विनायक दामोदर सावरकर

नोव्हेंबर १८९९ मध्ये विनायक दामोदर सावरकर, राजबापू म्हसकर, रावजी कृष्णा या तिघांनी नाशिकमध्ये “राष्ट्रभक्तसमुह” ही गुप्तमंडळी स्थापन केली. १ जानेवारी १९०० रोजी स्थापन झालेल्या “मित्रमेळा” हे त्या गुप्तमंडळीचे प्रकट रुप होते. याच संस्थेतून निर्भय व धाडसी राष्ट्रभक्त तरुणांची निवड करुन १९०४ मध्ये “अभिनव भारत” या क्रांतीकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. देशाचे संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हे अभिनव भारत या संघटनेचे ध्येय असून त्यासाठी सशस्त्र क्रांतीचे धोरण स्वीकारले.

पं. शामजी कृष्ण वर्मा यांनी हिंदी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. टिळकांच्या प्रयत्नांमुळे ही शिष्यवृ्‌ती सावरकरांना दिली गेली. त्यामुळे इ.स. १२०६ साली वि. दा. सावरकर हे बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. यानंतर अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी पाहिले.

सावरकर लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी हिंदी लोकांना एकत्रित केले तसेच लंडनहून पिस्तुले व काडतुसे नाशिकला पाठवली. सेनापती बापट व बंगालचे हेमचंद्र दास यांना रशियन क्रांतीकारकांकडून बाँब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सावरकरांनी पॅरिसला पाठवले होते. या काळात अभिनव भारतचे क्रांतीकारक संपूर्ण देशात प्रसिद्ध होऊ लागले. अभिनव भारतच्या सदस्या मॅडम मादाम कामा यांनी १९०७ मध्ये जर्मनीत भरलेल्या इंटरनॅशनल सोशॅलिस्ट कॉन्फरन्समध्ये स्वतः तयार केलेला तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून फडकवला व भारतीयांच्या स्वातंत्र्याची आकांक्षा जगापुढे मांडली.

सावकरांच्या लंडन येथील क्रांतीकार्याची सरकारला माहिती लागल्यामुळे जून १९०८ साली नाशिक येथे गणेश दामोदर सावरकर यांच्या घराची झडती घेतली. काही गुप्त कागदपत्रे सरकारच्या हाती लागल्याने गणेश सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. याचा बदला घेण्यासाठी पंजाबच्या मदनलाल धिग्रांने १ जुलै १९०९ रोजी कर्झन वायलीचा खून केला. १७ ऑगस्ट रोजी त्याला फाशी देण्यात आली. तसेच अभिनव भारतने नाशिकचा जिल्हाधिकारी ऑर्थर जॅक्सनचा खून करण्याचा कट रचला. २९ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात १८ वर्षे वयाचा अनंत लक्ष्मण कान्हेरेने जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. १९ एप्रिल १९१० रोजी कान्हेरेला फाशी देण्यात आली.

जॅक्सनच्या खुनानंतर सरकारने अनेकांची धरपकड सुरु केली. अभिनव भारतच्या शाखेवर छापे टाकून ती नेस्तनाबुत केली. जॅक्सनच्या वधाचा संबंध सावरकरांशी जोडण्यात येऊन त्यांना ३१ मार्च १९१० रोजी बोटीने निघाले. ७ जुलैला त्यांची बोट मार्सेलीस बंदराजवळ थांबली असता सावरकरांनी बोटीच्या संडासातील छिद्रातून समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली आणि गोळ्यांच्या वर्षावात फ्रान्सचा किनारा गाठला. पण पलायनाचा प्रयत्न अपयशी ठरुन त्यांना अटक झाली. २४ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना जन्मठेप व ५० वर्षे काळया पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानच्या तुरुंगात १० ते ११ वर्षे सावरकरांनी तुरुंगवास भोगला. ६ जानेवारी १९२४ रोजी त्यांची सुटका झाली.