शिवराम जानबा कांबळे

समाजकार्य 
  • गोपाळबाबा वळंगकरानंतर अस्पृश्यांच्या चळवळीत शिवराम जानबा कांबळे यांनी महत्वपूर्ण कार्य केले.
  • १९०३ साली सासवड येथे ५१ गावातील महारांची सभा भरवून अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या अशी मागणी सरकारकडे अर्ज करुन केली.
  • १९०४ साली ‘श्रीशंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज’ स्थापन केला. या समाजाच्या वतीने ग्रंथालय सुरु केले.
  • अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी अनेक सभा, संमेलने, अधिवेशने भरविली. पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रहात ते सहभागी झाले.
  • १९२० च्या नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषदेत त्यांचे भाषण झाले. अस्पृश्यांनी जुन्या चालीरितीचा त्याग करुन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तयार व्हावे हे त्यांच्या चळवळीचे सुत्र होते. जातीभेद हे सर्व सुधारणाच्या मार्गातील अडथळे आहेत असे त्यांचे मत होते.