वॉरन हेस्टींग

वॉरन हेस्टींग :- 1772 ते 1785

  1. वॉरन हेस्टींग हा 1772 मध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला.
  2. 1772 मध्ये वॉरन हेस्टींग याने जिल्हाधिकारी हे पद निर्माण केले.
  3. 1772 मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठेके जास्त बोली लावणाऱ्याना 1 वर्षांसाठी दिले.
  4. ब्रिटीश पार्लमेंटने वॉरन हेस्टींगच्या कारकीर्दीमध्ये 1773 मध्ये भारतातील पहिला प्रशासकीय कायदा रेग्युलेटींग ॲक्ट मंजुर केला.
  5. या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला व मुंबई, मद्रास येथील गव्हर्नर यांना त्याच्या देखरेखीत ठेवण्यात आले.
  6. वॉरन हेस्टींगने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर एलिहाज इम्पेची यांची नियुक्ती केली.
  7. 1775 मधील नंदकुमार हत्या खटल्यात वॉरन हेस्टींगचा संबंध.
  8.  वॉरन हेस्टींगने मीठ, सुपारी, तंबाखूव्यतिरिक्त व्यापारावर 2.5% कर लावला.
  9. वॉरन हेस्टींगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.