Contents
show
स्थापना –
स्थापना –
संयुक्त राष्ट्र संघ (United Nations) ची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्राच्या अधिकारपञावर ५० देशांच्या स्वाक्षरीनिशी झाली होती.
मुख्यालय-
मुख्यालय-
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयाॅर्क या शहरामध्ये आहे.
महासचिव-
महासचिव-
संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद महासचिव हे आहे. सध्या युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरस (पोर्तुगाल) हे आहेत.
उद्देश-
उद्देश-
दुसर्या महायुध्दातील विजयी देशांनी मिळून दुसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती उद्भवू नये याकरिता आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने या संघाची स्थापना केली.
सदस्य संख्या-
सदस्य संख्या-
संयुक्त राष्ट्र संघामध्ये सध्या १९३ सदस्य देश आहेत. दक्षिण सुदान हा सर्वात नवीन (२०११) सदस्य होणारा देश आहे.
अधिकृत भाषा-
अधिकृत भाषा-
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 6 अधिकृत भाषा आहेत.
- अरबी,
- चीनी,
- इंग्रजी,
- फ्रेंच,
- रशियन,
- स्पॅनिश.
स्वरूप-
स्वरूप-
या संस्थेच्या संरचनेत
- आम सभा (General Assembly),
- सुरक्षा परिषद (Security Council),
- आर्थिक व सामाजिक परिषद (Economic and Social Council-ECOSOC)
- सचिवालय आणि
- आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice).
- विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
यांचा समावेश होतो. यांनाच युनोचे सहा स्तंभ असेही म्हणतात.