स्वाधार

स्वाधार

  • २००१-०२ मध्ये या योजनेची सुरूवात केंद्रीय महिला व बालकल्याण मंञालयामार्फत झाली.
  • उद्दिष्टे– लाभार्थी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या निराधार महिलांना- १) प्राथमिक गरजा(अन्न, वस्ञ, निवारा, वैद्यकीय मदत) पुरविणे. २) त्यांना भावनिक आधार देणे. ३) त्यांना कायदेशीर मदत देणे तसेच त्यांना कुटुंबाशी व समाजाशी जुळवून घेण्यास समर्थ बनण्यासाठी माार्गदर्शन करणे. ४) त्यांचे आर्थिक व भावनिक पुर्नवसन करणे. ५) अडचणीत सापडलेल्या महिलांच्या विविध गरजा समजून घेणारी व सोडवणारी यंञणा म्हणुन काम करणे. ६) त्यांना प्रतिष्ठेने व दृढनिश्चयाने नव्याने आयु्ष्य सुरू करण्यास समर्थ बनविणे.
  • या योजनेचे लाभार्थी १८ वर्षे वयावरील १) सामाजिक व आर्थिक दृष्ट्या निराधार स्ञिया २) नैसर्गिक आपत्तीतून, दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या महिला ज्या  सामाजिक व आर्थिक दृष्ट्या निराधार आहेत ३) तुरुंगातून सुटलेल्या महिला कैदी ज्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या निराधार आहेत. ४) घरगुती हिंसाचारास बळी पडलेल्या महिला ज्यांना घराबाहेर काढले आहे ५) ह्युमन ट्राफिकिंग ला बळी पडलेल्या तसेच वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या महिला

घरगुती हिंसाचारास बळी पडलेल्या महिला स्वाधार गृहात १ वर्षापर्यंत राहू शकतात. आणी इतर ३ वर्षापर्यंत राहू शकतात. महिलांसोबत असणारे त्यांची मुलेदेखील स्वाधार गृहात राहू शकतात( मुले ८ वर्षे वयापर्यंत व मुली १८ वर्षे वयापर्यंत).

 


ही योजना मुख्यत्वेकरून NGOs मार्फत राबवली जाते.

Leave a Reply