शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यास सन १९८८-८९ पासून सुरुवात झाली. तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व  पणाला लावून आपले जीवन क्रीडाविकासासाठी व्यतीत केले आहे, अशा ज्येष्ठ क्रीडा महर्षिचा गौरव करण्यासाठी सन २००१-२००२ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारची सुरुवात झाली.

पुरस्काराचे स्वरूप

 1. जींवन गौरव पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु.३.०० लाख.
 2. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू/संघटक-कार्यकर्ते) – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु.१.०० लाख
 3. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 4. जिजामाता पुरस्कार – गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 5. एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)- गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, रु. १.०० लाख
 6. जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शक) – रु. १०,०००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-२०१८ मध्ये जाहीर

 • गेल्या ३ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
 • २०१४-१५ ते २०१६-१७ या ३ वर्षातील ७७६ पैकी १९५ पुरस्काराची घोषणा या ठिकाणी करण्यात आली.
 • या क्रीडा पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा खेळाडू, संघटक, कार्यकर्ते पुरस्कार, साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार आदींचा समावेश आहे.
 • यामध्ये अाैरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.

जीवनगाैरवचे मानकरी

 1. रमेश तावडे (अॅथलेटिक्स,२०१४-१५)
 2. डाॅ. अरुण दातार (मल्लखांब, २०१५-१६)
 3. बिभीषण पाटील (शरीरसाैष्ठव, २०१६-१७)