोनिधी रजः+गुण=रजोगुण
मनः+राज्य=मनोराज्य मनः+वृत्ती=मनोवृत्ती
मनः+बल=मनोबल अधः+वदन=अधोवदन
मनः+रथ=मनोरथ तपः+बल=तपोबल

विसर्ग-र्-संधी

विसर्गाच्या मागे अ, आ शिवाय कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होऊन संधी होतो. याला विसर्ग-र्-संधी असे म्हणतात.

पोटशब्द एकञ येणारे वर्ण संधी
निः+अंतर नि+र्+अंतर निरंतर
बहिः+अंग बहि+र्+अंग बहिरंग
निः+विकार नि+र्+विकार निर्विकार
निः+इच्छा नि+र्+इच्छा निरिच्छा
दुः+दैव दु+र्+दैव दुर्दैव
दुः+वासना दु+र्+वासना दुर्वासना
दुः+गती दु+र्+गती दुर्गती
धनुः+वात धनु+र्+वात धनुर्वात
दुः+जन दु+र्+जन दुर्जन
दुः+आत्मा दु+र्+आत्मा दुरात्मा
धनुः+विद्या धनु+र्+विद्या धनुर्विद्या
निः+लोभ नि++र्+लोभ निर्लोभ
निः+उद्योग नि+र्+उद्योग निरूद्योग
आशीः+वचन आशी+र्+वचन आशीर्वचन
आयुः+वेद आयु+र्+वेद  आयुर्वेद

पदाच्या शेवटी ‘स’ येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स्’ चा विसर्ग होतो.

उदा. मनस्+पटल=मनःपटल

पदाच्या शेवटी ‘र्’ येऊन त्याच्या पुढे कोणतेही कठोर व्यंजन आल्यास त्या ‘र्’ चा विसर्ग होतो.

उदा. चतुर्+सूञी=चतुःसूञी

विसर्गाच्या ऐवजी येणार्या र् च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो ‘र्’ तसाच राहून संधी होतो.

उदा.

 1. अंतर्+गत=अंतर्गत
 2. पुनर्+जन्म=पुनर्जन्म
 3. अंतर्+आत्मा=अंतरात्मा
 4. पुनर्+उक्ती=पुनरूक्ती

विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क् , ख् , प् , फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. माञ पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.

उदा.

 1. रजः+कण=रजःकण
 2. अधः+पात=अधःपात
 3. इतः+उत्तर=इतउत्तर
 4. प्रातः+काल=प्रातःकाल
 5. तेजः+पुंज=तेजःपुंज

विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क् , ख् , प् , फ् यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो.

उदा.

 1. दुः+परिणाम=दुष्परिणाम
 2. दुः+कृत्य=दुष्कृत्य
 3. निः+पाप=निष्पाप
 4. निः+कारण=निष्कारण

विसर्गाच्या पुढे च् , छ् आल्यास विसर्गाचा श् होतो आणि त् , थ् आल्यास विसर्गाचा स् होतो.

उदा.

 1. मनः+ताप=मनस्ताप
 2. निः+तेज=निस्तेज
 3. दुः+चिन्ह=दुश्चिन्ह
 4. निः+चल=निश्चल

विसर्गाच्या पुढे श् , स् आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो किंवा लोप पावतो.

उदा.

 1. निः+संदेह=निःसंदेह
 2. चतुः+शृंगी=चतुःश्रृंगी
 3. दुः+शासन=दुःशासन

मराठीतील विशेष संधी

पूर्वरूप संधी

कधी कधी दोन स्वर एकपुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर (पूर्व स्वर) न बदलता तसाच राहतो व दूसरा स्वर लोप पावतो. उदा.

 1. लाडू+आत=लाडूत
 2. चांगले+असे=चांगलेसे
 3. नदी+आत=नदीत
 4. साजे+असा=साजेसा

पररूप संधी

कधी कधी संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दूसरा स्वर (पर स्वर) कायम राहून संधी होतो. उदा.

 1. हर+एक=हरेक
 2. भरड+ऊन=भरडून
 3. चिंधी+आेटी=चिंधोटी
 4. घर+ई=घरी

दीर्घ स्वरापुढे येणार्या स्वराचा मागील स्वराशी सामान्यतः संधी होत नाही.

