सर सय्यद अहमद खान

सर सय्यद अहमद खान (१७ ऑक्टोबर १८१७-२८ मार्च १८९८) हे विख्यात मुस्लिम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्वज हेरातचे होते. समाट अकबराच्या कारकीर्दीत (१५५६-१६०५) ते भारतात स्थलांतरित झाले आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने सेवा करू लागले. त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते.

सर सय्यद अहमद खान
सर सय्यद अहमद खान

बालपण व शिक्षण

सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरू होती. पवित्र कुराण, गुलिस्ताँ, बोस्ताँ यांसारखे फार्सी गंथ, काही अरबी गंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले. गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले. स्वत:ची लेखनशैली सुंदर असली पाहिजे, याची जाणीव त्यांना झाली.

ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी

१८३८ साली सर सय्यद यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सर सय्यद यांनी मोगल दरबाराची सेवा करण्याऐवजी ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला.

ईस्ट इंडिया कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि आग्रा येथे नायब मुन्शी या पदावर त्यांची नेमणूक झाली. १८४१ मध्ये ते मैनपुरी येथे मुन्सफ झाले.  मध्ये सर सय्यद यांनी आपली बदली दिल्लीला करून घेतली.

१८५७ चा उठाव झाला, तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले.

ग्रंथसंपदा

१८५७ च्या उठावावर अस्बब-इ-बगावत-इ-हिंद (१८५९) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात त्यांनी बंडाची कारणमीमांसा केली. ती करताना त्यांनी इंग्रजांवरही टीका केली. बंडवाल्यांना शिक्षा देताना त्यांनी दाखविलेल्या सूडबुद्धीचा निषेध केला व या बंडात हिंदूंपेक्षा मुसलमान जास्त पोळले गेले, असेही मत व्यक्त केले.

त्यानंतर लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया (१८६०) हे पुस्तक त्यांनी लिहिले. १८५७ च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता, असे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला. ख्रिस्ती जमातीने जिच्याशी मैत्री करावी, अशी एकमेव जमात मुसलमानांची होय, असेही विचार त्यांनी ह्या ग्रंथात मांडले होते.

१८६९ मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथे यूरोपीय संस्कृतीचे त्यांना दर्शन झाले. त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांना विख्यात स्कॉटिश साहित्यिक टॉमस कार्लाइल याचा स्नेहपूर्ण सहवास लाभला. प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या जीवनावर आणि सर सय्यद यांनी लिहिलेल्या एसेज ऑफ द लाइफ ऑफ मुहंमद (१८७०) ह्या पुस्तकावरही त्यांची चर्चा झाली.

बरानीचे तारीख-इ-फिरोझशाही, अबुल फज्लची आइन-ए-अकबरी, जहांगीरचे तुझुक हे ग्रंथ त्यांनी संपादिले.

बायबल वर त्यांनी भाष्य लिहिले (तबियिन-उल-कलाम ). धर्मांच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो.

१८५७ च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्टरी ऑफ बिजनोर आणि हिस्टरी ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर हे गंथही महत्त्वाचे आहेत.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर १८७६ मध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला.

वृत्तपञे

आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी फार्सी आणि इंगजी अशी दोन पत्रे काढली (तहसीब-अल्-अखलाक आणि मोहमेडन सोशल रिफॉर्मर). तथापि कट्टरपंथीय मुसलमानांनी ‘काफिर’, ‘क्रिस्ताळलेला’ अशी विशेषणे देऊन त्यांच्यावर टीका केली.

शैक्षणिक कार्य

सर सय्यद यांना ब्रिटिश सत्ता ही भारताला उपयुक्त आणि आवश्यक वाटत होती. ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्यात भारतीयांचे कल्याण आहे, अशी त्यांची धारणा होती. ‘इंडियन नॅशनल कॉंग्रेस’ला त्यांचा कडवा विरोध होता. कॉंग्रेसला शह देण्यासाठी त्यांनी इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन हा पक्ष काढला.

र सय्यद यांनी उत्तर प्रदेशांतील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल महाविदयालय स्थापन केले (१८७५). मुसलमान तरूणांना उदार, आधुनिक शिक्षण मिळावे, हा हेतू त्यामागे होता. या महाविदयालयाचेच पुढे अलीगढ मुस्लिम विदयापीठात रूपांतर झाले (१९२०).

१८८३ मध्ये अलीगढ मध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली.

त्याचप्रमाणे १८८६ मध्ये त्यांनी मोहमेडन एज्यूकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते.

सन्मान

  1. सर सय्यद हे मोगल दरबारची नोकरी करीत नसले, तरी मोगल दरबारकडून त्यांना १८४२ मध्ये ‘जवाद्-उद्दौला अरिफ जंग’ हा किताब देण्यात आला.
  2. १८७८ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
  3. १८८७ मध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले.
  4. १८८९ मध्ये एडिंबरो विदयापीठाने त्यांना एल्एल्.डी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
  5. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन’चे ते सन्माननीय सदस्य होते.

 

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: