विष्णुबुवा ब्रम्हचारी

जन्म

विष्णुबुवा ब्रम्हचारी (इ.स.१८२५ ते १८७१) हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत व धर्मसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. ते रायगड जिल्ह्यातील शिरवली या गावचे राहणारे होते.

विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे कार्य
  • विष्णुबोवांचा प्रथमत: भर व्याख्यानांवर होता. नंतर त्यांनी ग्रंथलेखन केले. वेदोक्त धर्मप्रकाश, भावार्थसिंधु, चतु:श्लोकी भागवताचा मराठीत अनुवाद, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, बोधसागर असे पाच ग्रंथ प्रसिध्द आहेत. भगवद्गीतेवरील ‘सेतुबंधिनी टीका’ ही अपूर्ण राहिली.
  • जातिभेदाबद्दलही त्यांची मते क्रांतिकारक होती. जाती कार्यावरून ठरतील, आणि वर्ण ‘गुणधर्मावरून’ ठरेल. एकाच पित्याची चार मुले चार वर्णाची असू शकतील! कारण ‘वर्ण’ गुणावरूनच ठरतो. जो सत्वगुणयुक्त आहे व धर्ममार्ग दाखविण्यास समर्थ आहे, त्यास ब्राम्हण म्हणावे. अशा ब्राम्हणांनी आदिवासींना ज्ञान द्यावे व उन्नत करावे अशी त्यांची विचारसरणी होती.
  • विष्णुबोवा ब्रम्हचारी यांनी ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ लिहून कार्ल मार्क्सच्या कितीतरी वर्षे आधी समाजवादी समाजरचनेबद्दलचे विचार मांडले आहेत.
  • विष्णुबोवांनी ‘सेतुबंधिनी’ नावाची गीतेवर टीका लिहिली आहे. ही टीका गीता अध्याय १८, श्लोक १७ पर्यंत लिहिली गेली; पुढील टीका त्यांच्या एका शिष्याने पुरी केली. ही टीका इ.स. १८७० च्या सुमारास लिहिली- पण १९८० ला प्रकाशित झाली. या टीकेचे वैशिष्टय म्हणजे ती गद्य स्वरूपात व तत्कालीन ज्ञात वैद्यानिक परिभाषेत लिहिली आहे.
  • विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचा १८ फेब्रुवारी १८७१ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला.