आंतरराष्ट्रीय संघटना :: Current Affairs

संयुक्त राष्ट्र संघ (United Nations)

संयुक्त राष्ट्र संघ (United Nations) –

स्थापना –

संयुक्त राष्ट्र संघ (United Nations) ची स्थापना २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्राच्या अधिकारपञावर ५० देशांच्या स्वाक्षरीनिशी झाली होती.

मुख्यालय-

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयाॅर्क या शहरामध्ये आहे.

महासचिव-

संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद महासचिव हे आहे. सध्या युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरस (पोर्तुगाल) हे आहेत.

उद्देश-

दुसर्या महायुध्दातील विजयी देशांनी मिळून दुसर्या महायुद्धासारखी परिस्थिती उद्भवू नये याकरिता आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने या संघाची स्थापना केली.

सदस्य संख्या-

संयुक्त राष्ट्र संघामध्ये सध्या १९३ सदस्य देश आहेत. दक्षिण सुदान हा सर्वात नवीन (२०११) सदस्य होणारा देश आहे.

अधिकृत भाषा-

संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 अधिकृत भाषा आहेत.

 1. अरबी,
 2. चीनी,
 3. इंग्रजी,
 4. फ्रेंच,
 5. रशियन,
 6. स्पॅनिश.

स्वरूप- 

या संस्थेच्या संरचनेत

 1. आम सभा (General Assembly),
 2. सुरक्षा परिषद (Security Council),
 3. आर्थिक व सामाजिक परिषद (Economic and Social Council-ECOSOC)
 4. सचिवालय आणि
 5. आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice).
 6. विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

यांचा समावेश होतो. यांनाच युनोचे सहा स्तंभ असेही म्हणतात.

 

 

BIMSTEC(Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation)

 

BIMSTEC(Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation)

BIMSTEC LOGO

बंगालच्या उपसागरास लागून असलेल्या स्वतंत्र राष्ट्रांची ही संघटना आहे.

स्थापना

६ जून १९९७

सदस्य:

 1. भारत
 2. बांगलादेश
 3. म्यानमार
 4. नेपाळ
 5. भूतान
 6. श्रीलंका
 7. थायलंड

मुख्यालय

ढाका

WORLD BANK GROUP

जागतिक बॅंक समुहामध्ये(WORLD BANK GROUP) पाच संस्थांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय पुर्नबांधणी व विकास बॅंक (International Bank for Reconstruction and Development-IBRD)

प्रस्तावना

IBRD ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असून ती मध्यम उत्पन्न असणार्या विकसनशील देशांना कर्जपुरवठा करते. एकञितपणे IBRD व IDA या दोघांना जागतिक बॅंक असे संबोधले जाते. या दोन्हींचे नेतृत्व व कर्मचारीवर्ग समान आहेत. IBRD स्वायत्त देशांना दळणवळण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उर्जा, स्वच्छता यांच्याशी संबंधित प्रकल्पांना कर्जपुरवठा करते.

ऐेतिहासिक पार्श्वभूमी

IBRD ची स्थापना ब्रेटनवुड परिषदेत १९४४ साली दुसर्या महायुद्धानंतर युद्धपिडीत युरोप पुर्नबांधणी करण्यासाठी केली होती. IBRD ची ध्येये मार्शल प्लान ने घोषित केली होती. १९४० व १९५० च्या दशकात IBRD ने युरोप मधील अनेक देशांना पायाभूत सुविधांसाठी कर्जपुरवठा केला. पहिले कर्ज फ्रांसला दिले गेले. युरोपच्या पुर्नबांधणीनंतर IBRD चे ध्येय जगातील गरिबी नष्ट करणे असे बदलण्यात आले.

स्थापना

IBRD १९४४ साली ब्रेटनवुड परिषदेत करण्यात आली. ती १९४६ साली कार्यरत झाली.

मुख्यालय

वाॅशिंग्टन डी. सी.

सदस्य

१८९. भारत हा संस्थापक सदस्य आहे.

कार्ये

 1. मध्यम उत्पन्न गटातील सदस्य देशांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
 2. शाश्वत, न्याय व रोजगारवर्धक वृद्धीला प्रोत्साहन देणे.
 3. मध्यम व अल्प उत्पन्न गटातील देशांतील गरिबी नष्ट करणे.

 

आंतरराष्ट्रीय विकास संघटन (International Development Association-IDA)

प्रस्तावना १९४० व १९५० च्या दशकात गरीब विकसनशील देशांना IBRD चा कर्जपुरवठा परवडण्याजोगा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा देशांना अतिसुलभ कर्जपुरवठा करणार्या संस्थेची आवश्यकता भासू लागली. यातुनच IDA चा उदय झाला.
स्थापना १९६०
सदस्य १७३. माञ त्यापैकी ८१ देश सुलभ कर्ज पुरवठयास पाञ आहेत.
मुख्यालय वाशिंग्टन डी.सी.
कार्ये IDA आपल्या अतिगरीब विकसनशील सदस्य देशांना व्याजविरहीत वित्तपुरवठा करते. म्हणुन तिला जागतिक बॅंकेची सुलभ कर्जखिडकी असे म्हणतात.

आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (International Finance Corporation-IFC)

स्थापना १९५६
मुख्यालय वाशिंग्टन डी.सी.
सदस्य १८४
कार्य विकसनशील देशातील खाजगी क्षेञाच्या विकासासाठी गुंतवणूक सल्ला, मालमत्ता व्यवस्थापन इ. सेवा पुरविणे.

 

बहुपक्षीय गुंतवणूक हमी अभिकरण (Multilateral Investment Guarantee Agency-MIGA)

स्थापना १९८८
मुख्यालय वाशिंग्टन डी.सी.
सदस्य १८१
कार्य हे अभिकरण विकसनशील देशातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचे राजकीय व गैरव्यापारी जोखमींपासुन होणार्या हानींबाबत हमी देते.

 

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद निवारण केंद्र (International Centre for Settlement of Investment Disputes- ICSID)

स्थापना १९६५
मुख्यालय वाशिंग्टन डी.सी.
सदस्य १६१-(स्वाक्षरी करणारे व करारबद्ध )
१५३-(करारबद्ध)
कार्य  हे केंद्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांच्या विवादांमध्ये समझाैता घडविण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करते.

 

 

IMF

WTO

WHO

COMMONWEALTH OF NATIONS

NAM

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना

प्रस्तावना

सार्क ही दक्षिण आशियाई देशांची क्षेञीय संघटना असून एक भाैगोलिक-राजकीय संघ आहे. सार्क देशांनी ३ टक्के जागतिक क्षेञफळ, २१ टक्के जागतिक लोकसंख्या, ३.८ टक्के जागतिक अर्थव्यवस्था व्यापली आहे. ही संघटना आर्थिक व प्रादेशिक एकात्मता साधण्याचा प्रयत्न करते.

स्थापना

सार्कची स्थापना ८ डिसेंबर १९८५ रोजी ढाका येथे झाली.

