1857 चा उठाव आणि महाराष्ट्र

१८५७ चा उठाव आणि महाराष्ट्र :

इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराबद्दल भातात अजूनही गैरसमज आहेत. हा उठाव उत्तर भारतात लखनौ, मीरत, कानपूर, झाशी, काल्पी, दिल्ली वगैरे शहरांपुरताच मर्यादित होता. भारताच्या इतर भागात उठावाची कोणाला फारशी कल्पनाही नव्हती. असंतुष्ट असलेल्या शिपायांनी काही काळ इंग्रजी सत्तेला अडचणीत आणले, पण लवकरच इंग्रजी सत्ता या धक्क्यातून सावरली आणि त्यांनी शिपयांचा पाडाव करून हा उठाव दडपून टाकला. पश्चिम व दक्षिण भारतात, तसेच पूर्वेकडे या उठावाचा प्रसार झाला नाही. इंग्रजी राज्यात शिपायांवर जे काही अन्याय होत होते त्यातून हे प्रकरण जन्माला आले. इतरत्र भारतीयांनी या उठावाला

फारसा प्रतिसाद दिला नाही असा गैरसमज निर्माण केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमार‘ हे पुस्तक लिहून नेमके सत्य काय आहे, हे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या उठावाने महाराष्ट्रातील लोकांना इंग्रज सत्तेच्या विरुद्ध पेटून उठण्यास भाग पाडले. फरक इतकाच की, काही लोकांनी शस्त्रे उचलली तर काहींनी शाब्दिक असंतोष प्रकट केला. महाराष्ट्रात इ.स. १८५७ च्या उठावाची प्रतिक्रिया म्हणून अनेक ठिकाणी जे उठाव झाले, त्यामध्ये कोल्हापूर, नािाक खानदेा, अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद व मुंबई या ाहरांचा प्रामुख्याने समावेा होतो.

१. रंगो बापूजींचा१८५७ मधील सहभाग :

रंगो बापूजींनी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहाचे गेलेले राज्य पतर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. इ.स. १८५४ साली ब्रिग्जने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उद्‌गार काढले होते की, ‘मिस्टर रंगो बापूरावांना गेली चोवीस वर्षे मी ओळखत आहे. तो गेली सात वर्षे आपल्या पदच्युत राजाचा वाजवी हक्कासाठी झगडत आहे. मालकाने सोपविलेली कामगिरी इतक्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणारा उमदा रंगो बापूजीशिवाय दुसरा मला आढळत नाही.‘ राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने रंगो बापूजी इंग्लंडला १५ वर्षे राहिले. परंतु काहीही उपयोग न झाल्यामुळे सन १८५४ ला भारतात परतले. त्यांनी भारतात परतताच स्वातंत्र्यासाठी जवलपास १५-२० ठिकारी गुप्त केंद्रे निर्माण केली. त्यामध्ये कोल्हापूर, पंढरपूर, फलटण, वाठार, बेळगाव, येणेवाडी, देऊर, वर्धनगड, आर्वी, कळंबी, कऱ्हाड, आरणे, अर्बुजगड, येकमुकी, जकातवाडी वगैरे ठिकाणी केंद्रे होती. रंगो बापूजीचे भोरपासून बेळगावापर्यंतच्या पट्ट्यात हिंदू, मांग,रामोशी आणि कोळी यांची भरती करून छुप्या सैन्याची निर्मिती केली. महाराष्ट्रात सर्वत्र हिंदू जनमानसात लोकप्रिय असलेल्या मित्रमंडळींशी, पाटील, देशमुख यांच्याशी त्यांनी विचारविनिमय केला होता. इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी शिपायांनी आपल्याच बांधवावर प्रतिहल्ला करू नये यासाठी त्यांना तटस्थ राहण्यास सांगण्यात आले होते. तसे वचन २२ व्या रेजिमेंटच्या सैनिकांकडून घेण्यात आले होते. सातारा, कोल्हापूर परिसरातील मातब्बरांचा या उठावाला पाठिंबा होता. सातारा आणि महाबळेश्वरला हे उठाव अगोदर घडतील, त्यात युरोपियन अधिकाऱ्यांना लक्ष करावयाचे, सरकारी खजिन्यावर हल्ले करनू ते लुटावयाचे, तुरुंगातील कैद्यांची सुटका करावयाची व सरकारी खजिन्यावर हल्ले करून ते लुटावयाचे, तुरुंगातील कैद्यांची सुटका करावयाची व त्यांचीही मदत घ्यावयाची अशी योजना तयार झाली होती. या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदुकीच्या गोळ्या व तोफेचे गोळे तयार करण्याचे कौशल्य उठावात भाग घेतलेल्यांनी संपादन केले होते. साताऱ्याचे दोन्ही राजपुत्र शाहू व व्यकोजी उठावाचे नेतृत्व करणार व निजामाकडून मोठी कुमक मदतीस येणार, अशा अफवाही लोकांमध्ये उठल्या होत्या. त्यामुळे सरकारही सतर्क झाले. जून १८५७ मध्ये सरकारने धरपकडीला सुरुवात केली. अटक झालेल्या भूमिगत नेत्यांची नावे सांगितली. रंगो बापूजींचा मुलगा व मेहुणा तसेच रामोशी व मांगाचे पुढारी बाबीया व येशा मांग यांना अटक झाली. आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्या. रंगोबापू भूमिगत झाले.

इ.स. १८५७ चा उठाव महाराष्ट्रात बराच मोठा होता. कोल्हापूरला उत्सव झाल्याबरोबर रत्नागिरीला असलेले ब्रिटिश सैन्य, अधिकारी घाबरले. शेवटी त्यांना मुंबईत आणून ठेवावे लागले. बेळगाव, कोल्हापूर व सातारा या तीन ठिकाणी असलेल्या राजवटींचा पाठिंबा मिळवून नवी माणसे तयार करून दारुगोळा व काडतुसे बनवून रंगोजींनी मोठ्या कौशल्याने सर्व तयारी केली परंतु त्यांचा हा प्रयत्नही फसला.

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: