सार्वजनिक वित्त (Public Finance)

सार्वजनिक वित्त (आय-व्यय) अर्थ (Public Finance) :-

सार्वजनिक वित्त: व्याख्या

डॉ. डाल्टन :-

“अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोहोंच्या सीमारेषावर असणारा एक विषय म्हणजे सार्वजनिक आय-व्यय होय. सार्वजनिक सत्तांचे उत्पन्न आणि खर्च या दोहोत मेळ घालण्याशी त्याचा संबंध असतो.”

डॉ. डाल्टन यांनी आपल्या व्याख्येत सार्वजनिक आय-व्ययाची कल्पना स्पष्टपणे मांडली आहे. सार्वजनिक आय-व्ययाची कल्पना स्पष्टपणे मांडली आहे. सार्वजनिक सत्तामध्ये सर्वप्रकारच्या सरकारांचा समावेश केला आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या आजच्या काळात ग्रामपंचायती, तालूका पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, राज्यसरकारे आणि केंद्रसरकार या सर्वांचा समावेश सरकारामध्ये केलेला आहे.

प्रा. फिंडले शिराज :-

“सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळविण्याच्या आणि खर्च करण्याच्या पद्धतीशी संबंधित असणारे शास्त्र म्हणजे सार्वजनिक आय-व्यय होय.”

प्रा. मसग्रेव्ह :-

“सरकारच्या उत्पन्न आणि खर्च पद्धतीभोवती समस्यांची जी गुंतागुंत झालेली असते त्यास सर्वसाधारणपणे सार्वजनिक आय-व्यय असे म्हणतात.”

सरकार विविध मार्गांनी उत्पन्न मिळविते आणि ते खर्च करते. उत्पन्न मिळविताना आणि खर्च करताना विविध समस्यांची निर्मिती होत असते. त्या समस्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा अभ्यास सार्वजनिक आय-व्ययात केला जातो.

अर्थसंकल्प : अर्थ, उद्दिष्ट्ये व प्रकार

अर्थसंकल्प : अर्थ, उद्दिष्ट्ये व प्रकार

अर्थसंकल्पातील महत्वाच्या संकल्पना

अर्थसंकल्पातील महत्वाच्या संकल्पना

तुटीच्या संकल्पना

तुटीच्या संकल्पना