हवामान

हवामान या शब्दामध्ये विस्तृत अर्थ आहे. ‘‘कोणत्याही ठिकाणच्या हवेचे सातत्याने अनेक वर्षे निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीची जी सरासरी काढली जाती त्याला हवामान असे म्हणतात.’’ कोणत्याही ठिकाणचे तापमान ठरविण्यासाठी तापमान आणि पर्जन्य या दोन घटकांना जास्त महत्त्व दिले जाते. एखाद्या ठिकाणचा ३० ते ४० वर्षे वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान निश्चित केले जाते. उदा. एखाद्या प्रदेशात सातत्याने अनेक वर्षे हवा थंड असेल तर तेथील हवामान शीत ठरविले जाते किंवा एखाद्या ठिकाणच्या हवेचे तापमान व आर्द्रता सातत्याने अनेक वर्षे जास्त आढळल्यास तेथील हवामान उष्ण दमट आहे असे म्हणतात. यावरून असे स्पष्ट होते की हवेच्या तुलनेत हवामान जास्त स्थिर स्वरूपाचे असते. पृथ्वीवर सर्वत्र हवामान एकसारखे आढळत नाही. प्रदेशानुसार त्यात फरक आढळतो. या फरकामुळेच हवामानाचे अनेक प्रकार आढळतात. उदा. कोरडे हवामान, उष्ण व दमट हवामान, शीत हवामान, भू मध्य सागरी हवामान इ. थोडक्यात ‘‘एखाद्या प्रदेशावरील वातावरणाच्या परिस्थितीचा अनेक वर्षे अभ्यास केल्यावर आढळणारी वातावणाची सर्वसाधारण स्थिती असते यास हवामान म्हणतात’’.

सूचना: संपूर्ण भूगोल अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.

हवामानावर परिणाम करणारे घटक :

कोणत्याही ठिकाणचे हवामान एका विशिष्ट घटकातून किंवा हवेच्या अंगामुळे निश्चित होत नाही तर त्याच्यावर अनेक घटकांचा एकत्रित प्रभाव पडतो त्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

अक्षांश :

विषुववृत्ताकडे म्हणजेच कमी अक्षांशावर वर्षभर सुर्यकिरणे लंबरूप पडत असतात तर ध्रुवीय प्रदेशाकडे म्हणजे उच्च अक्षांशाकडे ती तिरपी होत जातात. परिणामी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त उष्णता तर ध्रुवाकडे उष्णतेचे प्रमाण कमी कमी होत जाते. या उष्णतेुळे हवेच्या तापमानामध्ये फरक पडतो म्हणूनच विषुववृत्तापासून कर्क व मकरवृत्ता पर्यंत अक्षवृत्त उत्तर व दक्षिण) हवामान उष्ण बनते. मध्ये कटिबंधीय प्रदेशात (२३ उत्तर व दक्षिण अक्षवृत्त) ते मध्यम असते. तर ध्रुवीय प्रदेशात (६६० ते ९०० उत्तर व दक्षिण अक्षवृत्त) हवामान कमी उष्णतेुळे शीत बनले आहे.

समुद्रसपाटी पासून उंची :

वातावरण हे अप्रत्यक्षपणे सौरशक्तीमुळे भूपृष्ठापासून वरच्या दिशेने तापते. परिणामी भूपृष्ठाजवळ हवेचे तापमान जास्त असते तर भूपृष्ठापासून जास्त उंचीवर तापमान कमी कमी होत जाते. समुद्रसपाटी पासून जास्त उंचीवर हवा विरळ होत गेल्याने दर १६० मीटर उंचीला १० सें.ग्रेडने तापमान घटते. त्यामुळे अधिक उंचीवरील ठिकाणे ही थंड हवामानाची, आल्हादायक हवामानाची बनलेली आहेत. उदा. महाबळेश्वर, माथेरान, उटी, सिमला इ.

समुद्र सानिध्य :

जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या भिन्न गुणधर्माुळे समुद्र किनाऱ्या जवळील जमीनीवरील हवा जास्त तापून, हलकी होऊन वर निघुण जाते. तेथे तयार झालेली पोकळी भरून काढण्यासाठी समुद्रावरील थंड बाष्पायुक्त हवा तेथे येते. ही हवा जमीनीवरील तापमान वाढू देत नाही. तसेच ही हवा स्वत: बरोबर बाष्प वाहून आणते व जमीनी वरील हवेला ते पुरविते. त्यामुळे समुद्र किनाऱ्या लगत जमीनीवरील हवामान सम व दमट बनते. मात्र समुद्रापासून दूर खंडांतर्गत भागात हवा जास्त उष्ण व कोरडी राहून तेथील हवामान उष्ण व कोरडे बनते. उदा. समुद्र किनाऱ्या वरील मुंबईचे हवामान सम-दमट आहे तर तेथून दूर खंडांतर्गत भागात असलेल्या सोलापूरचे हवामान उष्ण व कोरडे आहे.

