वैयक्तिक सत्याग्रह

वैयक्तिक सत्याग्रह (१९४०-४२) : तणावाच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या संकल्पित आंदोलनाचे स्वरूप वैयक्तिक सत्याग्रहाचे राहील असा निर्णय म. गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेस कार्यकारिणीने घेतला. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे गांधीजींनी निवड केलेल्या स्वयंसेवकाने एकट्यानेच सरकारचा कायदा मोडावा व त्याबद्दल सरकारने देईल ती शिक्षा स्विकारावी.

वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनाची उद्दिष्टे

पण १७ ऑक्टोबर १९४० रोजी गांधीजींच्या सांगण्यावरून विनोबा भावे यांनी सर्वप्रथम भाषणबंदीचा कायदा मोडला. त्यांना ६ महिन्याची शिक्षा झाली. देशभरात जवळजवळ २५ हजार स्वयंसेवकांना तुरुंगात टाकले.

इंग्लंडची युद्धात अडचणीची स्थिती निर्माण झाली. हिंदुस्थानचा प्रश्न सोडविण्यासाठी इंग्लंडवरती आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागला. हा पेच कमी करण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स मार्च १९४२ साली भारतात आले.