सार्वजनिक उपक्रम समिती

कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार सार्वजनिक उपक्रम समिती १९६४ मध्ये स्थापन केली गेली. सुरुवातीस या समितीमधे १५ सदस्य होते (१० लोकसभेतुन व ५ राज्यसभेतुन). १९७४ मधे समितीची सदस्यसंख्या २२ केली गेली(१५ लोकसभेतुन व ७ राज्यसभेतुन). संसद सदस्य आपल्यातुन एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीद्वारे या समितीवर सदस्य निवडुन देतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधीत्व मिळते.सदस्यांचा कार्यकाल १ वर्ष असतो. या समितीमधे मंञी सदस्य होऊ शकत नाही. लोकसभेचा सभापती समितीच्या सदस्यातून एकाची अध्यक्ष म्हणुन निवड करतात जो लोकसभेचा सदस्य असतो. म्हणजेच समितीमधे जे सदस्य राज्यसभेतुन निवडलेले असतात ते अध्यक्ष होऊ शकत नाहीत.

सार्वजनिक उपक्रम समिती-कार्ये

  • सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे यांची तपासणी करणे.
  • भारताचे महानियंञक व महालेखापरीक्षक यांच्या सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवालाची तपासणी करणे.
  • सार्वजनिक उपक्रमांच्या बाबतीत लोकसभेचा सभापती वेळोवेळी सोपवील ती कार्ये पार पाडणे.