APEC

APEC ही आशिया पॅसिफिक प्रदेशात मुक्त व्यापारास उत्तेजन देणारी २१ अर्थव्यवस्थांची संघटना आहे.
१. आशिया पॅसिफिक प्रदेशातील अर्थव्यवस्थांचे परस्परावलंबन.
२. जगातील इतर प्रदेशात स्थापन झालेल्या प्रादेशिक व्यापार संघटना.
३. आशिया पॅसिफिक प्रदेशातील जपानची वाढती मक्तेदारी.
४. कृषी उत्पादने व कच्चा माल यांच्यासाठी युरोपशिवाय नवी बाजारपेठ स्थापन करण्याची गरज
या कारणांमुळे APEC ची स्थापना झाली.

APEC

स्थापना

१९८९

मुख्यालय

सिंगापुर

सदस्य

APEC ची सदस्यसंख्या २१ आहे. अॅपेक चे सदस्यत्वासाठी स्वतंञ अर्थव्यवस्था असणे हा निकष आहे. त्यामुळे APEC च्या सदस्यांना सदस्य अर्थव्यवस्था असे संबोधले जाते.
निरिक्षक-APEC चे तीन अधिकृत निरिक्षक आहेत. १) ASEAN 2) Pacific Island Forum 3) Pacific Economic Co-opreation Council

भावी विस्तार- भारताने APEC च्या सदस्यत्वासाठी विनंती केली आहे. भारताला याबाबत जपान, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी व यु. एस. यांचा पाठिंबा मिळाला आहे. माञ भारत पॅसिफिकला लागून नसल्याने भारताला सदस्यत्व देण्यात आलेले नाही. २०११ मध्ये पहिल्यांदा भारताला निरिक्षक म्हणून निमंञित करण्यात आले. याबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका व बांग्लादेशसह डझनभर इतर देशांनी APEC च्या सदस्यत्वासाठी विनंती केली आहे.