सार्क: दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना

सार्क ही दक्षिण आशियाई देशांची क्षेञीय संघटना असून एक भाैगोलिक-राजकीय संघ आहे. सार्क देशांनी ३ टक्के जागतिक क्षेञफळ, २१ टक्के जागतिक लोकसंख्या, ३.८ टक्के जागतिक अर्थव्यवस्था व्यापली आहे. ही संघटना आर्थिक व प्रादेशिक एकात्मता साधण्याचा प्रयत्न करते.

स्थापना

सार्कची स्थापना ८ डिसेंबर १९८५ रोजी ढाका येथे झाली.

ऐेतिहासिक पार्श्वभूमी

दक्षिण आशियाई देशांमध्ये सहकार्य संघटनेच्या कल्पनेबाबत किमान तीन परिषदांमध्ये चर्चा झाली. Asian Relation Conference-१९४७, नवी दिल्ली, बागुयो परिषद-१९५० (फिलिपिन्स), व Colombo Power Conference-१९५४.
बांग्लादेशचे राष्ट्रपती झियाउर रेहमान यांनी दक्षिण आशियाई देशांना याबाबत अधिकृत पञ पाठवले.तसेच नेपाळचे राजे बिरेंदृ यांनी १९७७ मध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये नद्यांच्या पाणीवाटपाबाबत सहकार्याची आवश्यकता बोलून दाखवली.
झियाउर रेहमान व राजे बिरेंदृ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सात देशांचे परराष्ट्र खात्यातील उच्च अधिकारी १९८१ मध्ये भेटले.
बांग्लादेशच्या प्रस्तावाला नेपाळ, श्रीलंका, भुतान व मालदीव यांनी पाठिंबा दिला. माञ भारत व पाकिस्तान संशयी भूमिकेत होते. भारताला छोटे देश मिळून भारतविरोधी आघाडी उभारतील अशी भिती होती. तर पाकिस्तानला वाटे कि, छोट्या देशांना पाकिस्तानविरोधात एकञ आणून प्रादेशिक बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करण्याची ही भारताची खेळी आहे.
१९८३ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तत्कालीन विदेशमंञी पी. व्ही. नरसिंहराव यांनी सार्कचा जाहीरनामा स्वीकारला.

सदस्य

सार्कचे ७ संस्थापक सदस्य आहेत. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भुतान, मालदीव.
अफगाणिस्तानने २००५ मध्ये सार्कचे सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याच वर्षी तसा अर्ज केला. अफगाणिस्तानच्या सदस्यत्वाबाबत सार्कमध्ये बरीच चर्चा झाली. दक्षिण आशियाच्या व्याख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले कारण अफगाणिस्तान हा मध्य आशियाई देश होता. शेवटी २००७ मध्ये अफगाणिस्तान हा सार्कचा आठवा सदस्य झाला.

निरिक्षक

आॅस्ट्रेलिया, चीन, जपान, इराण, युरोपियन युनियन, माॅरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया, यु. एस. ए.

भावी विस्तार

म्यानमारने सार्कचे सदस्य होण्यासाठी इच्छा प्रकट केली आहे. तुर्की आणि रशिया यांनी निरिक्षक दर्जा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. दक्षिण आफ्रिका सार्कच्या बैठकांमध्ये सहभागी झाला आहे.

प्रादेशिक केंद्रे व संस्था

सार्कची १२ प्रादेशिक केंद्रे आहेत. तर ६ उच्चतम संस्था व १७ मान्यताप्राप्त संस्था आहेत.

SAFTA

२००४ च्या इस्लामाबाद येथे भरलेल्या १२ व्या सार्क परिषदेदरम्यान SAFTA करार मंजूर झाला व १ जानेवारी २००६ पासून अस्तित्वात आला. या करारानुसार २००९ पर्यंत सार्क सदस्य आयात-निर्यात शुल्क २० टक्क्यांपर्यंत खाली आणणार होते.

सार्क पुरस्कार

१२ व्या सार्क परिषदेने प्रदेशातील व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहनासाठी सार्क पुरस्कारांना मान्यता दिली.
पुरस्काराचे स्वरूप- सुवर्णपदक, प्रशस्तीपञ व २५००० अमेरिकन डाॅलर
सार्क पुरस्काराची २००४ मध्ये सुरूवात झाल्यापासून एकदाच हा वितरित केला असून तो झियाउर रेहमान यांना मरणोत्तर प्रदान केला गेला.

सार्क साहित्य पुरस्कार

हा पुरस्कार सार्कची उच्चतम संस्था सार्क साहित्य व सहित्यिक संस्था हिच्यातर्फे दरवर्षी वितरित केले जातात. सुमन पोखरेल या नेपाळी कवीलाच फक्त हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

सार्क युवा पुरस्कार

सार्क प्रदेशातील अतुलनीय कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यत येतो. दरवर्षी वेगवेगळ्या थिम नुसार हा पुरस्कार देण्यात येतो.
२००९ मध्ये रवीकांत सिंग या व्यक्तीला नैसर्गिक आपत्तीनंतर अतुल्य योगदानाबद्दल देण्यात आला.

महासचिव

अमजद हुसेन बी. सियाल (पाकिस्तान)

परिषदा

१९ वी- २०१६- पाकिस्तान(रद्द)
१८ वी- २०१४ नेपाळ
१७ वी- २०११ मालदीव