ASEAN ही दक्षिणपूर्व आशियाई देशांची प्रादेशिक संघटना आहे. संपूर्ण आसियान एक देश असता तर ती जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असती.
स्थापना
ASEAN ची स्थापना १९६७ मध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर व थायलंड या देशांनी आसियान/बॅंकाॅक जाहीरनाम्याने केली.
मुख्यालय
जकार्ता
सदस्य
एकूण १० सदस्य आहेत. वरील संस्थापक सदस्यांव्यतिरिक्त बुृनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, व्हिएतनाम हे सदस्य आहेत.
पापुआ न्युगिनी व तिमोर-लेस्टे यांना निरीक्षक दर्जा आहे.
उद्दिष्टे
१९६७ च्या ASEAN/BANKOK जाहीरनाम्यात आसियान ची पुढील उद्दिष्टे निश्चित केली आहेत.
आसियान प्रदेशात
१. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास करणे.
२. प्रादेशिक स्थैर्य व शांतता
३. परस्पर हितांच्या बाबींवर सहकार्य करणे.
४.प्रशिक्षण व संशोधन क्षेञात परस्पर सहकार्य.
५. लोकांचे जीवनमान उंचावणे.
६. Southeast Asian Studies ला प्रोत्साहन.
७. आंतरराष्ट्रीय संघटनांशी दृढ संबंघ प्रस्थापित करणे.