सेवा क्षेत्र (Service Sector)

सेवा क्षेत्राचा अर्थ व रचना :

सेवा क्षेत्र हे प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, ज्ञानाधिष्ठित व उत्पादन प्रक्रियाच्या आधुनिकीकरणाशी संबधित क्षेत्र आहे. या क्षेत्राता सर्वसाधारणपणे किरकोळ व्यापार, वाहतूक व्यवस्था, बँकीग सेवा विमा सुविधा व वित्तीय सेवा पुरविणाऱ्या महामंडळाचा समावेश होतो. या सेवा समाजाला खासगी व सार्वजनिक क्षेत्राद्वारे पुरिवल्या जातात. आधुनिक काळात हॉटेल व्यवसाय,पर्यटन उद्योग संगणक व सॉफ्टवेअर सेवांचा समावेश सेवाक्षेत्रात केला जातो.

अमेरिकन सेन्सस ब्युरोच्या मते, सेवाक्षेत्रात प्राथमिक स्वरूपात ट्रक वाहतूक सेवा, गोदाम सेवा व माहिती तंत्रज्ञान सेवांचा समावेश होतो इतकेच नव्हे माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती ही सुद्धा एक सेवा आहे तथापि काही अर्थशास्त्रज्ञ माहिती तंत्राचा समावेश अर्थव्यवस्थेचे ४ थे क्षेत्र म्हणून करावा असे मत व्यक्त करतात.

सेवाक्षेत्र उद्योगामध्ये उद्योगांना व उपभोक्त्यांना अंतिम वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियांचा समावेश करावा. अशा प्रकारे सेवाक्षेत्र हे समाजाला विविध प्रकारच्या सेवा पुरविणारे क्षेत्र प्रस्तूत या सेवा खासगी व सार्वजनिक अथवा सरकारी क्षेत्रामार्फत पुरविण्यात येतात. सेवाक्षेत्राचा नेका अर्थ व स्वरूप आपणास त्याच्या रचनेवरून अधिक स्पष्ट होईल असे वाटते.

सेवा क्षेत्राची रचना :

सेवाक्षेत्राची रचना अभ्यासताना आपणास पुढील ३ घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.

 1. व्यापार, वाहतूक, गोदाम सेवा आणि दळणवळणाच्या सुविधा
 2. वित्तीय संस्था, विमा, स्थावर मालमत्ता आणि उद्योगव्यवसायाशी संबधित बाबी/सेवा.
 3. समाजाला संयुक्तपणे किंवा वैयक्तिक पातळीवर पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधा (आरोग्य सुविधा,शिक्षण, वाहतूक व्यवस्था इ.)

सेवा क्षेत्राचे वर्गीकरण करताना सेवाक्षेत्राचा अर्थ विचारात घेतला जातो. युनायटेड नेशन्स सेंट्रल उत्पादन संस्थेने सेवाक्षेत्राची रचना करताना एखाद्या देशाने पुरविलेल्या सेवांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करावा असे म्हटले आहे. यामध्ये एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून जागतिक व्यापार संघटना (WTO) गॅट, जी२० इत्यादी संस्थांशी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा विचार करावा असे म्हटले आहे.

भारतात सद्या भारतीय राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण संस्थेने (NIC) २००८ साली ठरविलेल्या रचनेध्ये पुढील १५ विविध तीन प्रकारांत सेवाक्षेत्राची विभागणी केली आहे.

 1. घाऊक व किरकोळ व्यापार, दुचाकीदुरूस्ती व चारचाकी दुरूस्ती व्यवसाय
 2. वाहतूक व गोदामव्यवस्था
 3. निवास व्यवस्था व खाद्यान्न सेवा उपक्रम (हॉटेल)
 4. माहिती व दळणवळण सेवा
 5. वित्तविषयक व विमा सुविधा पुरविणाऱ्या संस्था
 6. स्थावर मालमत्तेशी संबधित व्यवसाय करणाऱ्या संस्था
 7. व्यावसायिक शास्त्रीय व तांत्रिक सुविधा पुरविणाऱ्या संस्था
 8. प्रशासकीय व पुरक सुविधा पुरविणारे उपक्रम
 9. सार्वजनिक प्रशासन संरक्षण आणि अत्यावश्यक सामाजिक सुरक्षिततेच्या सुविधा
 10. शिक्षण
 11. मानवी आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्था
 12. कला, करमणूक व विविध गुणदर्शन सुविधा
 13. कौटुंबिक पातळीवर केले जाणारे व्यवसाय
 14. सेवाक्षेत्रांतील संस्थांनी व संघटनांनी राबविलेले उपक्रम
 15. इतर सेवा

भारतीय राज्यघटनेतीत तरतुदीनुसार सेवाक्षेत्राची विभागणी पुढील ३ सूचीमध्ये करण्यात आली आहे.

) केंद्रसूचीतील सेवा या सेवांचा विकास हा केंद्रसरकार घडवून आणणे. यामध्ये दळणवळण पोस्ट ऑफिसेस, रेडिओ, वित्तपुरवठा संस्था, विमा सुविधा, राष्ट्रीय महामार्ग व खनिजे इत्यादीचा समावेश केला जातो.

) राज्यसूचीतील सेवा या सेवा राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. यामध्ये आरोग्य स्थावर मालमत्ता शेती, पशुपालन व जंगल व्यवसायाचा समावेश होतो.

) समवर्ती सूचीतील सेवा या प्रकारातील सुविधांचा विकास हा केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून केला जातो. या प्रकारात कर सेवा, हिशेब, अभियांत्रिकी व स्थापथ्य शास्त्र, नागरी नियोजन, वीज पुरवठा, मेडिकल व दंत वैद्यकीय सेवा, शिक्षण, मुद्रणसेवा व प्रसिद्धी उद्योग या सेवांचा अंर्तभाव केला जातो.

भारतातील सेवाक्षेत्राची रचना विचारात घेताना आणखी एका प्रकाराचा विचार करावा लागतो. तो म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचा हिस्सा विचारात घेवून केलेले वर्गीकरण हा होय. या प्रकारच्या वर्गीकरणात सेवाक्षेत्राची रचना पुढील ४ प्रकारात करण्यात येते.

 1. समाजोपयोगी सामाजिक व वैयक्तिक सेवा
 2. वित्त, विमा स्थावर मालमत्ता व उद्योग व्यवसाय
 3. व्यापार, हॉटेल व्यवसाय व निवास व्यवस्था
 4. वाहतूक गुदामव्यवस्था व दळणवळण

अशा प्रकारे भारतात सेवा क्षेत्राची उभारणी व विकास हा शासन, खासगी व वैयक्तिक स्तरावर करण्यात आला आहे. सद्या परकीय थेट गुंतवणूकीची सर्व क्षेत्रे भारतातील सेवाक्षेत्रात समविष्ट करण्यात आलेली आहेत. सेवाक्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील महत्व दिवसेदिवस वाढत असून त्यामुळे शासकीय महसूल व रोजगारवृद्धि मोठ्या प्रमाणात होत आहे.

भारतातील सेवाक्षेत्राचे वाढते महत्व :

१९५१ पासून भारताने आर्थिक विकासासाठी नियोजनाचा मार्ग स्वीकारला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून १९५१५२ केंद्र व राज्यसरकारांनी देशातील प्राथमिक, द्वितीय किंवा औद्योगिक क्षेत्र व सेवाक्षेत्राचा पुरेशा प्रमाणात विकास घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. १९५०५१ पासून या तीन ही क्षेत्रांची व्याप्ती वाढत आहे. तथापि सेवाक्षेत्राची गेल्या काही वर्षात झालेली वाढ ही इतर दोन क्षेत्रांपेक्षा प्राथमिक व द्वितीय अधिक आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सेवाक्षेत्राच्या व्याप्ती बरोबरच स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा ही वाढत आहे. १९९१ नंतर भारतात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचे परिणाम म्हणूनही सेवाक्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे.

भारतातील सेवाक्षेत्राचे वाढते महत्व

वर्ष

स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा

एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादन

प्राथमिक क्षेत्र

द्वितीय क्षेत्र

सेवा क्षेत्र

१९५१५२

८३,१५४ (५९.)

१८,६७०(१३.)

३६,६४५(२७.)

,४०,४६६ (१००)

१९७०७१

,३७,३२०(४६.)

६२,२५८(२१.)

९५,३३१(३२.)

,९६,९०९ (१००)

१९८०८१

,५९,२९३(३९.)