उदा.

 1. जा+ऊन=जाऊन
 2. हो+ऊ=होऊ
 3. घे+ईल=घेईल

‘ही’ या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारे संधी होतो.

उदा.

 1. दोन+ही=दोन्ही/दोनी
 2. तीन+ही=तिन्ही/तिनी
 3. चार+ही=चार्ही/चारी

अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो.

उदा.

 1. गरज+अनुसार=गरजेनुसार
 2. विषय+अनुरूप=विषयानुरूप
 3. पद्धत+अनुसार=पद्धतीनुसार

बोली भाषेतील संधी

बोलण्याच्या अोघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवी रुपे तयार होतात. उदा.

 1. येतो+आहे=येतोहे/येतोय
 2. बसला+आहात=बसलाआहात/बसलात
 3. गेली+आहे=गेलीहे/गेलीय

शब्दशक्ती

शब्दशक्ती: अर्थ

शब्दामध्ये अनेक अर्थ प्रकट करण्याचे सामर्थ्य असते. कधी थेट अर्थ असतो, तर कधी गर्भित अर्थ असतो, एकच शब्द अनेक अर्थांनी वापरता येतो. प्रत्येक शब्दामध्ये प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते. हि शब्दशक्ती वापर करणाऱ्यास अचूक माहिती हवी.

शब्दशक्ती: प्रकार

शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते.

 1. अभिधा
 2. लक्षणा
 3.  व्यंजना

अभिधा

शब्दातून किंवा वाक्यातून जेंव्हा सरळसरळ किंवा शब्दशः अर्थ प्रकट होत असतो, तेंव्हा त्या शब्दशक्तीला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणारा जो अर्थ असतो त्यास वाच्यार्थ असे म्हणतात.

उदा.

 1. मी एक वाघ पाहिला. या वाक्यातील वाघ म्हणजे एक हिंस्ञ जंगली प्राणी.
 2. आमच्याकडे एक अमेरिकन कुञा आहे.
 3. दादा जेवयला बसला.
 4. घरात फार जळवा झाल्या आहेत.
 5. त्या जंगलात खूप अस्वले आहेत.

२) लक्षणा-

आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे काही शब्द, वाक्ये येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निर्माण होतो. अशावेळी शब्दशः अर्थ न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो.

उदा.

 1. भर दरबारात माधवराव पेशव्यांनी गंगोबा चंद्रचुडांच्या श्रीमुखात दिली.
 2. गंगेत गवळ्यांची वस्ती.
 3. आमच्या दारावरून हत्ती गेला.
 4. तो कप पिऊन टाक.
 5. आणखी आठ सहकाऱ्यांना मुख्यमंञी अर्धचंद्र देणार.
 6. पानिपतावर सव्वालाख बांगड्या फुटल्या.

३) व्यंजना-

शब्दातून किंवा वाक्यातून सरळसरळ अर्थ प्रकट न होता, व्यंगात्मक अर्थ प्रकट होत असेल तर त्या शब्दशक्तीला व्यंजना असे म्हणतात.

उदा.

 1. समाजात वावरणारे अले साप ठेचून काढले पाहिजेत.
 2. निवडणुका आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते.
 3. भुंकणारे कुञे चावत नसतात.
 4. गोरगरिबांचे रक्त शोषणार्या या जळवा ठेचून काढल्याच पाहिजेत.
 5. देविकाबाई सुनेला म्हणाल्या, ‘सूर्य अस्ताला गेला.’
 6. उषःकाल होता होता, काळराञ झाली….

केवलप्रयोगी अव्यय

व्याख्या

मनातील उत्कट भावना व्यक्त करताना जे उद्गार वापरले जातात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्यय : प्रकार

उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

हर्षदर्शक

वा-वा, आ-हा, आे-हो, अहा, अहाहा इ.

शोकदर्शक

हाय, हाय-हाय, अरेरे, देवा रे, हरहर, शिव-शिव, रामा रे, अगाई, आई गं, ऊं, अं इ.

आश्चर्यदर्शक

बाप रे, अबब, अहाहा, आेहो, आॅ, आे, अरेच्चा इ.

प्रशंसादर्शक

शाब्बास, फक्कड, छान, भले, वाहवा, ठीक, खाशी, य़ंव इ.

संमतिदर्शक

बराय, ठीक, अच्छा, जीहां, जी, हां इ.

विरोधदर्शक

छट, छे छे, हॅट, अंहं, उंहू, ऊः , च इ.

तिरस्कारदर्शक

फुस, इश्श, हुडत, हुड, हत्, छत्, छी, शी, थुः , धिक् इ.

संबोधनदर्शक

अगा, अगो, अहो, अरे, बा, रे, अगं इ.

मौनदर्शक

गप, चूप, गुपचूप, चुपचाप इ.

 

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय- व्याख्या

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्ययाचे प्रकार

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

दोन स्वतंञ आणि अर्थपूर्ण वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारातून बनलेली वाक्ये संयुक्त असतात. याचे चार उपप्रकार आहेत.

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये

समुच्चय म्हणजे बेरीज/मिळवणे. जी उभयान्वयी अव्यये पहिल्या विधानात अधिक भर टाकण्याचे कार्य करतात, त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. व, आणि, अन्, आणखी, शिवाय, आणिक, नि, न् ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.

उदा.

सकाळ झाली मुले शाळेकडे निघाली.

तो भेटला आणि चटकन निघून गेला.

त्याने काम केले नाही; शिवाय शिरजोरपणा करू लागला.

कानामागून आली अन् तिखट झाली.

विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये

जी उभयान्वयी अव्यये पर्याय दर्शवितात, म्हणजेच दिलेल्या गोष्टींपैकी एकाची निवड करणे ही अपेक्षा असते, त्यांना  विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. किंवा, अथवा, की, अगर, वा ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.

उदा.

मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच.

विचार कर वा ना कर, घडायचे ते घडणारच.

देह जावो अथवा राहो । पांडूरंगी दृढ भावो।

तुला ज्ञान हवे की धन हवे.

न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये

न्यूनत्व म्हणजे कमीपणा. पहिल्या वाक्यातील कमतरता, उणीव दाखविणारे दुसरे वाक्य ज्या शब्दाने दाखविले जाते त्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. पर, परंतू, बाकी, किंतू, परी ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल.

सर्व मुले उत्तीर्ण झाली; परंतू गुणवत्ता यादीत कोणीच आले नाही.

मरावे; परी किर्तीरूपे उरावे.

शेतकर्यांनी शेत नांगरले; पण पाऊस पडलाच नाही.

परिणामबोधक उभयान्वयी अव्यये

पहिल्या वाक्यातील घटनेमुळे किंवा कृत्यामुळे दुसऱ्या वाक्यात जो बदल घडतो किंवा दुसऱ्या वाक्यावर जो परिणाम होतो. ते दर्शविणाऱ्या अव्ययाला, परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणून, याकरिता, सबब, यास्तव, की, तस्मात ही परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

माईंनी खूप ञास काढला, म्हणून तर आता सुखात जगताहेत.

शरीर घाटदार व्हावे, म्हणून आम्ही व्यायाम करतो.

गाडी वाटेत बंद पडली; सबब मी उशीरा पोहोचलो.

गाैणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

जी उभयान्वयी अव्यये एक प्रधान वाक्य व दुसरे गाैण वाक्य यांना एकञीत जोडण्याचे कार्य करतात, त्यांना गाैणत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. या प्रकारापासून बनलेली वाक्ये मिश्र स्वरूपाची असतात. याचे चार उपप्रकार आहेत

स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये

जी उभयान्वयी अव्यये दोन वाक्यांचा संबंध जोडतात आणि प्रधान वाक्याचे स्वरूप गाैण वाक्यात उलगडून सांगतात अशा उभयान्वयी अव्ययांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणजे, की, म्हणून जे ही स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

सम्राट अशोक म्हणून एक राजा होऊन गेला.

एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम.

आई म्हणाली की, आज पाहुणे येणार आहेत.

कारणबोधक उभयान्वयी अव्यये

जी उभयान्वयी अव्यये प्रधानवाक्यामध्ये घडलेली घटना व घटनेचे कारण दर्शविणाऱ्या गाैण वाक्याला जोडते त्यांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. कारण, का-की ही कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

त्याला बक्षीस मिळाले कारण त्याने प्रथम क्रमांक पटकावला.

मला हे जेवण आवडते का की ते आईने बनविले आहे.

उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये

गाैण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतू आहे असे ज्या अव्ययांनी दर्शविले जाते त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. म्हणून, सबब, यास्तव, कारण ही उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

चांगले शिक्षण मिळावे, म्हणून तो पुण्यास गेला.

प्रथम क्रमांक यावा यास्तव त्याने खूप अभ्यास केला.

संकेतबोधक उभयान्वयी अव्यये

प्रधान वाक्य व गाैण वाक्य यांतील परस्परावलंबन दाखविणार्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. जर-तर, जरी-तरी ही संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत.

उदा.

जर बाबा लवकर घरी आले तर आपण बाहेर जेवायला जाऊ.

 

शब्दयोगी अव्यय

व्याख्या

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी असणारा संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. परंतू काही शब्दयोगी अव्यये नामाला जोडून येत नाहीत.

उदा.

मांजराकडून उंदीर मारला गेला.

चंद्र ढगामागे लपला.

काही मूळची क्रियाविशेषणे नामाला जोडून येऊन ती शब्दयोगी अव्यये बनतात.

उदा.

वर, खाली, पुढे, मागे, आत, बाहेर, जवळ, नंतर इ.

शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यांतील फरक

शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय
पक्षी झाडावर बसला. तो जिना चढून वर गेला.
दिव्याखाली अंधार असतो. मीना पटकन खाली बसली.
घरामागे विहीर आहे. मागे या ठिकाणी शाळा होती.

 

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

कालवाचक

आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो.

गतिवाचक

आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून

स्थलवाचक

आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष.

करणवाचक

मुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती

हेतुवाचक

साठी, करिते, कारणे, निमित्त, स्तव, प्रीत्यर्थ, अर्थी

व्यतिरेकवाचक

व्यतिरिक्त, विना, वाचून, शिवाय, खेरीज.

तुलनावाचक

तर, तम, परीस, मध्ये, पेक्षा.

योग्यतावाचक

सम, समान, प्रमाणे, सारखा, जोगा, योग्य, बरहुकूम.

कैवल्यवाचक

च, ना, पण, माञ, केवळ, फक्त.

संग्रहवाचक

ही, पण, केवळ, फक्त, बारीक, देखील, सुद्धा

संबंधवाचक

संबंधी, विषयी, विशी.

साहचर्यवाचक

सकट, सहित, समवेत, बरोबर, सह, संगे, सवे, निशी

भागवाचक

आतून, पैकी, पोटी

विनिमयवाचक

जागी, बदली, ऐवजी, बद्दल

दिशावाचक

कडे, लागी, प्रति, प्रत

विरोधवाचक

उलटे, उलट, वीण, विरूद्ध

परिणामवाचक

भर


साधित शब्दयोगी अव्यय

नामसाधित कड-कडे, अंत-अंती, पूर्व-पूर्वी
विशेषणसाधित योग्य, विरूद्ध, समान, सहित, सारखा, सम
धातुसाधित लाग-लागून, देख-देखील, कर-करिता
क्रियाविशेषणसाधित आतून, मागून, खालून, वरून, पुढून
संस्कृत शब्दसाधित समक्ष, परोक्ष, विना, पर्यंत, समीप

 

शुद्ध शब्दयोगी अव्यय

नामाला जोडून येणाऱ्या परंतु नामाचे सामान्यरूपात रूपांतर होणार नाही, अशा शब्दयोगी अव्ययाला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात.

विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय

जे अव्यय विभक्तीच्या प्रत्ययाचे कार्य करतात त्यांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

विभक्ती अव्यय
 द्वितिया लागी, प्रत
तृतीया सह, बरोबर, कडून, मुळे, योगे, द्वारा, प्रमाणे, करवी
चतुर्थी प्रत, प्रीत्यर्थ, करिता, साठी, कडे, ऐवजी, बद्दल, स्तव
पंचमी शिवाय, वाचून, खेरीज, पेक्षा, कडून, पासून
षष्ठी विषयी, संबंधी
सप्तमी समोर, खाली, भोवती, मध्ये, ऐवजी, ठाई

 

क्रियाविशेषण अव्यय

व्याख्या

क्रियापदांबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग, विभक्ती, वचन इ. च्या बदलांमुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रियाविशेषणांचे अर्थावरून पडणारे प्रकार

कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

कालदर्शक

वाक्यातील क्रिया केंव्हा घडली हे दर्शविणारे शब्द.