समुद्र प्रवाह :

समुद्रातून उष्ण व थंड पाण्याचे प्रवाह वाहत असतात. जर समुद्र किनाऱ्या जवळून उष्ण पाण्याचा प्रवाह वाहत असेल तर त्यावरील उष्ण किंवा उबदार हवा जमीनीकडे वाहत जाऊन जमिनीवरील हवेचे तापमान वाढविते त्यामुळे तेथील हवामान उबदार किंवा उष्ण बनते. याउलट थंड प्रवाह वाहत असल्यास त्यावरील थंड हवा जमीनीकडे वाहत जाऊन जमीनीवरील हवेचे तापमान कमी करते व तेथील हवामान थंड बनते उदा. लॅब्रॅडोर या थंड समुद्र प्रवाहामुळे न्यूफाउंडलँड किनाऱ्यावरील हवा फारच थंड झाली असून हवामान शीत बनले आहे. तर कॅनरी या शित प्रवाहामुळे सहाराच्या पश्चिम किणाऱ्यावरील हवा थंड व कोरडी बनली आहे.

प्रचलित वारे :

वारे ज्या प्रदेशातून वाहतात त्या प्रदेशाचे गुणधर्म आत्मसात करतात. परिणामी उष्ण प्रदेशातील वारे उष्ण तर थंड प्रदेशातील वारे थंड असतात. यांना प्रचलित वारे म्हणतात. जर उष्ण प्रदेशातील उष्ण वारे थंड प्रदेशाकडे वाहत गेल्यास ते त्या प्रदेशातील तापमान वाढवितात आणि थंड प्रदेशातील वारे उष्ण प्रदेशाकडे वाहत गेल्यास तेथील तापमान कमी करतात. या वाऱ्यांच्या गुणधर्माला अनुसरून त्या भागातील हवामान तयार होते. उदा. नॉर्वे ध्रुवाजवळ असूनसुध्दा पश्चिमी उष्ण वाऱ्यामुळे नॉर्वेचा किनारा गोठत नाही. तेथील हवामान उबदार बनते.

मेघाच्छादन :

आकाश सतत मेघाच्छादित राहिल्यास भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौरशक्तीत अडथळा येतो त्यामुळे भूपृष्ठ कमी तापून त्यावरील हवेचे तापमान कमी राहण्यास मदत होते. परिणामी हवामान सौम्य बनते. या उलट आकाश सतत निरभ्र रहात असल्यास पृथ्वीकडे येणाऱ्या व अवकाशाकडे परत जाणाऱ्या सौरशक्तीत कोणताही अडथळा येत नाही परिणामी हवा दिवसा जास्त व रात्री खूप थंड होऊन तेथील हवामान विषम प्रकारचे बनते उदा. सहाराचे हवामान.

वनस्पती :

वनस्पती दाटीवाटीने वाढलेल्या असल्यास वनस्पती सुर्यकिरणे जमीनी पर्यंत पोहचू देत नाहीत. त्यामुळे जमिनीला कमी उष्णता मिळून जमीन कमी तापते. परिणामी तेथील हवा सतत कमी तापमानाची राहून हवामान सौम्य बनण्यास मदत होते. तसेच वनस्पती श्वासोच्छावासातून सतत बाष्प बाहेर टाकतात. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून तेथील हवामान दमट बनण्यास मदत होते. याउलट परिस्थिती ओसाड प्रदेशात किंवा विरळ वनस्पतीच्या प्रदेशात आढळते.

प्रदेशाचा उतार :

दोन भिन्न उतारावर भिन्न प्रकारचे हवामान आढळते. त्याला सुर्याचे भासमान भ्रण कारणीभूत ठरते. सुर्याचे भासमान भ्रण होताना सुर्य उत्तर व दक्षिण दिशेत कर्क आणि मकर वृत्तापर्यंत जातो. त्यामुळे उत्तर-दक्षिण उतार असलेल्या भूप्रदेशात त्याच्या विषुववृत्तीय उताराला सौरशक्ती जास्त तर ध्रुवाकडील उताराला ती कमी मिळते. परिणामी त्या दोन्ही उतारावर भिन्न भिन्न प्रकारचे हवामान तयार होते. परिणामी विषुववृत्ताकडील उतार नेहमीच उबदार तर ध्रुवाकडील उतार थंड आढळतात.