श्वसन संस्था (Respiratory System)

केवळ श्वासोच्छवास घेण्याच्या प्रक्रियेला श्वसन असे म्हणता येत नाही. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे एवढ्यापुरतीच श्वसनाची क्रिया मर्यादित नसते.सात्मीकरण झालेल्या म्हणजेच पचन झालेल्या अन्नापासून ऊर्जामुक्त करण्याची क्रिया म्हणजे श्वसन होय. मानवी श्वसन संस्था (Respiratory System) पुढिलप्रमाणे-

श्वसनाचे प्रकार

आॅक्सीजनच्या उपलब्धतेनुसार श्वसनाचे मुख्य दोन प्रकार पडतात.

आॅक्सिश्वसन (आॅक्सीजनच्या सानिध्यात ऊर्जा मुक्त केली जाते)

विनाॅक्सिश्वसन (ऊर्जा मुक्त करण्यासाठी आॅक्सीजनची गरज भासत नाही)

मानवी श्वसन संस्था

  • रक्तातील कार्बनडायऑकसाइड चे प्रमाण जास्त असल्यास श्वसनाचा वेग वाढतो.
  • प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाचा वेग प्रति मिनिटाला १४ वेळा एवढा असतो. लहान मुलांत तो प्रति मिनिटाला ४५, मोठ्या मुलांमध्ये प्रति मिनिटाला २५ एवढा असतो.

मानवातील श्वसन संस्थेत अनुक्रमे पुढील घटकांचा सहभाग असतो.

१) बाह्य नाकपुड्या (External Nostrils)

2) घसा (Pharynx)

3) ग्रसनी / स्वरयंत्र (Larynx)

4) श्वसन नलिका (Trachea)

5) श्वसनी (Bronchi) – श्वसनिका (Bronchioles)

6)  फुप्फुसे (Lungs)

7) वायुकोश (Alveoli)

8) श्वासपटल (Diaphragm)

 


१) बाह्य नाकपुड्या (External Nostrils)

मानवी श्वसनक्रिया ही नाकपुड्यांपासून सुरू होते. नाकापुड्यातून हवा आत जाताना ति केसामार्फत गाळली जाते म्हणून हवेतील धुळीचे कण, माती असे टाकाऊ घटक फुप्फुसापर्यंत पोहचले जाऊ शकत नाहीत.

२) घसा (Pharynx)

हा घटक श्वसननलिका व अन्ननलिका या दोन्हीही क्रियेत भाग घेतो. घसा जिथे अन्ननलिकेस जोडला जातो, त्या जागेस गलेट असे म्हणतात.

3) ग्रसनी / स्वरयंत्र (Larynx)

घस्याद्वारे आलेला वायू श्वसननलिकेकडे कंठाद्वारे जातो. श्वसननलिका या भागाद्वारे आवाज निर्माण करू शकते म्हणून या भागाला ध्वनीचा डब्बा असेही म्हणतात. स्वरयंञ/कंठ यामध्ये व्होकल काॅर्ड नावाची एक काॅर्ड असते ज्यामुळे आवाज तयार होतो. पुरूषामध्ये २०mm तर स्ञीयांमध्ये हे प्रमाण ५mm ने कमी असते.

4) श्वसन नलिका (Trachea)

श्वसन नलिकेचे रूपांतर श्वसनात होऊन ती दोन्ही फुफ्फुसांना जोडलेली असते. वायूचे वहन करणे हे तिचे मुख्य कार्य आहे.

5) श्वसनी (Bronchi) – श्वसनिका (Bronchioles)

उजवी श्वसनी ही डाव्या श्वसनीपेक्षा अधिक रूंद, आखुड व अधिक उभी असते. त्यामुळे या ठिकाणी नाणे, इ. वस्तू अडकतात.  फुफ्फुसांमध्ये श्वसनीचे रूपांतर अनेक लहान शाखांमध्ये होते. या सर्व लहान शाखांना श्वसनिका म्हणतात.

6)  फुप्फुसे (Lungs)

ह्रदयाच्या दोन्ही बाजूस छातीच्या पोकळीत असलेली फुप्फुसे हे श्वसनाचा अतिशय महत्वाचा अवयव आहे.

7) वायुकोश (Alveoli)

श्वसनिकांच्या टोकाशी फुग्यांसारखे दिसणारे वायुकोश (Alveoli) असतात. वायुकोशामध्येच विसरण (Diffusion) प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाइड या वायूंची देवाण घेवाण होते. वायुकोश हा फुप्फुसाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. संपूर्ण फुप्फुस हे वायूकोशांनी बनलेले असते.


श्वासोच्छवास (Respiration/ Breathing):

  • श्वासोच्छवास ही भौतिक प्रक्रिया आहे.
  • ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बाह्यश्वसन किंवा श्वासोच्छवास असे म्हणतात.
  • श्वासोच्छवासाची क्रिया श्वास आणि उच्छवास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

श्वास (Breath-In/Inhalation):

ऑक्सिजनयुक्त हवा शरीरामध्ये घेण्याच्या प्रक्रियेला श्वास असे म्हणतात.

उच्छवास (Breath-Out/Exhalation):

कार्बन डायॉकसाईडयुक्त हवा शरीराबाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला उच्छवास असे म्हणतात.

श्वासोच्छवास: 

यामध्ये फुफ्फुसे व फुफ्फुस धमनीतील रक्त यांच्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायॉकसाईड यांची देवाणघेवाण होते. या क्रियेला विसरण असे म्हणतात.

श्वासातील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये वेगळा होऊन रक्तात मिसळला जातो. तर रक्तातील कार्बन डायॉकसाईड फुफ्फुसांमध्ये उच्छवासाद्वारे मिसळला जातो व त्यानंतर फुफ्फुसातून शरीराबाहेर टाकला जातो.


 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

One thought on “श्वसन संस्था (Respiratory System)”

error: