सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेचाच एक भाग म्हणून सुरू केली.

योजनेचे स्वरूप-

  • या योजनेमध्ये मुलीच्या जन्मापासून ते तिच्या वयाची १० वर्ष पूर्ण होईपर्यंत केव्हाही भारतातील कुठल्याही पोस्टामध्ये किंवा अधिकृत व्यापारी बॅंकेच्या शाखेत खाते उघडता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याची वार्षिक किमान मर्यादा १००० रू. आहे. तर  वार्षिक कमाल मर्यादा १,५०,००० रु. आहे.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांना लागू राहणार आहे. या अटीमध्ये जर दुसऱ्या जन्माच्या वेळेस जुळी (मुली) असतील किंवा पहिल्या जन्माच्या वेळी तिळी (मुली) असतील तरच त्यांना जन्माचा पुरावा दाखवून तिसरे खाते उघडता येईल.
  • वार्षिक किमान मर्यादा भरू न शकल्यास ५० रु. चा दंड  आकारण्यात येतो.
  • वयाची १० वर्षे पूर्ण झाल्यावरच ती मुलगी स्वतः स्वतःचे खाते वापरू शकते.
  • वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ५० टक्के जमा रक्कम काढण्याची मुभा आहे.
  • खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्ष होईपर्यंत किंवा १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलीच्या विवाहापर्यंत हे खाते कार्यरत राहील.
  • या खात्यावर सध्या (जुलै २०१७ ते ऑक्टोबर २०१७)  ८.३ टक्के इतका व्याजदर देण्यात येत आहे.
  • शासनाने जाहीर केलेला व्याजदर या खात्यावर १४ वर्षापर्यंतच जमा केला जाईल.

कर सवलत-

या योजनेच्या सुरुवातीच्या काळात आयकर कायद्यातील कलम ८०(C) अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यावरील केवळ जमा रक्कम करमुक्त होती. परंतु २०१५ च्या अर्थसंकल्पानुसार, व्याज सुद्धा करमुक्त करण्यात आले आहे.

संदर्भ:

विकासपिडिया