स्त्री उद्धारासाठी समाज सुधारकांचे योगदान

इंग्रजांनी संपूर्ण भारतात इंग्रजी शिक्षण सुरु केले. या इंग्रजी शिक्षणामुळे व आधुनिक विचारसरणीमुळे भारतात एक सक्षम अशी समाजसुधारकांची पिढी निर्माण झाली. या सर्वांनी समाजसुधारणेचे एक महत्त्वपूर्ण अंग म्हणून स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतलेले होते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच भारतीय स्त्री उद्धाराचे कार्य पूर्ण होऊ शकले असे म्हणता येईल. या स्त्री उद्धारक समाजसुधारकांचे कार्य विस्तृतपणे पुढीलप्रमाणे अभ्यासता येईल.

राजाराम मोहनरॉय यांचे स्त्री उद्धाराचे कार्य :

हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ करणारे व थोर समाज सुधारक व त्यातही स्त्रियांच्‌या उद्‌धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य राजाराम मोहन रॉय यांनी केलेले होते. राजाराम मोहन रॉय यांनी ‘‘ब्राम्होसमाज‘‘ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या उद्‌धाराचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले होते.

राजाराम मोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राधानगर येथे २२ मे १७७२ मध्ये झाला. प्रतिभाशाली असलेल्या राजाराम मोहन रॉय यांनी धर्मसुधारणा व सामाजिक सुधारणा चळवळीसाठी १८२८ मध्ये ब्राम्होसमाजाची स्थापना केली. समाजसुधारणा चळवळीचे कार्य करीत असतानाच अत्यंत महत्त्वपूर्ण व त्यांच्या मनाला अतिशय वेदना देणारी घटना घडली. राजाराम मोहन रॉय यांचे मोठे बंधू जगमोहन यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी अलकमंजिरी सती गेली. ‘सती‘ पद्धतीचा बळी त्यांच्या वहिनीच्या रूपाने प्रत्यक्ष अनुभवला त्यानंतर या प्रथेच्या विरोधात त्यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. इंग्रज शासन कर्त्यांना ही पद्धत किती अमानुष आहे हे पटवून दिले व त्यानंतर गव्हर्नर जनरल बेंटिग यांनी सती पद्धतीच्या विरोधात कायदा केला. राजाराम मोहन रॉय यांनी स्त्रियांना देखील पुरुषांइतकाच शिक्षणाचा अधिकार बहाल करावा अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर स्त्रियांना देखील वडीलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मा. ज्योतिबा फुले यांचे स्त्री उद्धाराचे कार्य :

सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून मा. ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते ऐवढे महत्त्वपूर्ण समाज सुधारणेचे कार्य त्यांनी केलेले होते. जातियता, अस्पृश्यता याविरुद्ध त्यांनी प्रखर लदा उभारला होता आणि तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा प्रखर लढा त्यांनी स्त्री उद्धारणेसाठी उभारला होता. कारण स्त्रियांना वगळून समाजसुधारणा होणे अशक्य हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी स्त्री उद्धारासाठी भरीव कार्य केलेले होते. शिक्षण हे समाजसुधारणेसाठी व त्याचबरोबर स्त्री उद्धारासाठी अतिआवश्यक आहे हे ओळखून त्यांनी ऑगस्ट १९४८ मध्ये खास मुलींकरीता पुण्यात शाळा काढली. या शाळेत मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करुन तेथे शिक्षक म्हणून नेमले. स्त्रियांना शिक्षण देणे ही गोष्ट सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना रुचली नाही. मुलींचे शिक्षण म्हणजे समाजद्रोह व धर्मद्रोह असे ते मानू लागले व त्यामुळे त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवू नये म्हणून त्रास दिला. परंतु मा. ज्योतिबा फुले यांची त्यांना पूर्णतः साथ होती म्हणूनच शेवटी सनातनीच नामोहरय झाले. मा. ज्योतिबा फुले यांनी या कार्यापासूनच परावृत्त व्हावे म्हणून त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले परंतु तरीही ते आपल्या कार्यापासून तसूभरही मागे सरले नव्हते. १८४८ मधील काढलेली शाळा बंद पडली तरीही ते डगमगले नाहीत. त्यानंतर त्यांनी इ. स. १८५१ मध्ये पुण्यात बुधवारपेठेत मुलींची दुसरी शाळा काढली. त्या काळी ब्राम्हण समाजातील व इतर उच्च जातीतील विधवा स्त्रियांचे जीवन अतिशय अंधारमय असे. त्या स्त्रियांना संपूर्ण त्यांच्या हयातीत उपेक्षितांचे जीवन कंठावे लागे, स्त्रियांचे हे हाल थांबवेत. त्यांना देखील पुरुषाप्रमाणे सन्मानाने जगता यावे म्हणून मा. ज्योतिबा फुले यांनी खंबीरपणे विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी इ. स. १८६४ मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता. मुलींचे लहानपणीच लग्न केले जात होते. त्या काळी अनेक साथीचे आजार असत. आजच्या सारखी प्रभावी वैद्यकीय सुविधा नव्हती. अशातच मुलीचा पती मेल्यानंतर तिला संपूर्ण जीवन विधवा म्हणून कंठावे लागत होते. अशातच कधी काळी विधवेचे चुकून वाकडे पाऊल पडले तर तिला भ्रुणहत्या किंवा आत्महत्याशिवाय पर्याय नव्हता. अशा आपत्तीपासून विधवांची सुटका व्हावी म्हणून ज्योतिबांनी विधवांना गुप्तपणे येऊन बाळंतपणासाठी व आपले मुल तेथे ठेवण्यासाठी बालहत्या प्रतिबंधगृह आपल्या घराशेजारी उघडले. त्या संदर्भात सर्वत्र भित्तीपत्रके वाटण्यात आली. त्यात असे म्हटले होते की, विधवांनो, येथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मुल न्यावे किंवा ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे. त्या मुलांची काळजी हा अनाथश्रम घेईल. विधवांना आणि विशेषतः अशा संकटात सापडलेल्या विधवांना मा. ज्योतिबा फुले यांची फार मोलाची मदत मिळाली होती हे सिद्ध होते. स्त्रियांच्या उद्धारासाठी मा. ज्योतिबा फुले यांचे हे कार्य अद्वितिय असे होते.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे स्त्री उद्धाराचे कार्य :

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्त्री उद्धारासाठी विशेष कार्य केले होते. त्यांच्या वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांची पत्नी राधाबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपला मित्र नरहर बाळकृष्ण जोशी यांची विधवा बहीण गोदूबाई जोशीबरोबर विवाह केला. इ. स. १८९३ मध्ये वर्धा येथे त्यांनी विधवा पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. विधवांची या ठिकाणी नोंदणी करुन त्यांचे पुनर्विवाह घडवून आणण्याचे कार्य या मंडळामार्फत केले जात होते. इ. स. १४ जून १८९६ रोजी पुण्याजवळील हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. अनाथ बालिकांचे पालनपोषण व शिक्षण या आश्रयामार्फत केले जात होते. मुलींना शिक्षण देण्यासाठी ४ मार्च १९०७ रोजी पुणे येथे मुलींसाठी खास शाळा स्थापन केली. इ. स. १९१५ च्या मुंबई येथील सामाजिक परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठाची आवश्यकता प्रकट केली. या त्यांच्या विचारावर अनेक सनातनवाद्यांनी टीका केली. परंतु ते आपल्या विचारावर ठाम राहिले. त्यानंतर इ. स. १९१६ मध्ये अवघ्या पाच विद्यार्थ्यींनीच्या नोंदणीसह त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठास आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती व ते पाठबळ प्रसिद्ध उद्योगपती ठाकरसी यांनी देण्याचे मान्य केले आणि मग १५ लाख रुपयांच्या विद्यापीठाला देणगी देण्याच्या मोबदल्यात या महिला विद्यापीठास या उद्योगपतीच्या मातोश्री “श्रीमती नधीबाई दामोदर ठाकरसी (एऱ्ऊ)” हे नाव देण्यात आले. स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यात शाळा काढल्या. स्त्रियांच्या उद्धारासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होते असे म्हणता येईल.

पंडीता रमाबाई यांचे स्त्री उद्धाराचे कार्य :

पंडीता रमाबाई यांनी स्त्री उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८५८ रोजी चित्तपावन ब्राम्हण कुटुंबात कर्नाटक येथे झाला होता. त्यांच्या वडीलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे होते तर आईचे नाव लक्ष्मीबाई उर्फ अंबाबाई होते. इ. स. १८७७ च्या दुष्काळात त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले. अशा खडतर प्रसंगीदेखील त्या डगमगल्या नाहीत तर त्यांनी आपला भाऊ श्रीनिवास याचे समवेत कलकत्ता येथे आल्या. त्यांच्या विद्वतेने प्रभावित होऊन त्यांना पंडिता ही पदवी तेथील बंगाली लोकांनी बहाल केली. रमाबाई यांनी संपूर्ण भारतभर दौरे करुन भारतातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेची जवळून पाटणी केली आणि त्या अवस्थेची त्यांनी जाहीरपणे टीका करुन स्त्रियांनादेखील शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. बालविवाह बंद पाडते पाहिजेत. विधवाविवाह घडवून आणले पाहिजेत असे विचार आपल्या भाषणातून त्यांनी मांडले होते. स्त्रियांच्या उद्धारासाठी रमाबाई यांनी इ. स. १८८२ मध्ये पुणे येथे “आर्य महिला समिती”ची स्थापना केली. या समितीच्या शाखा मुंबई आणि इतर भागात देखील स्थापन करण्यात आल्या. त्यांनी आपली मुलगी मनोरमा समवेत ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला. इंग्लंडमध्ये त्यांनी संस्कृत विषयाची अध्यापिका म्हणून कार्य केले. नंतर त्या अमेरिकेत गेल्या. रमाबार्इंनी अमेरिकेत ठिकठिकाणी व्याख्याने देऊन भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी निधी गोळा केला. भारतात आल्यावर रमाबाईनी मुंबई येथे ११ मार्च १८८९ रोजी “शारदा सदन” नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत निराश्रित विधवा व अनाथ स्त्रिया यांच्या राहण्या-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे या स्त्रियांना शिक्षण देण्याची व्यवस्थाही शारदा सदनने केली होती. गोदुताई जोशी ही शारदा सदनमध्ये प्रवेश घेतलेली पहिली बालविधवा होती. याच गोदूबाई जोशीबरोबर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विवाह केला होता. त्याचबरोबर ख्रिश्चन मुलींसाठी त्यांनी “मुक्ती मिशन” नावाची संस्था स्थापन केली. समाजातील निराश्रित स्त्रियांसाठी त्यांनी कृपासदन नावाची संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे मुलांसाठी त्यांनी सदानंदसदन नावाचा अनाथाश्रम काढला होता. त्याचबरोबर प्रौढ व वृद्ध महिलांच्या संगोपनासाठी शांतीसदन नावाचा आश्रम त्यांनी स्थापन केला होता. स्त्रियांचा उद्धार करणे हेच रमाबाईचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. समाजातील बालिका, वृद्ध, निराश्रित जवळपास सर्व वयोगटाच्या व सर्व समस्यांच्या पीडित स्त्रियांच्या उद्धारासाठी रमाबाई यांनी अविरत प्रयत्न केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. ऑक्टोबर १९४८ मध्ये त्यांनी हिंदू संहिता तपासून आणि सुधारुन घटना समितीच्या विधिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडली. हिंदू कायद्याची सुधारणा करुन ते एकाच संहितेत एकत्र आणण्याचे काम दहा वर्षापासून चालू होते. हे विधेयक लोकसभेत स्विकृत केले गेले नाही तर आपले सरकार राजीनामा देईल असे पंडित नेहरुंनी जाहिर केले. याउलट सरदार पटेल यांनी विधेयकाला विरोध केला. अशा स्थितीत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी बाबासाहेबांनी हिंदू संहिता विधेयक लोकसभेत मांडले. पंडित नेहरुंनी प्रारंभी पाठिंबा दिला असला तरी शेवटी तेही आपल्या निर्णयाशी ठाम राहिले नाहीत. परिणामी हे विधेयक लोकसभेत पास झाले नाही. त्यामुळे दुःखी होऊन बाबासाहेबांनी ११ ऑक्टोबर १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. या बिलामुळे स्त्रियांना पुढीलप्रमाणे अधिकाराची तरतूद होती.

१) स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, पोटगीचा अधिकार.

२) प्रथम पत्नी असताना दुसरी पत्नी करण्यास मनाई.

३) दत्तक घेण्याचा अधिकार असणे.

४) स्वतःचा वर निश्चित करण्याचा अधिकार इत्यादी अधिकार स्त्रियांना मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रयत्न केले.

****

 

*****************************************************************************************************************************************************************************************************************************

 

स्त्री मुक्तीसाठी कार्य करणारे सुधारक :

१८१८ला पेशवाई संपुष्ठात आली. ब्रिटिशांची सत्ता निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात एलफिन्स्टन, माल्कम सारखे सुधारणावादी अधिकारी असल्याने समाजाचा विश्वास संपादन करुन आपले शासन स्थिर करण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. शिक्षणाच्या प्रसारामुळे नवशिक्षित पिढी उदयास आली. त्यांनी आपल्या सामाजिक व धार्मिक जीवनाकडे लक्ष दिले. त्यामुळे सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी सुरु झाल्या. या समाज सुधारकांनी आपल्या लेखणी व विचारातून समाज परिवर्तन करण्यास सुरुवात केली. नवशिक्षितांनी ब्रिटीश प्रशासनामुळे उपलब्ध झालेल्या मुद्रणकला व विचार स्वातंत्र्याचा वापर करुन वृत्तपत्रे सुरु केली. त्यातून अंधश्रध्दा, कर्मकांड, रुढी, परंपरा याविरुध्द टिका करण्याबरोबर समाजाला नवविचार देण्याचे काम केले. आपल्या पुस्तकातून स्त्रियांच्या समस्या, विधवांची दयनिय अवस्था अस्पृशावरील बंधने यावर टिका करतानाच समाजासाठी कोणत्या सुधारणा होणे आवश्यक आहेत हे माहित झाले. त्यासाठी नवीन संघटना स्थापन केल्या. शिक्षण संस्था स्थापन करणे. विधवांचे पुनर्विवाह करणे सतीप्रथेविरुध्द लढा देणे. यासारख्या कार्याला चालना दिली. यासाठी खालील सुधारकांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.

अ) महात्मा जोतिबा फुले :-

महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण व स्त्रीमुक्ती चळवळीचे आग्रणी म्हणून जोतिबांना ओळखले जाते. जोतिबा फुले यांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी फार प्रयत्न केले. त्यावेळच्या समाजात विषमता, जातीभेद, अज्ञान, स्त्रीदास्य यासारख्या अनिष्टप्रथा केवळ धर्माुळे समाजात वाढल्या होत्या. असे त्यांचे मत होते. महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण व स्त्रीमुक्ती चळवळीचे आग्रणी म्हणून जोतिबांना ओळखले जाते. जोतिबा फुले यांनी समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी फार प्रयत्न केले. त्यांनी सर्व बाबींचा विचार करुन प्रथम स्त्रियांच्या उध्दाराचे कार्य हाती घेतले. हिंदू स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याच्या इतर जाचक रुढी परंपरेतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देवून सुधारणाच्या कामाला सुरुवात केली म्हणून त्यांना स्त्रियांचा उध्दारकर्ता म्हटले जाते. भारतीय समाजाने स्त्रियांना शिक्षणापासून व समतेपासून वंचित ठेवले होते. शिक्षण हे व्यक्तीचे जीवन विकसित करण्यासाठी प्रमुख साधन आहे असे जोतिबांचे मत होते. शिक्षणामुळे मानवात स्वाभिमान निर्माण होतो. सत्य असल्याची माहिती होते. स्त्रीवर जी अनेक बंधने होती त्यामुळे त्या काळात समाजाच्या स्त्रीबाबतच्या अपेक्षा अन्यायी व पक्षपातीपणाच्याच होत्या. प्रचलित चालीरितीमुळे स्त्रियांची दैन्यावस्था झाली होती. समाजाने अनेक बंधनांनी स्त्रियांना बांधून ठेवले होते. त्याचे सर्व हक्क डावलले होते. समानता व मानवतेच्या भुमिकेतून त्याचेकडे पाहिले जात नव्हते. अशावेळी महात्मा फुल्यांनी स्त्रियांच्या उध्दाराचे कार्य हाती घेतले. त्यासाठी फार कष्टही घेतले व सहन केले. स्त्री ही समाजाचे मुळ आहे असे समजून स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, बालहत्या प्रतिबंध, केशवपन यासारख्या महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर भरीव कार्य केले.

 

१) स्त्री शिक्षण :

या काळात सनातनी लोकांच्या मते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना शिक्षण देणे म्हणजे धर्म बुडविणेसारखे आहे. स्त्रिला शिक्षण दिले तर ती कुमार्गाला लागेल आणि घरातील सुख शांती नष्ट होईल तसेच मुलीनी शिक्षण घेतले तर अकाली वैधव्य येईल अशा खुळचट कल्पना अस्तित्वात होत्या. सनातन्यांच्या आक्षेपांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोतिबांनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले स्त्री शिक्षण म्हणजे तिच्या मुलाचे शिक्षण. आपण जर एका पुरुषाला शिक्षण दिले तर एकट्याापुरते रहाते. मात्र जर एका स्त्रिला शिक्षण दिले तर ते सर्व कुटुंबाला दिल्यासारखे आहे. हे ओळखून जोतिबांनी स्त्रि शिक्षणाचा प्रारंभ केला. त्यावेळी पुण्यात स्त्रियांच्या शिक्षणाची सोय नव्हती. अशा काळात जोतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींच्यासाठी एक शाळा सुरु केली. अस्पृश्य समाजातील स्त्रियांना तेथे शिक्षण दिले जात होते. त्याशाळेत जोतिबा स्वत: शिक्षकाचे काम करत होते. मुलींच्यासाठी शाळा काढणारे ते पहिले भारतीय होते. मुलींना शिकणेसाठी शिक्षिका मिळेना म्हणून जोतिबांनी आपली पत्नी सावित्रीबाईना शिकवून शिक्षिका म्हणून नेले. सनानत्यांना ही गोष्ट धर्मद्रोही वाटली. समाजात संतापाची लाट आली. सनानत्यांनी सावित्रीबाईना शाळेत जाता-येताना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावर चिखल फेकणे, घाण टाकणे, दगड मारणे, अपशब्द वापरणे अशा मार्गाने त्यांना त्रास दिला जात होता. परंतु या माऊलीने हा त्रास सहन करुन आपले कार्य चालूच ठेवले. सनातन्यांनी चिडून सावित्रीबाईच्या सासऱ्याचे (गोविंदरावाचे) कान भरुन आपले सुनेचे हे काम योग्य नव्हे समाज विरोधी आहे. त्यामुळे गोविंदरावांनी जोतिबाला एकतर घर सोडा किंवा सावित्रीबाईना शिक्षिका म्हणून काम करणेस बंदी घाला अशी सुचना केली. जोतिबांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु आपला सुधारणेचा मार्ग सोडला नाही. अशा अडचणीच्या वेळीही जोतिबा फुले डगमगले नाहीत. त्यांनी आपले कार्य नेटाने चालू ठेवले. जोतिबांनी इ.स.१८५१ मध्ये बुधवार पेठेत दुसरी शाळा सुरु केली. तर १८५१मध्येच रास्ता पेठेत तिसरी व १८५२ मध्ये वेताळ पेठेत चौथी मुलींची शाळा सुरु केली. या कार्याला व्यवस्थित स्वरुप प्राप्त व्हावे. म्हणून जोतिबांनी आपल्या मित्रांच्या मदतीने एक कार्यकारी समिती स्थापन केली. त्यात मान्यवर व्यक्तीचा सहभाग होता. त्यांच्या कार्याला युरोपियन व काही स्थानिक लोकांनी सर्व प्रकारचे सहकार्य केले. सरकारनेही यथाशक्ती मदत केली. महात्मा जोतिबांनी स्त्री शिक्षणाला महाराष्ट्रात एक वेगळी दिशा दिली.

 

२) विधवा पुनर्विवाह :

जोतिबा फुले ब्राम्हणद्वेष्टे होते असे म्हटले जाते. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास त्याचे मन व्याकूळ होत असे. त्याकाळी ब्राम्हण समाजात विधवांचे फार हाल होत हे पाहून त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याचे हाल थांबावेत त्यांच्या जीवनाला चांगले वळण लागावे म्हणून जोतिबांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. त्याच्यासाठी इ.स.१८६४ मध्ये गोखले बागेत एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला.

 

३) बालहत्या प्रतिबंधक गृह :

महात्मा फुलेनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला असला तरी त्यांना समाजात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बालपणीच स्त्रियांचे विवाह होत असल्याने समाजात कुमारी अथवा बालविधवाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे अशा विधवेचे चुकून वाकडे पाऊल पडले तर संतती निर्माण होत असे. बऱ्याच वेळा अनैतिक संबंधातून बाल विधवा गरोदर राहत. अशा वेळी समाजापासून स्वत:ला वाचविण्यासाठी गरोदर विधवा व जन्माला येणाऱ्या बाळाची हत्या करत असत. अशा स्त्रियांची समाजात विटंबना होवून छळ होत असे. तेव्हा अशा आपत्तीतून विधवाची सुटका व्हावी म्हणून जोतिबांनी विधवांना गुप्त येऊन बाळंत होण्यासाठी १८६३ मध्ये आपल्या घराजवळ बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी भित्तीपत्रके वाटण्यात आली. त्यात ‘‘विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मुल बरोबर न्यावे किंवा इथेच ठेवावे त्या मुलाची काळजी ही अनाथाश्रम घेईल’’ जोतिबांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह हे भारतातील पहिलेच होते. या उपक्रमावरुन सामाजिक व खास करुन स्त्रियांच्या प्रश्नाबाबत त्यांची दूरदृष्टी दिसून येते. अशा मुलाची सर्व सेवा करण्याचे काम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले. जोतिबांना मुलबाळ नव्हते. त्यांनी दुसरे लग्न करावे असा वडिलांचा व मित्रांचा आग्रह होता. मुल होत नाही म्हणून दुसरे लग्न करणे ही अत्यंत निष्ठूर चाल आहे. असे त्यांचे मत होते. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. उलट काशीबाई या ब्राम्हण विधवेचा बालहत्या प्रतिबंधक गृहातील मुलगा १८६५ साली दत्तक घेतला. यशवंत असे त्याचे नाव होते. हाच पुत्र डॉ.यशवंत फुले होय. महात्मा फुले व सावित्रीबाईच्या कार्याचा प्रभाव लोकहिवादी, लाल शंकर, उमा शंकर आणि न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर पडला. त्यांनी जोतिबांच्या कार्यास पाठिंबा दिला. त्यांनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.

४) बहुपत्नित्वाला विरोध :

फुलेच्या काळात बहुपत्नित्वाची पध्दत प्रचलित होती. ब्राम्हण व श्रीमंत लोक एकापेक्षा अनेक बायका करत. स्त्री व पुरुष समान आहेत असे त्यांचे मत होते. म्हणून बहुपत्नित्वाची पध्दत स्त्रियावरील अन्याय आहे. असे फुलेना वाटत होते. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करणे निदंनिय प्रकार आहे असे फुलेना वाटत होते. ते म्हणतात पुरुषांना जास्त बायका करण्याचा अधिकार आहे. तर मग स्त्रियांनी एकापेक्षा जास्त नवरे केल्यास चुकीचे होणार नाही. ही गोष्ट पुरुषांना सहन होणार नसेल तर स्त्रियांनी तरी का सहन करावे. हा महात्मा फुलेंचा प्रश्न होता. जास्त लग्न करण्यामागे पहिल्या बायकोपासून मुल होत नाही म्हणून काही पुरुष जास्तीत जास्त सुख मिळविण्यासाठी आपल्या कामवासना पूर्ण करण्यासाठी २-२, ३-३ बायका करत. हिच भुीका स्त्रियांनी स्विकारली तर पुरुषांना काही विधिनिषेध वाटणार नाही का? त्यामुळे महात्मा फुले यांनी बहुपत्नित्वास विरोध केला. याबरोबरच बालविवाह, जरठ विवाह, केशवपन, सतीप्रथा, वाघ्या व मुरळी सारख्या अनेक अनिष्ट प्रथा समाजात प्रचलित होत्या. त्या विरोधात महात्मा फुले व त्यांच्या अनुयायांनी चळवळी सुरु केल्या. त्यामुळेच त्यांना स्त्रियांचे कैवारी समजले जाते. महात्मा फुलेनी केलेले स्त्रियासाठीचे कार्य सामाजिक जीवनातील एक युगप्रवर्तक कार्य ठरले.

अ) महर्षी धोंडो केशव कर्वे :

महर्षी कर्वे हे स्त्री शिक्षणाचे आणि उध्दाराचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षण व त्यांच्या भल्यासाठीच विचार व कार्य केले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील ते आघाडीचे समाज सुधारक होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी विविध कामे केली. इ.स.१८८४ पासून १८८८ पर्यंत मुंबईत शालेय शिकवण्या घेण्याचे काम केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी न करता एल्फीन्सटन हायस्कूल मुंबई येथे शिक्षकाची नोकरी केली. सोण गुरुजीमुळे ते समाज सुधारणेकडे वळले. नोकरी करत असताना त्यांचा इतर समाज सुधारकांबरोबर संबंध आला. इ.स.१९१४ पर्यत कॉलेजात प्राध्यापक म्हणून कार्य केले. याकाळात रानडे, गोखले, आगरकर यांच्या कार्याचा त्याच्या मनावर ठसा उमटला. याच दरम्यानच्या काळात त्यांच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली ती म्हणजे त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी शारदा सदन मधील एका विधवेशी लग्न केले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला हीच घटना त्यांच्या जीवनात क्रांतीकारक ठरली. म्हणजेच कर्वेनी त्यानंतर स्त्रीमुक्तीसाठी आयुष्यभर कार्य करण्याचे ठरविले. अनाथाश्रम, महिला विद्यालय, महिला विद्यापीठ यासारख्या अनेक संस्था स्थापन करुन स्त्री मुक्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.

१) विधवेशी विवाह १८९३ :

त्याकाळात बाल विवाह प्रचलित असलेने कर्वेचा विवाहसुध्दा १८७३ मध्ये १५व्या वर्षी झाला होता. पत्नी राधाबाई ९ वर्षाच्या होत्या. दुर्दैवाने राधाबाईचा १८९१ मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी पंडिता रमाबाईच्या मुंबई येथील शारदा आश्रमात ४ वर्ष वास्तव्यास असलेल्या २८ वर्ष वयाच्या गोदूबाई नावाच्या विधवा स्त्रीबरोबर पुनर्विवाह करुन नवीन आदर्श निर्माण केला. पुढे गोदूबाईचे नाव आनंदीबाई असे ठेवले. या घटनेचा परिणाम म्हणून समाजात खळबळ उडाली. कर्वेनी सामाजिक चालीरितीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. आगरकरांच्या उपस्थित कर्वे व गोदूबाईचा झालेला पुनर्विवाह हा पहिलाच पुनर्विवाह होता. या पती पत्नीस आगरकरांनी जेवणास बोलावले होते ही घटना समाजाला प्रचंड धक्का देणारी ठरली.

विधवा विवाहोत्तेजक मंडळी :

महर्षी कर्वे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. विधवा स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचाराने त्यांचे मन कळवळत असे. त्याचा परिणाम म्हणून इ.स.१८९३साली विदर्भातील वर्धा या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्‌देश खालील प्रमाणे –

१. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह घडवून आणणे.

२. पुनर्विवाह केलेल्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे.

३. पुनर्विवाहित कुटुंबाचे मेळावे आयोजित करणे.

४. पुनर्विवाहाच्या बाबतीत जनमत तयार करणे.

५. पुनर्विवाह बाबत समाजात जागृती करणेसाठी प्रचार दौरे काढणे भाषणे देणे.

६. पुनर्विवाह करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत करणे.

वरील उदि्‌दष्ट पुर्तीसाठी महर्षि कर्वेनी अविरत कार्य केले. इ.स.१८९४ मध्ये आपल्या घरी पुण्यात पुनर्विवाहित कुटुंबाचा मेळावा घेतला. इ.स.१८९५ मध्ये त्यांनी विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेचे नांव विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असे बदलले. त्याचे चिटणीस म्हणून १८९९ पर्यत काम केले. या कामाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर दौरे केले.

अनाथ बालिकाश्रम :

महर्षी कर्वेनी विधवा विवाहाची चळवळ सुरु केली. त्याला म्हणावे तितके यश मिळाले नाही. त्यामुळे विधवांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी १४ जून १८९६ रोजी पुण्यातील सदाशिव पेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्याात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. प्लेगच्या साथीच्या वेळी ही संस्था हिंगणे येथे स्थलांतरित केली होती. या संस्थेचे उद्‌देश-

१. विधवा स्त्रियांना शिक्षण देवून स्वावलंबी करणे.

२. विधवाच्या विचारात व मनोवृत्तीत बदल करणे.

३. विधवाची दु:खे हलके करण्यासाठी प्रयत्न करणे.

४. आपले जीवन निरर्थक नसून आपणासही एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. याची जाणीव स्त्रियांना करुन देण्याचा प्रयत्न करणे.

त्यांच्या या आश्रमाचे काम संथगतीने वाढत होते. १९०५ पासून कर्वे यांचा आश्रम फारच लोकप्रिय झाला.

 

महिला विद्यालयाची स्थापना :

महिलांचा विकास व्हावा त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी कर्वे यांनी इ.स.१९०७ मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालय सुरु केले. १९१२ पासून निवासी महिला विद्यालय झाले. या विद्यालयात विधवा आणि कुमारिकांनाही शिक्षण दिले जात होते. या शिक्षणातून स्त्रियांना एक चांगली माता व चांगली पत्नी होण्यासाठीची पात्रता निर्माण करणारे शिक्षण दिले जात होते. यासाठी हे एक पवित्र कर्तव्य आहे असे समजून त्यांनी जीवनभर स्त्रियांच्या भल्यासाठी काम केले.

 

निष्काम कर्मठ :

महर्षी कर्वे यांनी इ.स.१९०८ मध्ये निष्काम कर्मठाची स्थापना केली. स्त्रियांची सेवा करणे. स्त्रीयांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे व कार्यकर्त्या मुली तयार करणे हे या मठाचे उद्‌देश होते. लोकसेवेसाठी निष्काम वृत्तीनी तन,मन,धन अर्पण करणारा संघ निर्माण करुन त्याचा विस्तार करणे. या मठात सहभागी होणाऱ्यांना एक प्रतिष्ठा द्याावी लागत असे. ‘‘माझे स्वत:चे जेजे काही आहे. त्यावरील सर्व हक्क मी सोडून देत आहे. मी या मठाचा सेवक झालो असून माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी मठाने केलेली तरतूद मला मान्य आहे.’’ कर्वेनी सुरु केलेल्या कार्यासाठी निस्वार्थी लोकांची गरज होती. ती या माध्यमाने मिळवण्याचा प्रयत्न केला.

महिला विद्यापीठाची स्थापना :

स्त्रियामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हे पवित्र असे देशकार्य आणि धर्मकार्य आहे असे कर्वेचे मत होते. त्यामुळे स्त्रियांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ असावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी ३ जून १९१६साली महिला विद्यापीठ सुरु केले. या विद्यापीठाचे उद्‌देश पुढीलप्रमाणे होत.

१. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.

२. स्त्रियांना स्वावलंबी, स्वाभिमानी व स्वकर्तृत्वान बनविणे.

३. स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक गोष्टींचा अभ्यास करुन तिच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल घडवून देणे.

४. इंग्रजीचे महत्व ओळखून इंग्रजीचे अध्यापनही सुरु ठेवणे.

५. स्त्रियांच्या सर्वांगिण विकासासाठी गृहजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र यासारखे विषय आवश्यक करण्यात आले.

स्त्रियांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेवून महिला विद्यापीठात त्याप्रमाणे सोई सवलती उपलब्ध करण्यात आल्या. विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी प्राधान्य तर इंग्रजीला दुय्यम स्थान असे. सरकारचे सहाय्य न घेता मुंबई, मद्रास, बंगाल प्रांताचे दौरे काढून निधी जमा केला. अनेक कन्या शाळा या विद्यापीठाला जोडल्या व लोक वर्गणीद्वारे विद्यापीठ व कन्याशाळा चालविल्या.

१९१७ साली महिला विद्यापीठाच्या माध्यमातून अध्यापिका विद्यालय सुरु केले. त्यामुळे अनेक स्त्रियांना शिक्षिका होण्याची संधी मिळाली. १९२० मध्ये विठ्‌ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठास आपली आई श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ २० लाख देणगी दिली. तेच हे विद्यापीठ एस्‌.एन.डी.टी.महिला विद्यापीठ या नावाने ओळखले जावू लागले. मुंबई येथील खटाव यांनी विद्यापीठाच्या वस्तीगृहासाठी ३५००० रुपयांची देणगी दिली. आश्रमाने चालविलेले कॉलेज विष्णुशास्त्री चिपळूनकरांनी सुरु केलेली पुणे येथील कन्या शाळा या विद्यापीठास जोडण्यात आली. शिवाय सांगली, सातारा, बेळगाव येथे स्थानिक लोकांच्या मदतीने शाळा काढल्या. अहमदनगर, सिंध, हैद्राबाद, नागपूर येथेही विद्यापीठाचा विस्तार झाला. समाजाची चेष्टा, अपमान, तिरस्कार सहन करुन भारतीय स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडे महर्षी कर्वे यांनी खुली केली. त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून बनारस विद्यापीठाने त्यांना डी.लिट भारत सरकारने पद्‌भूषण व भारतरत्न या सर्वोच्च पदव्या देवून गौरव केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज :

शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले तसेच स्त्री शिक्षणाकडे ही लक्ष दिले. त्यांनी शिक्षणाला गतीमान केले. राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना फी माफीची सवलत दिली. आपल्या सुनबाई इंदुती राणीसाहेब विधवा झाल्यानंतर त्यांना शिक्षण देवून कोल्हापूर संस्थानचे शिक्षण खाते त्याच्याकडे सोपविण्याचा त्यांचा विचार होता. तथापि राणी साहेबांच्या मृत्यूुळे तो पूर्ण झाला नाही. संस्थानच्या शिक्षणाधिकारी म्हणून मिस्‌ लिटलनंतर त्यांनी श्रीमती रखमाबाई केळवकर यांची नेणूक केली. यावरुन महाराजाचा स्त्री शिक्षण विषयक दृष्टीकोन स्पष्ट होतो. स्त्री शिक्षणामुळे कुटुंबाचा, समाजाचा अप्रत्यक्ष विकास होतो. स्त्रीला कुटुंबात व समाजात आदराचे व मानाचे स्थान मिळणे शक्य होते. असा छ.शाहू महाराजांचा विचार होता.

पंडिता रमाबाई :

कर्नाटकमधील मगरुळ जिल्ह्याातील गंगमूळ येथे इ.स.१८५८ मध्ये रमाबाईचा जन्म झाला. त्यांचे वडिल अनंतशास्त्री डोंगरे हे संस्कृतचे प्रसिध्द विद्वान होते. पत्नीला संस्कृत शिकविण्यासाठी ४०० ब्राम्हणांशी दोन महिने वाद घातला आणि शास्त्र संत अधिकार मिळविला मात्र ब्राम्हणांच्या कर्मठ मनाने त्यांना कधीही परवानगी दिली नाही तसेच घरच्यांचा विरोध लक्षात घेता ते निराश झाले. तरीही आपली मुलगी रमा हिचे शिक्षण करवून घेतले. नंतरच्या जीवनात त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागले. त्यातच रमाच्या आई वडिलांचा, बहिनीचा मृत्यू झाला. पोरकी झालेल्या रमा व भाऊ श्रीनिवास ६ ऑगस्ट १८७८ ला कलकत्यास येवून पोहचले. यावेळी कलकत्यात समाज सुधारणेचे वारे वाहत होते. ब्राह्मो समाजाने समाज सुधारणा कार्य चालविले होते. रमाबाईचे कलकल्यात जोरदार स्वागत झाले. रमाबाईची स्त्री स्वातंष्याची तळमळ, विद्‌वत्ता, सुंदर व्यक्तीमत्व यामुळे मोठमोठे विद्‌वानही आश्यर्च चकीत झाले. अनेक संस्था त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होत्या. बंगाली स्त्रियांनी आनंद बसू याचे नेतृत्वाखाली एक सभा भरविली व त्यात रमाबाईना एक मानपत्र दिले. ते म्हणजे पंडिता हे होय. तेव्हापासून त्या पंडिता रमाबाई या नांवाने ओळखले जावू लागल्याने दुर्दैवाने भाऊ श्रीनिवासचे निधन झाले. त्या एकाकी पडल्या. त्यांच्या भावाचा एक आसामी मित्र बिपिन बिहारी दास यांच्याशी १८८०मध्ये विवाह झाला. अंतरजातीय प्रौढ विवाहामुळे समाजाने त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला. मात्र न डगमगता त्यांनी घरच्या घरी स्त्री शिक्षणाचे कार्य सुरु केले. यावेळी लूकाचे वर्तान हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्या ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाल्या. लग्नानंतर अल्पावधीत १९ महिन्यानंतर पती बिपिन दास यांचा १८८१ मध्ये मृत्यू झाला.

आर्य महिला मंडळाची स्थापना :

पतिचे निधन झालेले जवळ लहान मुलगी, बिघडलेली आर्थिक, स्थिती नातलगांनी संबंध तोडलेले अशा अवस्थेत काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. त्यावेळी न्यायमुर्ती रानडे, भांडारकर या महाराष्ट्रातील समाज सुधारकांनी रमाबाईना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर १८८२ मध्ये रमाबाई पुण्यात आल्या. पुण्यात १ मे १८८२ रोजी आर्य महिला समाजाची स्थापना केली. रमाबाई रानडे, काशीबाई कानीटकर, रखमाबाई रावूताची आई या स्त्रियांनी त्यांना मदत केली. संपूर्ण भारतातील स्त्रियांवर वेगवेगळ्याा कारणांनी अत्याचार होतात त्यातून त्यांची सुटका करणे व महिलांची प्रगती घडवून आणणे हे या समाजाची उदि्‌दष्ट्ये होती. त्यानुसार स्त्रि सुधारणेवर व्याख्याने देवून स्त्रियांना शिक्षणातून आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करुन सोलापूर, बार्शी, पंढरपूर, नगर, ठाणे इ.ठिकाणी आर्य महिला समाजाच्या शाखा सुरु केल्या.

शारदा सदनची स्थापना :

स्त्रियांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी प्रथम इंग्लंड नंतर अमेरिकेला गेल्या. तेथे इंग्रजी भाषा व वैद्यकीय शिक्षण घेवून परत आल्यानंतर त्यांनी मुंबई येथे ११ मार्च १८८९ रोजी शारदा सदनची स्थापना केली. लवकरच त्यांनी शारदा सदनचे पुण्याला स्थलांतर केले. स्त्रियांना घराबाहेर पडून धिटपणाने पुरुष समुदायात वावरण्याची सवय लावणे, बाहेरच्या जगाचा परिचय घडवून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास व व्यापक दृष्टी निर्माण करणे. असे कार्य रमाबाईनी केले. रमाबाईच्या प्रेळ स्वभावामुळे मुली त्यांच्याकडे ओढल्या जावू लागल्या. एक दोघीनी ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यामुळे शारदा सदनवर धर्मांतराचा ठपका लागला. रमाबाई सदनमधील स्त्रियांना ख्रिश्चन धर्माची दिक्षा देत आहेत असे वादळ उठले. त्यामुळे हे सदन पुण्याजवळ कडेगाव येथे हलविण्यात आले.

मुक्ति सदनाची स्थापना :

कडेगावच्या १०० एकराच्या माळावर त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. ३०० अनाथ बालकासह इथला आश्रम फुलविला. आश्रमातील फळे, भाज्या विकणे हिशोब ठेवणे असे काम मुली करु लागल्या. मुलींना आर्थिकदृष्ट्याा स्वयंपूर्ण बनविणे यावर त्यांचा भर होता. तेथे एक छापखाना सुरु केला. हातमाग, शेती, बुरुडकाम, विणकाम, धोबीकाम असे उद्योग सुरु केले. तेल काढणे, कल्हई करणे, भांड्याावर नाव घालणे, टोप्या, बटणे तयार करणे, लेस विणणे, दोऱ्या वळणे अशी गरजेची सर्वच कामे आश्रमातील स्त्रिया करत. रमाबाई सरकारी ऑर्डर घेवून मुलीनी तयार केलेल्या वस्तू पुरवित असत. पुरुषाशिवाय आपण सन्मानाने जगू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला की पुरुषाचे वर्चस्व आपोआप कमी होते. हे रमाबाईचे म्हणणे मिशन मधील मुली अनुभवत होत्या.

कृपासदनची स्थापना :

वाईट चालीमुळे पतीत ठरलेल्या स्त्रियांना समाजात कोणतेच स्थान नव्हते. त्यांना कोणत्याही आश्रमात, अनाथालयात जागा मिळत नसे. अशा पतीत स्त्रियांना प्रेाने वागवून योग्य मार्गावर आणण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना केली व समाजाने टाकून दिलेल्या या स्त्रियांना त्यांनी या सदनमध्ये जागा दिली व सन्मानाचे जीवन दिले.

प्रीती सदनची स्थापना :

त्याकाळी सर्व सामान्य स्त्रियांची दुरावस्था होत होती. याचा विचार करता लुळ्याा, पांगळ्याा, मुक्या, बहिऱ्या अशा स्त्रियांची काय अवस्था असेल याचा विचार ही करता येत नाही. अशा म्हाताऱ्या, दुबळ्या, पांगळ्या स्त्रियांसाठी रमाबाईनी प्रीती सदन सुरु केले. समाजिक कार्यात, राजकारणात, उद्योगधंद्याात रस घेणारी स्त्री अशी आधुनिक स्वतंत्र स्त्रीची अनेक रुपे रमाबाईच्या व्यक्तीमत्वामध्ये सामावलेली होती. अशा महान स्त्रीचे इ.स.१९२२ मध्ये निधन झाले.

ताराबाई शिंदे :

महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून स्वत:चे स्वतंत्र विचार ‘स्त्रि-पुरुष तुलना’ या पुस्तकात त्यांनी मांडले. ताराबाईचे वडिल बापूजी हरी शिंदे महात्मा फुलेचे अनुयायी होते. ताराबाईचे मराठी, इंग्रजी, संस्कृत भाषेवर प्रभूत्व होते. पुरुषी वर्चस्व संपविल्याशिवाय समाजाची निकोप वाढ होणार नाही. असे मत त्यांनी मांडले. ताराबाईचे वडील सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी असल्याने त्यांना सत्यशोधक चळवळीचा वारसा मिळाला होता.

१) स्त्री-पुरुष समानता :

ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा गं्रथ लिहला. या ग्रंथात ताराबाईनी स्त्रियांच्याकडे आत्मविश्वासाने पाहिले जात नाही. ज्या ईश्वराने पुरुष व स्त्रियांना निर्माण केले त्या स्त्रियांना समान संधी का नाही? असा प्रश्न विचारला आहे. पुरुषांनी स्त्रियांना शतकानुशतके दाबून ठेवले आहे. शिक्षण दिले नाही बाहेरचा अनुभव येवू दिला नाही. त्यामुळे ती अंधश्रध्दा व अज्ञानात खितपत पडली आहे. स्त्री एक शक्ती आहे. तिला सन्मानाने वागवावे असे आपल्या पुस्तकात मत मांडले आहे. महात्मा फुले यांनी स्त्रि-पुरुष विषमतेविरुध्द लढा सुरु केला. त्याला पुरक धोरण ताराबाईने अवलंबिले होते. ताराबाईचे लेखन बंडखोर व तत्कालीन समाजाला हादरवून सोडणारे होते.