ऐेतिहासिक पार्श्वभूमी

दक्षिण आशियाई देशांमध्ये सहकार्य संघटनेच्या कल्पनेबाबत किमान तीन परिषदांमध्ये चर्चा झाली. Asian Relation Conference-१९४७, नवी दिल्ली, बागुयो परिषद-१९५० (फिलिपिन्स), व Colombo Power Conference-१९५४.
बांग्लादेशचे राष्ट्रपती झियाउर रेहमान यांनी दक्षिण आशियाई देशांना याबाबत अधिकृत पञ पाठवले.तसेच नेपाळचे राजे बिरेंदृ यांनी १९७७ मध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये नद्यांच्या पाणीवाटपाबाबत सहकार्याची आवश्यकता बोलून दाखवली.
झियाउर रेहमान व राजे बिरेंदृ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सात देशांचे परराष्ट्र खात्यातील उच्च अधिकारी १९८१ मध्ये भेटले.
बांग्लादेशच्या प्रस्तावाला नेपाळ, श्रीलंका, भुतान व मालदीव यांनी पाठिंबा दिला. माञ भारत व पाकिस्तान संशयी भूमिकेत होते. भारताला छोटे देश मिळून भारतविरोधी आघाडी उभारतील अशी भिती होती. तर पाकिस्तानला वाटे कि, छोट्या देशांना पाकिस्तानविरोधात एकञ आणून प्रादेशिक बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करण्याची ही भारताची खेळी आहे.
१९८३ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तत्कालीन विदेशमंञी पी. व्ही. नरसिंहराव यांनी सार्कचा जाहीरनामा स्वीकारला.

सदस्य

सार्कचे ७ संस्थापक सदस्य आहेत. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भुतान, मालदीव.
अफगाणिस्तानने २००५ मध्ये सार्कचे सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याच वर्षी तसा अर्ज केला. अफगाणिस्तानच्या सदस्यत्वाबाबत सार्कमध्ये बरीच चर्चा झाली. दक्षिण आशियाच्या व्याख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले कारण अफगाणिस्तान हा मध्य आशियाई देश होता. शेवटी २००७ मध्ये अफगाणिस्तान हा सार्कचा आठवा सदस्य झाला.

निरिक्षक

आॅस्ट्रेलिया, चीन, जपान, इराण, युरोपियन युनियन, माॅरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया, यु. एस. ए.

भावी विस्तार

म्यानमारने सार्कचे सदस्य होण्यासाठी इच्छा प्रकट केली आहे. तुर्की आणि रशिया यांनी निरिक्षक दर्जा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. दक्षिण आफ्रिका सार्कच्या बैठकांमध्ये सहभागी झाला आहे.

प्रादेशिक केंद्रे व संस्था

सार्कची १२ प्रादेशिक केंद्रे आहेत. तर ६ उच्चतम संस्था व १७ मान्यताप्राप्त संस्था आहेत.

SAFTA

२००४ च्या इस्लामाबाद येथे भरलेल्या १२ व्या सार्क परिषदेदरम्यान SAFTA करार मंजूर झाला व १ जानेवारी २००६ पासून अस्तित्वात आला. या करारानुसार २००९ पर्यंत सार्क सदस्य आयात-निर्यात शुल्क २० टक्क्यांपर्यंत खाली आणणार होते.

सार्क पुरस्कार

१२ व्या सार्क परिषदेने प्रदेशातील व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहनासाठी सार्क पुरस्कारांना मान्यता दिली.
पुरस्काराचे स्वरूप- सुवर्णपदक, प्रशस्तीपञ व २५००० अमेरिकन डाॅलर
सार्क पुरस्काराची २००४ मध्ये सुरूवात झाल्यापासून एकदाच हा वितरित केला असून तो झियाउर रेहमान यांना मरणोत्तर प्रदान केला गेला.

सार्क साहित्य पुरस्कार

हा पुरस्कार सार्कची उच्चतम संस्था सार्क साहित्य व सहित्यिक संस्था हिच्यातर्फे दरवर्षी वितरित केले जातात. सुमन पोखरेल या नेपाळी कवीलाच फक्त हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

सार्क युवा पुरस्कार

सार्क प्रदेशातील अतुलनीय कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यत येतो. दरवर्षी वेगवेगळ्या थिम नुसार हा पुरस्कार देण्यात येतो.
२००९ मध्ये रवीकांत सिंग या व्यक्तीला नैसर्गिक आपत्तीनंतर अतुल्य योगदानाबद्दल देण्यात आला.

महासचिव

अमजद हुसेन बी. सियाल (पाकिस्तान)

परिषदा

१९ वी- २०१६- पाकिस्तान(रद्द)
१८ वी- २०१४ नेपाळ
१७ वी- २०११ मालदीव

OAU

error: