- स्वजल योजनेची सुरूवात राजस्थानमधील भिकमपुरा या गावामध्ये झाली आहे.
- निरंतर पेयजल पुरवठ्यासाठी स्वाजल हे समुदायिक मालकीचा असणारा हा पेयजल कार्यक्रम आहे.
- या प्रकल्पाच्या खर्चाची विभागणी ९० टक्के सरकारद्वारे व १० टक्के खर्च समुदायाद्वारे अशी करण्यात आली आहे.
- वर्षभर प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पेय पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच या प्रकल्पातून रोजगारही निर्माण करण्याचे उद्दिष्ट या योजनेमागे आहे.