हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे
सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.
हिमगव्हर/हिमगर्त/सर्क (Cirque)-
हिमनदी पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना तिच्या खनन कार्यामुळे पर्वताच्या उतारावर अर्धवर्तुळाकार खड्यांची निर्मिती होते. हे खड्डे एका बाजूने उघडे असतात, यांनाच हिमगव्हर/हिमगर्त/सर्क (Cirque) असे म्हणतात.
Dentren at English Wikipedia [CC BY-SA 3.0 or GFDL], via Wikimedia Commons‘यु’ आकाराची दरी (‘U’ shaped valley)-
हिमनदी ड्रीमधून वाहत असताना ती दरीच्या तळभागाची मोठ्या प्रमाणावर झीज करते. त्यामुळे पूर्वीची ‘व्ही’ आकाराची दरी तळभागात अधिक रुंद होऊन तिला ‘यु’ आकार प्राप्त होतो.
By DanHobley (Own work) [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commonsलोंबणारी दरी (Hanging Valley)-
मुख्य-हिमनदीला उप-हिमनद्या मिळतात त्याठिकाणी उप-हिमनद्या मुख्य-हिमनदीच्या तळापासून अधिक उंचीवर असतात. त्यामुळे उप-हिमनद्यांच्या दऱ्या मुख्य-हिमनदीवर लोंबताना दिसतात, त्यांनाच लोंबणाऱ्या दऱ्या (Hanging Valley) असे म्हणतात.
By Greg Willis from Denver, CO, usa [CC BY-SA 2.0], via Wikimedia Commonsगिरिशृंग (Horn)-
काही ठिकाणी पर्वत शिखराच्या अनेक बाजूंना हिमगव्हर/हिमगर्त/सर्क ची निर्मिती होते. त्यांचा विस्तार पर्वत शिखराकडे होत जाऊन ते परस्परांना मिळतात. त्यामुळे शिखराचा भाग शिंगाप्रमाणे उंच व टोकदार दिसू लागतो, यालाच गिरिशृंग (Horn) असे म्हणतात.
By Photo: chil, [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commonsदैत्यसोपान (Glacial Stairways)-
हिमनदी वाहत असताना तिच्या खननकार्याने प्रवाहमार्गात मोठ्या आकाराच्या पायऱ्यांची निर्मिती होते. या पायऱ्या पर्वताच्या कड्यांनी एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या असतात. यांनाच दैत्यसोपान (Glacial Stairways) असे म्हणतात.
By Walter Siegmund (Own work) [GFDL, CC-BY-SA-3.0 or CC BY 2.5], via Wikimedia Commonsमेषशिला (Roche Moutonnee)-
हिमनदीच्या मार्गात कठीण खडक किंवा अडथळा आल्यास त्या आपला मार्ग न बदलता अडथळ्यावर चढून वाहते. अशा छोट्या टेकड्यांना मेषशिला (Roche Moutonnee) असे म्हणतात.
By Jasmin Ros (Own work) [CC BY-SA 3.0], via Wikimedia Commonsशृंखला हिमगर्त (Tandem Cirque)-
हिमनदीने जोडलेल्या हिमगव्हर/हिमगर्त/सर्क यांच्या मालिकेला शृंखला हिमगर्त (Tandem Cirque) असे म्हणतात.
तळपात्र (Rock Basins)-
हिमनदीच्या तळभागावरील खडक झिजून खळग्यांची निर्मिती होते. यांनाच ‘तळपात्र’ (Rock Basins) असे म्हणतात.
शृंग व पुच्छ (Crag and Tail)-
हिमनदीच्या मार्गात बेसाल्टसारखा खडक आल्यास त्याचे अपक्षरण होत नाही, अशा खडकास शृंग (Crag) असे म्हणतात. मात्र हिमनदीच्या प्रवाहाभिमुख बाजूच्या खडकाची झीज होऊन प्रवाहाच्या दिशेत निक्षेपणाचे लांब भाग तयार होतात यांनाच पृच्छ (Tail) असे म्हणतात.
हिमखाडी (Fiord )-
हिमनदी समुद्रास मिळाली तरी तिचे पात्र जमिनीकडे भागात खोल व समुद्राकडील भागात उथळ असते. त्यामुळे समुद्राचे पाणी हिमनदीत शिरते. या भूरूपाला हिमखाडी (Fiord ) असे म्हणतात व अशा समुद्रकिनाऱ्याला फियॉर्ड किनारा असे म्हणतात.
By Ahmedherz (Own work) [CC BY-SA 4.0], via Wikimedia Commonsहिमनदीच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे
हिमोढ (Moraines)-
हिमनदीने आपल्याबरोबर वाहून आणलेल्या पदार्थांच्या निक्षेपणापासून जे ढीग तयार होतात त्यांना हिमोढ(Moraines) असे म्हणतात.
By Wilson44691 (Own work) [Public domain], via Wikimedia Commonsगाळाचे मैदान (Till Plain)-
द्वीपकल्पीय महानदीचे पीछेहाट होताना हिमनदीच्या मुखाजवळ बारीक गाळाचे निक्षेपण होऊन हिमानी गाळाचे मैदान (Till Plain) तयार होते.
हिमोढगिरी (Drumlins)-
हिमनदीच्या निक्षेपणामुळे तयार होणाऱ्या उलट्या बोटीच्या आकाराच्या टेकडयांना हिमोढगिरी (Drumlins) असे म्हणतात.
By Martin Groll (Aufnahme aus dem Zeppelin NT) [GFDL or CC BY 3.0 de], via Wikimedia Commons