शब्दयोगी अव्यय

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी असणारा संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. परंतू काही शब्दयोगी अव्यये नामाला जोडून येत नाहीत. उदा.

  1. मांजराकडून उंदीर मारला गेला.
  2. चंद्र ढगामागे लपला.

काही मूळची क्रियाविशेषणे नामाला जोडून येऊन ती शब्दयोगी अव्यये बनतात. उदा. वर, खाली, पुढे, मागे, आत, बाहेर, जवळ, नंतर इ.

शब्दयोगी अव्यय

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

कालवाचकआता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो.
गतिवाचकआतून, खालून, मधून, पर्यंत, पासून
स्थलवाचकआत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष.
करणवाचकमुळे, योगे, करून, कडून, द्वारा, करवी, हाती
हेतुवाचकसाठी, करिते, कारणे, निमित्त, स्तव, प्रीत्यर्थ, अर्थी
व्यतिरेकवाचकव्यतिरिक्त, विना, वाचून, शिवाय, खेरीज.
तुलनावाचकतर, तम, परीस, मध्ये, पेक्षा.
योग्यतावाचकसम, समान, प्रमाणे, सारखा, जोगा, योग्य, बरहुकूम.
कैवल्यवाचकच, ना, पण, माञ, केवळ, फक्त.
संग्रहवाचकपण, केवळ, फक्त, बारीक, देखील, सुद्धा
संबंधवाचकसंबंधी, विषयी, विशी.
साहचर्यवाचकसकट, सहित, समवेत, बरोबर, सह, संगे, सवे, निशी
भागवाचकआतून, पैकी, पोटी
विनिमयवाचकजागी, बदली, ऐवजी, बद्दल
दिशावाचककडे, लागी, प्रति, प्रत
विरोधवाचकउलटे, उलट, वीण, विरूद्ध
परिणामवाचकभर

साधित शब्दयोगी अव्यय 

नामसाधितकड-कडे, अंत-अंती, पूर्व-पूर्वी
विशेषणसाधितयोग्य, विरूद्ध, समान, सहित, सारखा, सम
धातुसाधितलाग-लागून, देख-देखील, कर-करिता
क्रियाविशेषणसाधितआतून, मागून, खालून, वरून, पुढून
संस्कृत शब्दसाधितसमक्ष, परोक्ष, विना, पर्यंत, समीप

शुद्ध शब्दयोगी अव्यय

नामाला जोडून येणाऱ्या परंतु नामाचे सामान्यरूपात रूपांतर होणार नाही, अशा शब्दयोगी अव्ययाला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात.

विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय

जे अव्यय विभक्तीच्या प्रत्ययाचे कार्य करतात त्यांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

विभक्तीअव्यय
 द्वितियालागी, प्रत
तृतीयासह, बरोबर, कडून, मुळे, योगे, द्वारा, प्रमाणे, करवी
चतुर्थीप्रत, प्रीत्यर्थ, करिता, साठी, कडे, ऐवजी, बद्दल, स्तव
पंचमीशिवाय, वाचून, खेरीज, पेक्षा, कडून, पासून
षष्ठीविषयी, संबंधी
सप्तमीसमोर, खाली, भोवती, मध्ये, ऐवजी, ठाई

शब्दयोगी व क्रियाविशेषण अव्यय यांतील फरक

शब्दयोगी अव्ययक्रियाविशेषण अव्यय
पक्षी झाडावर बसला.तो जिना चढून वर गेला.
दिव्याखाली अंधार असतो.मीना पटकन खाली बसली.
घरामागे विहीर आहे.मागे या ठिकाणी शाळा होती.

सूचना: संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासण्यासाठी कृपया खालील बटनावर क्लिक करा.