सहस्ञक विकास उद्दिष्टे (Millennium Development Goals)

सहस्ञक विकास उद्दिष्ट्ये एकूण आठ आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत.

१.अति दारिद्र्य व भुकेचे निर्मुलन करणे-प्रति दिन एक डाॅलर पेक्षा कमी वर जगणार्या लोकांचे प्रमाण निम्म्यावर कमी करणे. भुकेने पिडीत असलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे.

२.सार्वञिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे-सर्व मुले व मुली प्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करतील हे साध्य करणे.

३.जेंडर समानेत प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे-२००५ पर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील, तर २०१५ पर्यंत सर्व स्तरातील जेंडर असमानता नष्ट करणे.

४.बाल मृत्यूदर कमी करणे- दीड वर्षाखालील बालकांमधील मृत्यूचे प्रमाण २/३ ने कमी करणे.

५.माता आरोग्य सुधारणे- माता मृत्यूदर २/३ ने कमी करणे.

६.एचआयव्ही/एड्स मलेरिया व इतर रोगांशी सामना करणे- एचआयव्ही/एड्सचा प्रसार थांबविणे आणि व्यत्क्रमाची सुरूवात करणे. मलेरिया व इतर प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव थांबविणे.

७.पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे-देशांच्या धोरणांमध्ये शाश्वत विकासाच्या तत्वाचे एकात्मिकरण घडवून आणणे. सुरक्षित पेयजलाची योग्य उपलब्धता नसलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे. २०२० पर्यंत १०० दशलक्ष झोपडपट्टीवासीयांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे.

८.विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे-खुल्या व्यापार व वित्तीय व्यवस्थेचा विकास. गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा. लहान व भू-बंदिस्त देशांच्या विशेष गरजांकडे लक्ष देणे. आैषध कंपन्यांशी सहकार्य करून परवडण्याजोगी आैषधे उपलब्ध करून घेणे.