सेनापती बापट

सेनापती बापट

पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे मुंबई विद्यापीठाच्या मंगळदास नथुबाई टेक्निकल स्कॉलरिाप तर्फे इंग्लडंला मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेले असता, त्यांची भेट क्रांतीकारकांना मदत करणाऱ्या शामजी कृष्ण वर्मा यांच्याशी झाल्याने ते क्रांतीकार्याकडे खेचले गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी आपल्या भाषणातून त्यांची इंग्रज राजवटीचे सत्य स्वरुप उघड केल्याने त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. त्यामुळे ते इंडिया हाऊसमध्ये रहायला गेले. तेथेच सावरकर, मदनलाल धिंग्रा यांचा सहवास लाभला.

सावरकरांच्या प्रभावाने बापट बाँबविद्या शिकण्यासाठी पॅरीसला गेले तेथे त्यांना रशियन भाषेतील बाँब तयार करण्याची कागदपत्रे मिळाली. अन्या खोस या रशियन महिलेच्या मदतीने त्यांचे भाषांतर करुन भारतीय क्रांतीकारकांना त्याच्या प्रती पाठवल्या. १९०८ मध्ये ते भारतात परतले. ३० एप्रिल १९०८ रोजी खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या क्रांतीकारकांनी कलकत्त्याचे मॅजीस्ट्रेट किंग्जफोर्ड यांच्या गाडीवर बाँब टाकला. यात किंग्जफोर्ड बचावला. पण दोन स्त्रिया ठार झाल्या. खुदीरामला फाशी झाली तर प्रफूल्ल चाकीने आत्महत्या केली.

यानंतर ३६ क्रांतीकारकांना अटक होऊन त्यांच्यावर खटले भरले हे माणिकतोळा प्रकरण खूप गाजले. माणिकतोळा बागेतील सर्व बाँबसाठा सरकारने जप्त केला. यामागील सूत्रधार म्हणून पोलीस बापटांना शोधू लागले. २८ डिसेंबर १९१२ रोजी त्यांना अटक झाली. पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली. मुळशी सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बापटांनी मोठे योगदान दिले. २८ नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: