व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

फिल्म्स डिव्हिजन आयोजित करत असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. माहितीपट क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांना मिफ्फमध्ये या पुरस्कारानं गौरवलं जातं. फिल्म्स डिव्हीजनचे मानद चित्रपट निर्माते आणि नामवंत दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो.

10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप अाहे.

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार-२०१८

  • मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही शांताराम पुरस्कार, यंदा ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना जाहीर झाला आहे.
  • महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मिफ्फ 2018 पुरस्काराचे वितरण पार पडले.
  • भारतात, माहितीपट चळवळीला प्रोत्साहन देण्यात श्याम बेनेगल यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.