९५,०५५(२३.)

,४६,७५३(३६.)

,०१,१२८(१००)

१९९०९१

,२३,११४(३२.)

,८८,६०१(२७.)

,८१,११५(४०.)

,९२,८७१ (१००)

२००००१

,०४,६६६(२४)

,३८,१६५(२६.)

,२५,११४(४९.)

१२,६७,९४५(१००)

२००९१०

,६१,०८३(१७)

११,६१,७१५(२६.)

२५,४१,२८३(५६.)

४४,६४,०८१ (१००)

१९५१५२ ते २००९१० या काळात भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात प्राथमिक, द्वितीय व सेवाक्षेत्राचा हिस्सा कसा बदलत गेला आहे. हे स्पष्ट होते. १९५०५१ ते २००९१० या काळात प्राथमिक क्षेत्राचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा ५९% वरून १७% पर्यंत कमी झालेला आहे. मात्र सेवाक्षेत्राचा हिस्सा २७.% वरून ५९.% पर्यंत वाढत गेलेला दिसून येतो. याचाच अर्थ भारतात १९५०५१ नंतर आणि विशेषत : १९९०९१ नंतर जलद गतीने सेवाक्षेत्र विस्तारलेले दिसून येते. त्यावरून सेवाक्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्व लक्षात येते.

भारतातील प्रमुख सेवांचा एकूण सेवाक्षेत्रातीला सहभाग व त्यातील बदल :

१९५१ नंतर भारतात सेवाक्षेत्राने चांगली प्रगती केलेली आढळते. यामध्ये प्रामुख्याने समाजोपयोगी सेवा, सामाजिक सुविधा व वैयक्तिक सेवा,वित्तीय सेवा, व्यापार व हॉटेलिंग व्यवसायांचा हिस्सा वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा एकूण सेवाक्षेत्रातील सहभाग सातत्याने बदलत आहे.

भारतातील प्रमुख सेवांची नियोजनकाळातील प्रगती

.क्र

तपशील

एकूण सेवा व स्थल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा

1९५०५१

१९७०७१

१९९०९१

२००९१०

)

समाजोपयोगी, सामाजिक व वैयक्तिक सेवा

३५ (१०.)

३५.(१२.)

३३.(१३.)

२६.(१४)

)

वित्त, विमा व उद्योग व्यवसाय

२५.(.)

२०.(.)

२२ (.)

२७.(१४.)

)

व्यापार व हॉटेल्स सुविधा

२८.(.)

३०.(१०.)

२८.(१३)

२९.(१५.)

)

वाहतूक गुदाम व्यवस्था व दळणवळण

1.(.)

१४.(.)

१५ (.)

१७.(.)

एकूण

१००

१००

१००

१००

वरून आपणास भारतातील निवडक सेवांचा एकूण सेवाक्षेत्रातील व स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा व १९५०५१ पासून त्यात झालेले बदल ध्यानात येतात. निवडक सेवांध्ये समाजोपयोगी, सामाजिक व वैयक्तिक सेवांचा एकूण सेवा क्षेत्रातील हिस्सा १९५०५१ ते २००९१० या काळात ३५% वरून २६.% पर्यंत कमी झालेला आहे. मात्र स्थूल देशांतर्गत उत्पादनातील या सेवांचा हिस्सा १०.% वरून १४% पर्यंत वाढला आहे. ही बाब या निवडक सेवांची प्रगती स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे वित्तीय संस्था, विमा व्यवसाय व विविध उद्योग व्यवसायाचा याच कालावधीतील एकूण सेवाक्षेत्रातील हिस्सा २५.% वरून २७.% वाढलेला दिसून येतो. या सेवांचा स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा ही १९५०५१ ते २००९१० या कालावधीत ७.% वरून १४.% पर्यंत वाढलेला दिसून येतो. येथे आणखी एक बदल प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे हॉटेल व्यवसाय व व्यापार या सेवांचा एकूण सेवाक्षेत्रातील हिस्सा २८.% वरून २९.% पर्यंत तर GDP मधील हिस्सा ८.% वरून १५.% पर्यंत वाढला आहे. याच कालावधीत भारतातील वाहतूक व दळणवळण सेवांचा एकूण सेवाक्षेत्रातील व स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिस्सा वाढलेला आपणास दिसून येतो.