उदा.

जेव्हा, पुर्वी, मागे, आधी, आता, सध्या, उद्या, परवा, लगेच, केव्हा, दिवसा, राञी, तूर्त, हल्ली, काल, इ.

सातत्यदर्शक

वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणारे शब्द.

उदा.

सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, नित्य, सदा,अद्याप इ.

आवृत्तीदर्शक

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणारे शब्द.

उदा.

दररोज, दोनदा, पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी, फिरून, वारंवार, सालोसाल, इ.

 स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये

स्थितीदर्शक

वाक्यातील क्रियेचे स्थळ/ठिकाण दर्शविणारे शब्द.

उदा.

वर, तिकडे, खाली, कोठे, मध्ये, मागे, पुढे, येथे, तेथे, जेथे, जिकडे, अलीकडे इ.

गतिदर्शक

वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारे शब्द.

उदा.

लांबून, दुरून, तिकडून, मागून, पुढून, वरून, इकडून, खालून,  इ.

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

प्रकारदर्शक

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविणारे शब्द.

उदा.

मुद्दाम, हळू, सावकाश, असे, उगीच, व्यर्थ, तसे, जसे, कसे, आपोआप,  जलद, फुकट, इ.

अनुकरणदर्शक

वाक्यातील क्रिया कशी घडली, हे दाखविणारे अनुकरणवाचक शब्द.

उदा.

पटापट, टपटप, पटकन, चमचम, बदाबदा, झटकन इ.

निश्चयदर्शक

वाक्यातील क्रियेत निश्चय दर्शविणारे शब्द.

उदा.

खुशाल, निखालस, खचित, खरोखर, नक्की  इ.

संख्यावाचक/परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील शब्द जेंव्हा क्रियेची संख्या किंवा परिणाम दाखवितो, तेंव्हा त्याला संख्यावाचक/परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

थोडा, क्वचित, बिलकुल, मुळीच अत्यंत, कमी, मोजके, पूर्ण, जास्त, किंचित, जरा, काहीसा, अगदी, भरपूर, अतिशय इ.

प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील का/ना हे शब्द जेंव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनवितात, तेंव्हा त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

तू परगावी जातोस का?

तू आईसक्रीम खाणार का?

तुम्ही बागेत फिरायला याल ना?

तुम्ही वाचन कराल ना?

निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये

वाक्यातील न/ना हे शब्द जेंव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवितात तेंव्हा त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.

मी न विसरता तुझे काम करेन.

तो न चुकता आला.

त्याने खरे सांगितले तर ना.

मी न चुकता तुला फोन करेन.

क्रियाविशेषणांचे स्वरुपावरून पडणारे प्रकार

सिद्ध क्रियाविशेषण अव्यय

काही शब्द मुळातच क्रियाविशेषण अव्यय असतात, सिद्ध क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

उदा.

मागे, पुढे, येथे, तेथे, आज इ.

साधित क्रियाविशेषण अव्यय

नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषण अव्ययांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

 1. नामसाधित-सकाळी, राञी, व्यक्तीशः, दिवसा, वस्तुतः
 2. सर्वनामसाधित-यावरून, त्यावरून, कित्येकदा
 3. विशेषणसाधित-इतक्यात, एकदा, एकञ, मोठ्याने
 4. धातूसाधित- पळताना, हसू, हसताना, खेळताना, हसत
 5. अव्ययसाधित- खालून, कोठून, खालून, इकडून,
 6. प्रत्ययसाधित- मनःपुर्वक, शास्ञदृष्ट्या, कालानुसार

सामासिक क्रियाविशेषण अव्यय

काही जोडशब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात, अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा.

राञंदिवस, गावोगाव, आजन्म, हरघडी, गैरहजर, गैरकायदा, , समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, दररोज, प्रतिदिन, इ.

error: