शेतकरी चळवळ

शेतकऱ्यांच्या समस्याः

 • कंपनी सरकारने रयतवारी, महालवारी आणि कायमधारा पद्धतीची सुरुवात केली असल्यामुळे शेताच्या मालकीबद्दलचा हक्क शेती करणे, महसूल गोळा करण्याची पद्धत यामध्ये आमूलाग्र बदल झाले.
 • जमीनदारांची कुळे शेकतरी बनल्यामुळे जमीनदार वर्ग त्यांच्याकडून शेतसारा भरमसाट घेऊ लागला. प्रसंगी ते कुळाकडून जमीनसुद्धा काढून घेत असत.
 • आधुनिक पद्धतीने शेती कसण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा, भांडवल राहिले नाही. त्यासाठी त्यांना सावकाराची दारे कर्ज घेण्यासाठी ठोठावी लागली. अशा कर्जातच शेतकरी वर्ग कायमचा बुडाला. 
 • भारतातील शेती निसर्गावर अलंबून होती. अतिवृष्टी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन दारिद्री बनले होते. सरकारने जलसिंचनाच्या सोयी व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले नाहीत.
 • शेतकऱ्याचा माल हा दलाल व व्यापारी यांच्या मार्फत विकला जात असल्यामुळे शेतीमालाला व्यापाऱ्याकडून फारशी किंमत येत नव्हती. 

शेतकऱ्यांचे उठाव :

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने काहीच उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्गात सरकारबद्दल असंतोष पसरला. हा असंतोष बंडाच्या स्वरूपात बाहेर पडू लागला.

 • इ.स. १८६७ नंतर शेतसाऱ्यामध्ये वाढ केली. त्यामुळे मे ते सप्टेंबर सावकार व जीमनदाराविरोधी उठाव केले. त्यामुळे इ.स. १८७९ मध्ये ‘डेक्कन ॲग्रीकल्चरिस्टस रिलीफ ॲक्ट‘ पास करून शेतसाऱ्यांना काही सवलती प्रदान केल्या.
 • इ.स. १८७० ते १८८० या दरम्यानच्या काळात सावकार विरोधी उठावाची तीव्रता वाढली होती. बंगालमधील शेतकऱ्यांच्या उठावाचे केंद्र पबना होते. याठिकाणी इ.स. १८५९ च्या ‘एक्स‘ कायद्यानुसार शेतकऱ्यांना संरक्षण प्राप्त झाले होते.
 • युसूफ सराय परगण्याच्या शेतकऱ्यांनी एक ‘शेतकऱ्यांचा संघ‘ तयार केला.

महात्मा फुले व शेतकरी चळवळ :

महात्मा फुलेंनी स्त्री आणि अतिशुद्रांच्या केलेल्या उद्धाराच्या कार्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्थितीतही परिवर्तन करण्याचे कार्य केले.

 • फुलेंनी ‘शेतकऱ्यांच्या आसूड‘ या ग्रंथात शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचे वर्णन केलेले आहे. शेतकऱ्यांची गुलामगिरी, कर्जबाजारीपणा आणि त्यांच्या स्थितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी काय उपाय करावे लागतील याचीही चर्चा प्रस्तुत ग्रंथात केली आहे.
 • महात्मा फुलेंनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी वसतिगृहे स्थापन करावी आणि कनिष्ठ वर्गातील शिक्षकांची नेमणूक करून या मागण्या केल्या.
 • त्यांनी ‘दीनबंधू‘ या वर्तमानपत्रातून लिखाण करून शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली.
 • इ.स. १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी महात्मा फुलेंनी महाराष्ट्र व्यापी चळपळ सुरू केली. ही चळवळ खतफोडीचे बंड म्हणून ओळखली जाते.
 • इ.स. १८८८ मध्ये पुणे येथे इंग्लंडचा ड्युक ऑफ कॅनॉट आला होता. त्याच्या समारंभास महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित राहिले. यावेळी ड्युक ऑफ कॅनॉट यांस शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित राहिले. यावेळी ड्युक ऑफ कॅनॉट यांस शेतकऱ्यांच्या स्थितीविषयक एक निवेदन दिले व त्यामध्ये व्हिक्टोरिया राणीला शेतकऱ्यांच्या सुधारणा करण्याविषयी निरोप देण्यास सांगितले.

कृष्णराव भालेकर व शेतकरी चळवळ :

 • कृष्णराव भालेकर हे महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. ‘दिनमित्र‘ या वृत्तपत्रातून त्यांनी शेतकरीवर्गाच्या स्थितीवर लेख प्रसिद्ध केले व त्यांच्यात जागृती घडवून आणली.
 • त्यांच्या मते शेतकरी व कारागीर हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत. सावकार आणि सरकार हे दोघेही शेतकऱ्यांचे शोषण करीत असत. त्यांनी शेतकऱ्यांना विद्येची कास धरावी आणि आपल्या मुलांना शिक्षण द्यावे असे म्हटले आहे.
 • ब्राह्मणाप्रमाणेच आपणही पारंपारिक व्यवसायाचा त्याग करावा असेही त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
 • त्यांनी विदर्भातील करजगाव येथे ‘द करजगाव इंडस्ट्रियल अँड कमर्शियल सोसायटी‘ स्थापन करण्याची योजना तयार केली होती. पण ही योजना अंमलात येऊ शकली नाही.

विठ्ठल शिंदे व शेतकरी चळवळ :

 • विठ्ठल रामजी शिंदे यांनी इ.स. १९२७ मध्ये मुंबई कायदेमंडळात गृहमंत्र्याने मांहलेल्या तुकडेबंदी व सारावाढीसंबंधीच्या विधेयकास विरोध केला.
 • २५ जुलै १९२८रोजी पुणे येथे मुंबई इलाखा शेतकरी परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्ष वि.रा. शिंदे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातूनही या विधेयकास विरोध दर्शविला. या विधेयकामुळे शेतकरी लहान-लहान जमिनीच्या तुकड्यास मुकतील, त्यांच्याजवळ पैसा राहणार नाही. तसेच सारावाढीमुळे शेतकऱ्यावर अन्याय होईल असे त्यांनी म्हटले.
 • त्यांनी खानदेश, अमरावती, नाशिक, पुणे, सातारा, नागपूर आणि नगर जिल्ह्यांत ग्रामी भागात शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या. पुढील शेतकरी परिषदांचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
  • संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदल (दक्षिण कोकण)
  • शेतकरी परिषद, बोरगाव ता. वाळवा १९३२
  • चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर १९३१

या परिषदामधून त्यांनी पुढील विचार मांडले.

 • तालुकानिहाय शेतकरी व कामगार संघ काढावेत.
 • अमेरिकन शेतकरी, कुरबी, भांडवलदार व जमीनदार आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा.
 • शेतकऱ्यांना अमेरिकन शेतकऱ्याप्रमाणे आपल्या शेतमालाची किंमत ठरविता आली पाहिजे. शेतीच्या मालासाठी योग्य किंमत मिळाली पाहिजे.

ब्राह्मणेतर पुढारी व शेतकरी चळवळ :

 • दिनकरराव जवळकर, श्रीपतरात शिंदे, भगवंतराव पाळेकर आणि मुकंदराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करन ते सोडविण्याचा प्रयत्न केला.
 • दिनकरराव जवळकर यांनी काढलेल्या तेज साप्ताहिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे मुद्रित केले होते.
 •  श्रीपतराव शिंदे यांनी ‘विजयी मराठा’ या वृत्तपत्रात शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले होते. त्यांनी शेकऱ्यांच्या संघटनांनी आवश्यकता प्रतिपादन केली.
 • भगवतराव पाळेकर यांनी बडोदा येथून ‘जागृती’वृत्तपत्र सुर केले.
 • मुकुदंराव पाटील यांनी ५७ वर्षे ‘ दीनमित्र’ अंकात शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती दूर करण्याचे उपाय यावर लेखमाला चालविली.

साने गुरुजी व शेतकरी चळवळ :

 • साने गुरजींनी खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले. त्यासाठी सर्वत्र दौरा केला.
 • इ.स. १९३९ मध्ये पूर्व खानदेशात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे साने गुरजींनी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करवा अशी मागणी केली.
 • त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेला. त्यांनी लिहिलेली स्फूर्तिदायक गीते शेतकऱ्यांनी मोर्चात म्हटली.

मुळशी सत्याग्रह :

 • सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रह झाला. टाटा कंपनीने मुळशी तालुक्यातील मुळा व निळा नदीचा संगम अडवून धरण बांधण्याचे ठरविले. त्यामध्ये ५४ गावे आणि शेती जात होती.
 • बारामती येथे एक परिषद भरवली व त्यामध्ये शंकरराव देव, भुस्कुटे, केळकर व बापट यांनी शेतकऱ्यांसह सत्याग्रह केला.
 • कंपनीने बापट, फंड रानडे, शेरेकर, देवराव व पौडचे हिरवे यांच्यावर खटले भरले. त्यांना ६ महिने कैद व १०० रु. दंडाची शिक्षा ठोठावली व त्यांना येरवडा कारागृहात डांबले.
 • बापट, धुंडिराव देव, आत्मारामपंत मोडक, बळवंत मोरे. विनायक वाभळे व कुकडे यांनी हैद्राबाद राज्यातून हत्यारे आणली व त्यांनी ९ डिसेंबर १९२४ रोजी पौडजवळून रेल्वेगाडी अडविली आणि मजुरांवर हल्ला केला.
 • या सर्वांवर सरकारने खटले भरले. बापट यांना ७ वर्षे, धुंडीराज देव यांना ८वर्षे, गोरे यांना ५ वर्षे व वाभळे , कुकडे व मोडक यांना चार चार वर्षांंची शिक्षा ठोठावली गेली.

महात्मा गांधीजी व शेतकरी चळवळ :

चंपारण्य सत्याग्रह

 • उत्तर बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील नीळ उत्पादित करणारे युरोपीय जमीनमालक शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत होते. गांधीनी बाबू राजेद्र प्रसाद यांच्या साहाय्याने नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्थितीचे अवलोकन केले.
 • इ.स. १९१७ मध्ये बिहारच्या सरकारने शेतकऱ्यांच्या स्थितीचे अवलोकन करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. पुढे ‘चंपारण्य कृषी अधिनियम’पास करन शेतकऱ्यांवरील शेतसारा कमी केला. 

खेडा आंदोलन :

 • खेडा जिल्हयात शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात असे.
 • या वसुलीविरध्द इ.स.१९१६ -१७ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व म. गांधीनी केले.
 • दुष्काळ स्थितीमुळे शेतसारा माफ करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. तर शेतसारा न भरण्याचा सल्ला महात्मा गांधीजीनीच शेतकऱ्यांना दिला होता.
 • सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला, त्यांच्या घरादांराची जप्ती केली. तसेच त्यांना अटक करुन कारागृहात बंदिस्त केले, परंतु शेवटी सरकानेच माघार घेतली आणि शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला.

तुकडेबंदी व सारावाढीचे विधेयक :

 • मुंबई कायदेमंडळात इ.स. १९२७ मध्ये मुंबई प्रांताच्या गृहमंत्र्याने तुकडेबंदी व सारावाढीचे ऐक विधेयक मांडले.
 • हे विधेयक पास झाल्यास लहान शेतकऱ्यांना जमिनीस मुकावे लागत होते. तसेच शेतसाराही वाढणारा होता. त्यामुळे केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी शेतकऱ्यांच्या सभा घेऊन या विधेकाला विरोध केला.
 • २५ जुलै १९२८ रोजी पुणे येथे त्यांनी मुंबई इलाखा शेतकरी परिषद घेतली. या परिषदेत ८००० शेतकरी हजर होते. तुकडेबंदी व सारावाढीचे विधेयक सरकारने पास कर नये असा ठराव या परिषदेत घेण्यात आला. 
 • ब्राहृाणेतर चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘ मुंबई इलाखा ब्राह्मणेतर शेतकरी संघ’ ही संघटना स्थापन केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे आणि त्यांना जागृत करणे ही या संघटनेची उद्दिष्टे होती. 

फैजपूर काँग्रेस आणि शेतकऱ्यांचे प्रश्न :

पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हयातील फैजपूर येथे डिसेंबर १९३६मध्ये झालेले काँग्रेसचे अधिवेशन हे पहिलेच ग्रामीण अधिवेशन होते. या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन घेण्यात आले. एन. जी. रंगा हे किसान सभेचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात पुढील ठराव पास केले.

 • काँग्रेसअंतर्गत शेतकरी व मजुरांच्या संघटना स्थापन कराव्यात.
 • जमीन महसूल पन्नास टक्के कमी करावा.
 • जमिनीचा खंड पन्नास टक्के कमी करावा.
 • शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी.
 • शेतमजुरांना योग्य प्रमाणात वेतन द्यावे.
 • शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने कर्ज द्यावे.
 • शेतकऱ्यांच्या विकासाचा सरकारने प्रयत्न करावा.
 • शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी.

शे. का. प. आणि शेतकरी चळवळ :

 • इ. स. १९४६ मध्ये केशवराव जधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, के.डी. पाटील, नाना पाटील दत्ता देशमुख, यशवंतराव चव्हाण, पी. के सावंत, आचार्य प्र. के. अत्रे, रामभाऊ नलावडे, तुळशीदास जाधव, डॉ. केशवरावजी शंकरराव धोंडगे व गुरनाथरावजी कुरडे यांनी काँग्रेसअंतर्गत शेतकरी कामगार संघ स्थापन केला.
 • काँग्रेसअंतर्गत असे उपपक्ष असू नये अशी भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने घेतल्यामुळे २६ एप्रिल १९४८ रोजी शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला.
 • या पक्षाचे पहिले अधिवेशन सोलापूर येथे झाले.
 • ‘जनसत्ता’ हे साप्ताहिक या पक्षाचे मुखपत्र होते.
 • इ.स. १९५० मध्ये नाशिक जिल्हयात दाभाडी येथे पक्षाचे दुसरे अधिवेशन भरले. या अधिवेशनात पक्षाने दाभाडी प्रबंध स्वीकारले. यात पक्षाचे ध्येयधोरण मांडले आहे.
 • पुढे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. परिणामी केशवराव मोरे, तुळशीदास जाधव आणि खाडिलकर हे पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले.