1857 च्या पूर्वीचे उठाव

रामोशांचा उठाव

 • पुरंदरमधील ‘भिवंडी‘ गावात इ.स. १७९१ मध्ये उमाजीजा जन्म झाला. उमाजी वडिलांच्या काळापासूनच ‘पुरंदर‘ किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. उमाजी नाईक याने पुरंदर परिसरात इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. सावकारांच्या खजिन्यांवर हल्ले करून ते लुटले. त्याबद्दल त्याला एक वर्षाची शिक्षा झाली. संतू नाईकाच्या मृत्यूनंतर सर्व रामोशांचे पुढारीपण उमाजीकडे आले. 
 • इंग्रजांनी उमाजी विरुद्ध (१८२६) पाहिला जाहिरनामा काढला. त्यामध्ये ‘उमाजी व त्याच साथीदार पांडूजी यांना धरून देणऱ्यास १०० रुपयांचे बक्षीस जाहिर केले‘.उमाजीने पुण्याच्या कलेक्टरकडे इ.स. १८२७ मध्ये काही मागण्या केल्या.कलेक्टर रॉबर्टसने एक जाहिरनामा काढून उमाजीला कडक उत्तर दिले.
 • इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी ही कॅ. अलेक्झांडर व मॅकिन्टॉशवर सोपविली आणि कॅ. बाइंडर हा मदतीला दिला. उमाजीचा पहिला संघर्ष ‘पांढरदेव‘ च्या डोंगरावर झाला. परंतु याठिकाणी उमाजीला पकडता आले नाही.
 • आपल्या मुत्सद्देगिरीव लढवय्येगिरीला यश येत नाही असे दिसताच इंग्रजांकडून कपटनीतीचा अवलंब करण्यात आला. मॅकिन्टॉश याने उमाजीच्या बहिणीला लालूच दाखविली आणि बहिणीनेच फितुर होऊन पुन्हा उमाजीला पकडून दिले. त्याच्यावर खटला दाखल करून उमाजीला फाशी देण्यात आली.

भिल्लांचा उठाव

 • भिल्ल हे गुजरात व राजस्थान या भागातील मूळ रहिवाशी आणि तेथील जमीनीचे मालक होते. सातपुडा व सह्याद्रीच्या पर्वतामध्ये भिल्लांची वस्ती होती. खानदेशात भिल्लांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती.
 • उत्तर मराठेशाहीतील अराजकतेचा फायदा भिल्लांनी उचलण्याचे ठरविले. सन १८०३ साली भिल्लांनी खानदेशात लूटमार केली.
 • सन १८१६ साली भिल्ल मंडळींनी पुन्हा उठाव केला. यावेळी पेंढारी लोकांनी पाठिंबा दिला होता.
 • पेशवाईच्या अस्तानंतर खानदेश इंग्रजांकडे आला. खानदेशाचा कारभार कलेक्टर या नात्याने ब्रिग्जकडे सोपविण्यात आल्यावर सर्व परिस्थितीचे निरीक्षण करून या जहागिरी टोळीप्रमुखांना परत करण्या निर्णय ब्रिग्ज व एल्‌फिन्स्टन या दोघांनी घेतला. 
 • ‘हिरा‘ नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली इ.स. १८२२ साली पुन्हा बंड झाले. त्याने खानदेशातील ब्रिटिश शासन जवळ जवळ संपविले. कर्नल रॉबिन्सनला भिल्लांच्या बंदोबस्तासाठी पाठविले. त्याने दोन वर्षे परिश्रम करून भिल्लांचा बंदोबस्त केला. 
 • सेवाराम घिसाडी याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी इ.स. १८२५ मध्ये उठाव केला. इंग्रजांकडील अंतापूर शहर लुटले. ले ऑट्रमनला सेवारामाच्या बंदोबस्तासाठी पाठविले होते. त्यांनी सेवारामाला पकडले आणि माफही केले.
 • इ.स. १८३९ मध्ये खानदेशात तडवी भिल्लांनी उठाव केला.
 • इ.स. १८४६ मध्ये ‘जीवे वासवा‘ याने इंग्रजांशी संघर्ष सुरू केला. तो पकडला गेला. इंग्रजांनी त्याला प्रदीर्घ कारावासाची शिक्षा दिली.

कोळ्यांचा उठाव

 • भिल्ल व रामोशी यांच्यावर इंग्रजी राजवटीत कशी उपासमारीची वेळ आली तशीच या कोळी लोकांवरही आली. आपल्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही जमात इंग्रजांविरूद्ध संघर्षात उतरली.
 • रामजी भांगडियाने रामोशांचा आदर्श पुढे घेऊन इ.स. १८२८ मध्ये उठाव सुरू झाला. दोन वर्षापर्यत हा लढा चालू होता. इंग्रजी अधिकारी अलेक्झांडर मॅकिन्टॉश याने कोळ्यांचे बंड मोडून काढण्यात यश मिळविले. 
 • इ.स. १८४४ चा रघू व बापू भांगरे या दोन भावांचा उठाव गाजला. पुण्यातील सरकारी खजिने, कार्यालये व सरकारी बंगले यावर हल्ले करण्यात आले. इ.स. १८४५ साली कोळ्यांनी रामोशांची मदत घेतली. इ.स. १८४४ मध्ये इंग्रज अधिकाऱ्याने रघूला पकडले आणि फासावर लटकाविले.